Monday 10 January 2022

किन्हईच्या शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

किन्हईच्या शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या स्थापना दिवशीच कोरोना संकटानंतर दीड वर्षांनंतर शाळा सुरु होतं आहेत त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे..!

शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची योग्य ती खबरदारी घेऊन आणि सरकारी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून आज शाळेची पहिली घंटा वाजली. कोरोनानंतर मुलांचा पहिला दिवस तसेच पाचवीच्या वर्गातील मुलांचा हायस्कूल शाळेतील पहिला दिवस आनंदात सुरू  झाला..!

शाळा प्रशासन, मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांनी गावातील ग्रामस्थ, पालक आणि जनमित्र सामजिक विकास संस्थेच्या माध्यमातून पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले..!

नव्याने हायस्कूलमध्ये आलेल्या पाचवीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून, फुले आणि खाऊ देऊन स्वागत केले यावेळी सामजिक कार्यकर्ते शिवराम ठवरे यांनी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले..!

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक भोकरे सर, दिघे सर, पंचायत समिती सदस्य निवृत्ती होळ तसेच जनमित्र सामाजिक विकास संस्थचे राजेश पवार (गुरव), शिवराम ठवरे आणि शाळेचे माजी विद्यार्थी ॲड.मंदार प्रकाश ढवळे आणि अजय भोसले यांचे सहकार्य लाभले..!

*शिवराम ठवरे-9175273528*

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3050879358489809&id=1469089860002108

सातारा येथील रिक्षाचालक शाहरुख बागवान यांचा प्रामाणिकपणा चुकीने गुगलपेद्वारे आलेले 35,000 दिले परत

सातारा येथील रिक्षाचालक शाहरुख बागवान यांचा प्रामाणिकपणा चुकीने गुगलपेद्वारे आलेले 35,000 दिले परत

नातेपुते येथील पूनम ढोबळे नावाची तरुणी सातारा शहरात नोकरीनिमित्त राहत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आईला काल गुगल पे वरून 35,000 पाठवत असताना सुरेखा (Surekha) ऐवजी शाहरुख बागवान (Shahrukh) नावावर 35,000 रुपये गेले होते..!

शाहरुख बागवान सातारा शहरात रिक्षा चालवतात त्यामुळे कधीतरी पूनमने त्यांच्या रिक्षातून प्रवास केलेला होता त्यामुळे घाई गडबडीत केलेले 35,000 पेमेंट शाहरुख बागवान यांना मिळाले. पूनमने रात्री आईचा फोन आल्यावर पैसे मिळाले का असे विचारले असता अजून मेसेज आला नाही असे उत्तर आल्यावर पुन्हा गुगल ओले चेक केले तर झालेली चूक लक्षात आली..!

पूनमने शाहरुख यांना फोन करून विचारणा केल्यावर अशी रक्कम आली आहे आपणाला नक्की परत करतो असे सांगून लगेचच आलेले सर्व 35,000 रुपये माघारी दिले आणि कोणत्याही बक्षिसाची अपेक्षाही ठेवली नाही..!

सगळीकडे ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढले असताना आपल्या सातारामध्ये झालेला हा प्रसंग माणुसकी जिवंत असल्याची साक्ष देणारा आहे. कोरोनामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे अशातच दिवाळीदेखील तोंडावर असताना दुसऱ्याच्या पैशावर कोणतंही मन न दाखवता आपल्या घामाच्या कमाईवर विश्वास ठेवणारे शाहरुख बागवान आपला हिरो असायला पाहिजे..!

रिक्षाचालक शाहरूखच्या प्रमाणिकपणाला सलाम..शाहरुख बागवान यांचा मोबाईल क्रमांक 7219409028 असा आहे..!

*शिवराम ठवरे-9175273528*

https://www.facebook.com/1469089860002108/posts/3068008443443567/

खेळातून संघभावना आणि खिलाडू वृत्ती वाढली पाहिजे :- कॉ. विजय मांडके

खेळातून संघभावना आणि खिलाडू वृत्ती वाढली पाहिजे :- कॉ. विजय मांडके

विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि खेळ यात समतोल राखला तर त्यांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होवू शकते. खेळातून संघभावना आणि खिलाडू वृत्ती वाढायला हवी असे आवाहन कॉ. विजय मांडके यांनी केले. आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी किन्हई ता. कोरेगाव येथे जनमित्र सामजिक विकास संस्था आणि शिवमल्हार क्रीडा प्रबोधनी, पेठ किन्हईच्या माध्यमातून आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि कौतुक सोहळ्यात मांडके सर बोलत होते..!

नुकत्याच भुईंज येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे व किक बॉक्सिंग स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी, प्रशिक्षक आणि सुंदर किल्ला स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आजच्या कार्यक्रमाला शिवथर येथील माजी सैनिक *राजूभैय्या ईनामदार, सामजिक कार्यकर्ते आणि व्याख्याते विशाल कांबळे, समतादूत राहुल गंगावणे, जनमित्र सामजिक विकास संस्थेचे अध्यक्ष गौरव साबळे, अभ्यासू वकील ॲड. शाहिद ईनामदार, संस्था सचिव शिवराम ठवरे, उपाध्यक्ष ॲड. मंदार ढवळे, कराटे प्रशिक्षक विनोद फाळके* आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते..!

उपस्थित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी हितगुज साधतांना मांडके सरांनी अभ्यासाबरोबरच शालेय जीवनापासून खेळावर लक्ष केंद्रित करायला हवे असा सल्ला दिला. क्रिडांगणावर खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये संघर्ष करण्याची जिद्द, पराभव आणि विजय पचविण्याची क्षमता, सदृढ शरीर आणि तात्काळ निर्णय घेण्याची तल्लख बुध्दी सहज निर्माण होते असे त्यांनी सांगितले..!

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत संस्थचे उपाध्यक्ष ॲड. मंदार ढवळे यांनी केले तर जनमित्र सामजिक विकास संस्थेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती संस्थेचे सचिव शिवराम ठवरे यांनी दिली. गुरुकुल करीअर अकॅडमीचे संस्थापक राजूभैय्या ईनामदार यांनी अकॅडमीच्या माध्यमातून चालवलेल्या प्रशिक्षणाची माहिती देऊन सैन्य, पोलीस भरती तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी शालेय जीवनातच सुरुवात केल्यास नक्की यश मिळेल असा आशावाद व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या..!

सामाजिक कार्यकर्ते, व्याख्याते विशाल कांबळे सरांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा नैपुण्याचे भरभरुन कौतूक केले व विद्यार्थ्यांना खेळभावना जोपासण्याचे आवाहन केले. सत्याच्या मार्गाने चालणाऱ्याला अपयश येत नाही असे सांगताना प्रबोधनपर गोष्टीही सांगितल्या..!

बॉक्सिंगच्या *विद्यार्थ्यांना मदत म्हणून सहा हजार रुपये किंमतीची दोन किट संस्थेच्या वतीने भेट देण्यात आली तसेच सुंदर किल्ला स्पर्धेच्या सहभागी विद्यार्थ्यांना पाच डझन वह्यांचे वाटप करण्यात आले* तसेच विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रच्या वतीने दत्तप्रसाद दाभोळकर लिखित "अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अग्रदूत नरेंद्र ... विवेकानंद" यांच्या पुस्तिकेच्या 50 प्रतिही भेट देण्यात आल्या..!

कार्यक्रम यशस्वीतेसाठी पेठ किन्हई ग्रामपंचायतीचे उपसरपंच शिवाजीराव सपकाळ, ग्रा. पंचायत सदस्य सुरेखाताई भिसे, सोसायटी चेअरमन शरद राजराम भोसले, सामजिक कार्यकर्ते अक्षय चव्हाण, प्रसाद ढवळे, मनोज ढवळे, प्रशिक्षक संजय भिसे, निळकंठ पवार आणि किन्हई ग्रामस्थ मंडळींनी विशेष परिश्रम घेतले..!

जनमित्र सामाजिक विकास संस्था, सातारा

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3074413006136444&id=1469089860002108

प्रत्येक शाळेत समुपदेशक असणं काळाची गरज :- प्रा. समता जीवन

प्रत्येक शाळेत समुपदेशक असणं काळाची गरज :- प्रा. समता जीवन

दि हिंद एज्युकेशन सोसोयटी, मिरजचे आर. एम. हायस्कुलमध्ये गाव तिथे समुपदेशन केंद्र अभियानांतर्गत पहिल्या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

राज्यभरात किमान 100 केंद्र उभी करण्याचा समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ, महाराष्ट्रचा संकल्प

शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या गुणांच्या स्वरूपातल्या प्रगतीचं पुस्तक सगळीकडे पाहिलं जातं पण मुलांची भावनिक बुद्धिमत्ता फार कमी प्रमाणात तपासली जाते. मुलांचं भावविश्व लक्षात घेऊन त्यांना योग्य वयात वळण देता आलं तर विद्यार्थ्यांच्या निर्णयक्षमतेचा विकास होऊन जीवनाला योग्य दिशा मिळेल यासाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातील प्रत्येक शाळेत समुपदेशक असणं काळाची गरज असल्याची भावना प्रा. समता जीवन यांनी व्यक्त केली..!

आज मिरज जिल्हा सांगली येथील दि हिंद एज्युकेशन सोसायटीच्या आर. एम. हायस्कुलमधील समुपदेशन केंद्राच्या उदघाटक म्हणून उपस्थित असताना समाज कार्यकर्ते , शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यानी शालेय जीवनात समुपदेशनाची गरज विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी मुद्देसूद मांडणी केली. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव होते तर प्रमुख पाहुणे संस्थेचे माजी उपाध्यक्ष प्रताप जाधव, भारती विद्यापीठाचे प्रा. के. व्यकटेश सर, समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ, महाराष्ट्रचे सचिव शिवराम ठवरे, सांगली जिल्हाध्यक्ष युवराज मगदूम, समुपदेशन केंद्र समन्वयक नाईकबा गिदे, शुभांगी कांबळे,संग्राम घोरपडे, जिल्हा उपाध्यक्ष आकाश पाटील आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते..!

प्रत्येक शाळेत समस्याग्रस्त, समुपदेशनाची गरज असलेले असंख्य विद्यार्थी आहेत. मुलांमध्ये छोट्या-मोठ्या स्वरूपाच्या, साध्या अथवा गंभीर अशा अनेक समस्या आढळून येतात. ती मुले समस्यांना तोंड देऊ शकत नाहीत, त्याचे परिणाम त्यांच्या वर्तनात दिसू लागतात त्यामुळे योग्य वेळीच विद्यार्थ्यांचा मानसीक अभ्यास करून समस्यांवर समाधान शोधणं आवश्यक आहे..!

माणसांच्या मनाचा अभ्यास पूर्वीपासून अनेक अभ्यासकांनी केला आहे याबाबत औपचारिक शिक्षण देणारे अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत मात्र प्रत्यक्ष शिक्षणाशी, वर्गातील अध्ययन आणि अध्यापनाची या अभ्यासाचा संबंध व्यवहारात फार कमी प्रमाणात जोडला गेल्याचे दिसून येते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात ताण तणाव, व्यसनाधीनता, हिंसक प्रवृत्ती याची वाढ होऊ लागली आहे. विद्यार्थ्यांना योग्य वयात भावनिक आधार देऊन त्यांना निर्णयक्षम बनवण्यासाठी समुपदेशन हाच मार्ग असल्याचेही त्यांनी सांगितले..!

समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ, महाराष्ट्रच्या माध्यमातून गाव तिथं समुपदेशन केंद्र अभियानाचे कौतुक करताना त्यांनी माझ्याकडून आणि आमच्या संस्थेकडून शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. आपापल्या कौटुंबिक, नोकरी आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडून समाजासाठी काम करणाऱ्या सगळ्याना शुभेच्छाही दिल्या. संस्थेने उत्तम कार्यक्रम आयोजित केला आणि समुपदेशन केंद्राची उभारणी करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मिलिंद जाधव सर यांचे आभार मानले..!

चौकट- आजच्या कार्यक्रमात बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने शिव फुले शाहू आंबेडकर समाजभूषण पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष मिलिंद जाधव सर यांना सन्मानपूर्वक देण्यात आला..!

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ, महाराष्ट्रच्या सांगलीचे अध्यक्ष युवराज मगदूम, संग्राम घोरपडे, जिल्हा उपाध्यक्ष आकाश पाटील, मिरज तालुका अध्यक्ष हौसेराव साठे, मिरज तालुका सल्लागार दत्तात्रय लोकरे, विटा तालुका अध्यक्ष मुनिवर सुलताने, शालेय समुपदेशनचे केंद्र समन्वयक नाईकबा गिदे, शुभांगी कांबळे, सुरेश सकटे, जिल्हा सल्लागार विनायक कुलकर्णी, सेवासदन हॉस्पिटलचे समन्वयक शिरीष वाघमारे, आर एम हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बेळगावे आदींनी परिश्रम घेतले..!

शिवराम ठवरे-9175273528
सचिव:-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ, महाराष्ट्र
युवराज मगदूम-9158546364
समन्वयक गाव तिथं समुपदेशन केंद्र अभियान, महाराष्ट्र
mswbswboard@gmail.com

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4540612569380173&id=100002944252050

कोवीड मृतांच्या नातेवाईकांना 50,000 मदत

महत्वाचे:- कोवीड मृतांच्या नातेवाईकांना 50,000 मदत

कोविड आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळण्यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर स्वरा कन्सल्टन्सी आणि जनमित्र सामाजिक विकास संस्थेच्यवतीने अर्ज भरून मिळतील.

आवश्यक कागदपत्रे

1. अर्जदाराचा मोबाईल नंबर
2. अर्जदाराचे आधार कार्ड
3. मृत व्यक्तीचे आधार कार्ड
4. मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र
5. अर्जदाराचे आधार लिंक असलेल्या बँकेचा खाते क्रमांक आणि कॅन्सल्ड चेक कॉपी
6. मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र
7. कागदपत्र क्रमांक सहा उपलब्ध नसल्यास मृत व्यक्तीचा RT-PCR report copy OR CT Scan copy OR Any other Medical Documents

वरीलप्रमाणे कागदपत्रे उपलब्ध असल्यास आपला अर्ज भरण्यासाठी संपर्क करा.

अरिहंत 7385752721     
janmitraindia@gmail.com

स्वरा कन्सल्टन्सी आणि जनमित्र सामाजिक विकास संस्था

फ्लॅट नंबर 203, अनिका ईक्लेसीया, तिरंगा चौक, सर्वे नंबर 32/5, मारुती मंदिर रोड, पिसोळी, पुणे 4110 60

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1243077419501553&id=535751140234188

प्रसेनजी साबळे-पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 10 जानेवारी

प्रसेनजी साबळे-पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

सामाजिक, राजकीय वारसा असणाऱ्या घरातल्या तरुणांना नेहमीच जबाबदारीनं वागावं लागतंय. आपलं उच्चशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिवथर गावातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमात मागील काही वर्षांपासून प्रसेनजी साबळे पाटील कृतिशील सहभाग घेत आहेत..!

मोठ्या शहरात शिक्षण आणि काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे शहरी धाटणी असली तरी जेष्ठांच्या मार्गदर्शनात आणि तरुण मित्रांच्या सहकार्याने राजकारणाचे धडे प्रसेनजी घेऊ लागले आहेत..!

आपल्या स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष देऊन वाचनाची आवड जोपासली आहे. नवीन गोष्टी शिकण्याची उर्मी आहे. प्रचंड संयमाने लोकांच्या सोबत बोलण्याची पद्धत लोकांना आवडणारी आहे. भविष्याचा विचार करून तरुणांनी आपलं करीअर, उद्योग व्यवसाय यामध्ये लक्ष घालून व्यक्तिगत प्रगती केली पाहिजे असा सगळ्यांना सल्ला देणारं प्रसेनसारखं व्यक्तिमत्त्व राजकारणात असणं भविष्यातील गरज आहे..!

प्रसिद्धीचा कोणताही हव्यास न ठेवता आपल्याकडे आलेल्या अनेकांच्या कॉलेज ऍडमिशन, वैद्यकिय उपचारासाठी मदत किंवा पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा आमदार, खासदार मंत्री असतील अनेक ठिकाणी स्वतः जाऊन कामं करून दिल्याचा अनेकांना अनुभव आहे..!

शिकलेल्या माणसांनी राजकारणात येणं गरजेचं आहे प्रसेनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना उज्वल भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा..!

शिवराम ठवरे-9175273528

बहुजनांच्या रयतला बदनाम करण्याचा नागपुरी डाव साध्य होणार नाही: शिवराम ठवरे

रयतच्या भाऊराव पाटील समूह विदयापिठाच्या निर्णयामुळे शाब्दिक मळमळ सुरू

सातारा जिल्ह्यातील कराड येथील काले गावात सत्यशोधक समाजाची विभागीय परिषद 25 सप्टेंबर 1919 रोजी आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत एक क्रांतिकारक घटना घडली. परिषदेत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करण्याचा क्रांतिकारी ठराव मांडला. हा ठराव उपस्थित सत्यशोधकांनी एकमताने मंजूर केला..!

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. जमीनदार, शेटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते..!

परिवर्तनाचा विचार सोडून प्रतिगामी आणि कट्टरतावादी विचारांच्या मार्गाने रयत गेली नाही पाहिजे यासाठी कर्मवीर आण्णांनी आयुष्यभर कटाक्ष ठेवला. नागपुरी संघाच्या विचारांच्या माणसांना रयतच्या सावलीला देखील येता येणार नाही हे वास्तव आहे..!

रयतच्या मॅनेजमेंट मध्ये येऊन इथलं बहुजनांच्या हक्काचं शिक्षण बंद करण्याचा नागपुरी कावा कदापी साध्य होणार नाही हे लक्षात आल्यामुळं अनेकांची आजवर तडफड होत होतीच त्यात आता एकाची भर पडली आहे इतकंच..!

नुकतीच सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे समूह विद्यापीठ स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत यशवंतराव चव्हाण विज्ञान संस्था, सातारा (स्वायत्त) हे मुख्य महाविद्यालय व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा (स्वायत्त) आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा (स्वायत्त) ही दोन सहभागी  महाविद्यालये या तीन अनुदानित महाविद्यालयांचा समावेश असलेले कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा हे समूह विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली..!

जगभरात चाललेली रयतची घोडदौड रोखण्यासाठी संस्थेची बदनामी कोणताही रयतप्रेमी सहन करू शकणार नाही. बहुजनांच्या रयतेला इथल्या बहुजनांनी नुसतं टिकवलंच नाही तर समृद्ध केलं आहे. शिक्षणप्रसार व समाजप्रबोधन यांसाठी कर्मवीरांनी हयात वेचली..!

सर्वांना शिक्षणाची समान संधी लाभली पाहिजे या ध्येयाने प्रेरित होऊन जात, गोत, धर्म पंथ इत्यादी सामाजिक भेद नष्ट करून समता, बंधुता व मानवता यांकडे स्वावलंबानाने संस्थेची वाटचाल सुरु आहे कुणी कितीही प्रयत्न केला तरी बहुजनांच्या रयतला बदनाम करण्याचा नागपुरी डाव साध्य होणार नाही..!

शिवराम ठवरे-9175273528