Monday 15 February 2016

"देशद्रोही आणि लाल सलाम"--शिवराम ठवरे

"देशद्रोही आणि लाल सलाम"

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बीजेपी जाणून बुजून देशद्रोही राजकारण करीत आहे. रोहित वेमुला प्रकरणात "भीम प्रेमी" दुखावले आहेत. "आता अच्छे दिन येतील" आणि हाताला काम मिळेल असा प्रामाणिक विचार केलेला तरुण" कंत्राटी नोकरी" करत शिव्या घालत बसला आहे.शेतकरी, कष्टकरी अगोदरच त्यांच्यापासून दुरावला आहे...!

महिलांना तर मनुवादी विचार जवळही करत नाहीत...प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या स्वतःच्या बायकोची "माहिती अधिकार याचना" देश उघड्या डोळ्यांनी पाहत आहे याचबरोबर "घरवापसी लव्ह जिहाद" सारखे मेलेले मुडदे जागे होत नाहीत...!
लोकसभेत बहुमत असूनदेखील सत्तेत आल्यापासून देशात काहीच "सकारात्मक बदल" झालेला नाही..सर्वच जनतेतून नकारचा पाढा सुरु असल्यामुळे आता "मोदी-शहा भयभीत" झाले आहेत आणि आता राममंदिर मुद्दा पहिल्यासारखा "परिणामकारक" राहिला नाही...!

24×7 तरुण जागे असलेल्या जमान्यात आता कोणताच खोटेपणा काही चालत नाही..गुजरातचा "विकासाचा फुगा" दूर कुठेतरी निघून गेला आहे...!

देशातील सारे "विरोधक संपवले" अश्या वल्गना करणाऱ्या भाजपाला प्रत्येक निवडणुकीत नामुष्की सहन करावी लागत आहे."जागतिक पातळीवर डावे संपले आहेत" अशा टिपिकल घोषणा देणारे  "लाल सलाम" घोषणेला मात्र घाबरले आहेत...!
भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही विरोधात सातत्यपूर्ण संघर्ष करणारे डावे कार्यकर्ते...."अभ्यास-संघर्ष-संघटन  - प्रामाणिकता आणि आपणच जिंकणार" अशी उच्चकोटीची इच्छाशक्ती घेऊन "ऐतिहासिक लढाई" देत होते...!

डावे कार्यकर्ते स्वातंत्र्यपूर्व काळापासून पिचलेल्या वर्गाचे अखंड नेतृत्व करीत आहेत...निस्वार्थीपणे काम करत मरेपर्यंत जिंकण्याची आशा न सोडता जगणारे "कॉम्रेड" सर्वसामान्य जनता आजपर्यंत पाहत आली आहे...!

"भांडवली शक्ती" आपल्या सर्व साधनांचा वापर करीत आजवर डावे विचार दडपत होती..आजच्या तंत्राच्या युगात मात्र "लाल सलाम" जोरात घुमू लागला आहे त्यामुळे सर्वच जाती धर्मातील काहीच जवळ नसलेला वंचित आवाज आता "मार्क्सच्या अवघड भाषेतील जगण्याच्या सोप्या मांडणीला" जवळ करू लागला आहे...!

अशातच दिल्ली,बिहार आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही पराभव झालेमुळे त्यांनी आता अंतिम "धार्मिक अस्त्र" बाहेर काढले आहे.....!

निस्वार्थीपणे काम करणारे अभ्यासपूर्ण संघर्षशील आणि संघटित कार्यकर्ते यांचे बळावर निवडणुकीचे सांखिय बल जवळ नसतानाही देशपातळीवर "दहशतवादी मनुवादाला" मूळातून डावेच पराभूत करू शकतात हे माहित असल्यामुळे "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे" आदेशाने देशद्रोही मोहीम चालवली आहे...!

यातून त्यांना कदाचित तत्कालीन राजकीय फायदा फायदा बिजेपीला  मिळेलही पण न्यायालयत डाव्या कार्यकर्त्यावरील आरोप टिकणार नाहीत ते निर्दोष मुक्त होतील...!

पण देशातील श्रमिक कष्टकरी वर्गाचे "मनुवादी भांडवली शोषण" संपणार नाही त्यामुळे निवडणुकीतील हरण्याची कधीच तमा न बाळगणारे डावे कार्यकर्ते कधीच जिद्द सोडणार नाहीत. "लढेंगे जितेंगे" असे म्हणत अविरतपणे त्यांची "भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही" विरोधी लढाई जिंकण्याकडे वाटचाल करेल यात शंकाच नाही...!

शिवराम ठवरे 16-02-2016
मुक्त पत्रकार-9175273528
Shivramthavare25@gmail.com

Saturday 13 February 2016

शोध लाल महालाचा...शनिवार वाडाच आहे लालमहाल...?

लाल महाल गेला कुठे?

एम. डी. रामटेके.

शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट इतिहासाच्या पानांतुन गहाळ झाल्याचं जाणवतं. शहाजीराजे यांनी जिजाऊसाहेबांसाठी पुण्यात लाल महाल नावाची वास्तु बांधुन देतात. महाराजांची जडणघडण याच वास्तुमधे होते. पुढे स्वराज्याचा पहिला किल्ला तोरणा जिंकेस्तोवर ईथुनच सगळे सुत्र हलविले जातात. हा असा ऐतिहासिक वारसा असलेला महाराजांच्या बालपणीच्या इतिहासाचा साक्ष असलेला लाल महाल अचानक इतिहासतुन अशा प्रकारे गहाळ होतो की तो शोधुन सापडत नाही. लाल महाल बांधण्यासाठी शहाजी राजानी श्री. झांब्रे पाटलाकडुन जागा विकत घेतली होती अन या जागेवर लाल महाल उभारण्यात आला.

हा लाल महाल केवढा मोठा होता? त्याची लांबी किती? रुंदी किती? त्याची नेमकी जागा आज कुठे आहे? याचे काहीच पुरावे कसे काय सापडत नाही याचं नवलच वाटतं. लाल महालापेक्षा जुन्या वास्तु आजही उभ्या आहेत पण लाल महाल उभा तर जाऊद्या त्याची जागा सुध्दा हरवली आहे. हे असलं हरवणं, मनात ब-याच शंका आणुन जाते. त्यापेक्षा जुना दादोजी कोंडदेवाचा शिरूर तालुक्यातील मलठन गावचा वाडा आजही सापडतो. पण याच दादोजीच्या हाताने बांधुन घेण्यात आलेला १६३७ मधला लाल महाल मात्र नष्ट होतो. हे खरच पटण्यासारखं आहे का? बरं तो महाल होता! असलं हलक पुलकं बांधकाम नक्कीच नसेल. वरुन ती शहाजी राजे यांच्या आदेशाने बांधण्यात आलेली राजकिय वास्तु होती म्हणुन बांधकामही चांगल्या प्रतिच होतं यात दुमत नसावं. याही पलिकडे जाऊन मी असं म्हणेन हे सगळे तर्क गेले चुलीत किमान जुन्या लाल महलाची जागा तरी सापडावी ना! पण ती निशानी सुद्धा सापडत नाही. अरे अहि-या जागेचा निट शोध घेतला तर सगळे जुने रेकॉर्डस सापडतात पण लाल महाला सारख्या अतिमहत्वाच्या ऐतिहासिक वास्तुची जागा सापडु नये म्हणजे दाल मे काला है.

मग सहाजीकच शेजारी उभा असलेल्या शनिवार वाड्यावर शंका येते. अन मला तर खात्रीच आहे आज आपण ज्याला शनिवार वाडा म्हणुन ओळखतो तोच आहे लाल महाल. तुम्ही शनिवार वाड्याचा इतिहास बघा ना. बाजीरावानी शनिवार वाडा बांधण्यासाठी जमिन कुणाकडुन घेतली याचा पुरावाच नाही. बरं त्या वाडयाचं बांधकाम बघा किती जलद गतीने झालं. १ वर्षात शनिवारवाडा बांधुन झाल्याचा इतिहासात उल्लेख आहे. बाजीरावाकडे काय राक्षसलोकं होती की काय, एवढ्या फास्ट बांधकाम करायला. हा शनिवार वाडा आधिपासुनच लाल महालाच्या रुपात उभा असावा. बाजीरावानी त्याला हवे तसे बदल करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी घेतला असावा. अन त्याला शनिवारवाडा असे नाव देऊन पुढे या पवित्र वास्तुत पेशव्यानी नंगा नाच केला.

पेशव्यानी लाल महाल बळकावताना त्याची ओळख मुळातुन उपटुन फेकली. कसलेच पुरावे मागे राहणार नाही याची खबरदारी घेतली गेली. लाल महालाचं नाव इतिहासातुन मिटविण्याचे सगळे उपाय इतक्या पद्धतशीरपणे योजले गेले की आज त्याची जागाही सापडत नाही. पण शनिवारवाडा या वास्तुकडे चिकित्सकपणे बघितल्यास कळेल की हाच वाडा आहे लाल महाल. हे ब्राह्मणी कारस्तानाचं आजुन एक जितं जागतं उदाहरण होय. पेशव्यानी हेतुपुरस्सर ही वास्तु बळकावली व त्यात त्याना हवे तसे बदल करुन मनुवादी नाव दिलं. त्या नंतर येणा-या सगळ्य़ा भटा बामणानी या वास्तुचा पेशव्यांचा शनिवारवाडा म्हणुन उदो उदो केला. बहुजन नायकांना डावलुन समकालीन ब्राह्मणी कर्तुत्वाचं उदात्तीकरण करण्याचा सेम पॅटर्न ईथेही लावण्यात आला. मराठ्यांची वास्तु बळकावुन त्याला शनिवारवाडा हे नाव देण्यात आलं.

लाल महालाचा इतिहास बघा. शहिस्तेखान १ लाखाची फौज घेऊन येतो व ज्या लाल महालात राहतो तो लाल महाल काय एवढुसा असेल का? तसही आज आपण ज्याला लाल महाल म्हणतो तो पुणे महानगरपालीकेनी १९८८ मधे बांधलेला लाल महाल आहे. खरा लाल महाल जिथुन सगळा राजकिय कारभार चालविल्या जात असे तो ईथे हरवुन गेला. त्याचे धागे दोरे सापडत नाही. अन मला हे सापडत नाही म्हणने मान्यच नाही. आजचा शनिवारवाडाच कालचा  लाल महाल होता. बाजीरावाने बांधलेला सागवानी वाडा खरच अय्याशीचा अड्डा बनला होता म्हणुन तो विस्तवात मिसळला. अन तसं होणे म्हणजे या पवित्र वास्तुचे शुद्धिकरण होय. शनिवार वाडा म्हणजेच लाल महाल होय. पेशव्यांनी नुसत अतिक्रमण व नामांतर केल नाही तर या पवित्र वास्तुमधे अनेक पापं केलीत. पेशवे कालात हा लाल महाल शनिवार वाडा म्हणुन ओळखल्या जाऊ लागला. या वाड्यात अय्याशीचे सगळे कळस गाठण्यात आले. बायकांचा नंगानाच याच वाड्यात पेशव्याच्या अदेशाने होऊ लागला. ईथेच बाजीरावानी कित्येक बायकांची अब्रु लुटली होती. याच वाडयातुन दलितांच्या विरुद्ध निर्णय देण्यात आले. याच वाड्यातिल पेशव्यांमुळे जातिभेदाने कळस गाठला होता. अशा प्रकारे पेशव्यांच्या काळात लाल महालावर नुसतं अतिक्रमण करण्यात आल नसुन ईथलं पवित्र्य पाय़ी तुडविल्या गेलं. हे सगळे पाप धुवुन निघणे गरजेचे होते. पेशव्यानी बांधलेले सागवानी वास्तु जळून खाक झाली. अन लाल महालनी कित्येक वर्षा नंतर मोकळेपणाने श्वास घेतला खरा पण पेशव्यानी दिलेलं नाव मात्र आजुन तसच आहे. आता गरज आहे ते नाव बदलण्याची. मुळात ही वास्तु पेशव्यांनी बांधले नाहीच. ही वास्तु आहे मराठा राजा शिवरायांची. ईथल्या भुमिपुत्राची. आता वेळ आली आहे त्या वास्तुला तीची जुनी ओळख बहाल करण्याचे.

वरील लेख संकलित असून लेखातील मुद्दे बरोबर वाटले म्हणून माझ्या ब्लॉगवर शेअर करीत आहे..यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे...

शिवराम ठवरे 13-02-2016

Tuesday 9 February 2016

नक्षलवादी हे धार्मिक दहशतवादी नाहीत....शिवराम ठवरे

नक्षलवादी "दहशतवादी" नाहीत...!

नुकतेच नक्षलवादयानी चौकशी करीता ताब्यात घेतलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी विकास वाळके,श्रीकृष्ण शेवाळे आणि आदर्श पाटील यांची सुखरूप सुटका आणि त्या विद्यार्थिनी दिलेल्या प्रतिक्रिया यासंबंधित बातम्या पाहता परत एकदा हे सिद्ध होत आहे कि "नक्षलवादी हे दहशतवादी" नाहीत....!

नक्षलवादाबाबत चर्चा करीत असताना आपणास त्याच्या बाबत प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे...!

भारतातील अन्यायकारक "जमीनदारी-वेठबिगारी पद्धती" विरोधात शोषित जनतेचे नेतृत्व स्विकारत "चारु मुजुमदार आणि कनू सन्याल" यानी 'नक्षलबारी" या खेडयात कसनारया लोकाना जमीन मिळावी म्हणून प्रथम सशत्र उठाव केला...!

या उठावाची परिणामकारकता इतकी स्पष्ट दिसून आली की प्रचलित कायदे,मानवता हेच काय अगदी देवाची सुद्धा भीति न राहिलेले "मुजोरडे जमीनदार" केवळ श्रमिकांचे कष्टच ओरबडत नसत तर त्याच्या तरुण स्त्रीया लहान मूली "जबरदस्तीने उपभोगत" असत...!

त्यांचे विरोधात तक्रार करावी तर तक्रार घेणारी यंत्रणा आणि न्याय करणारी व्यवस्था त्यांचीच "भाटगिरी" करणारी..हा अनुभव केवळ आदिवासी भागात नाही तर आपल्याला देखील अनेक वेळा आला असेल त्यामुळेच "शाहन्याने कोर्टची पायरी चढु नये" असे बोलले जाते...!

अशा परस्थितित कोणताही सामान्य माणूस बंडाचा मार्ग स्विकारेल.....पिचलेला समाज मग "शंभर दिवस शेळी बनून जगन्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन मेलेले चांगले" असा प्रमाणिक विचार करु लागतो तोच मार्ग "नक्षलबारी" ने दाखवला आणि नक्षलवाद चळवळीचा उगम झाला...!

प्रस्थापित व्यवस्थेविरोधात "सशस्त्र क्रांती"चा मार्ग देशाला अजिबात नवीन नाही...भारतीय राजकीय इतिहास पाहता सशस्त्र  क्रांतिची कल्पना देशाला नवीन नाही...शिवाजी महाराज देखील सशत्र क्रांतिकारकच होते..देशाच्या स्वतंत्र संग्रामात भगतसिंग,चन्द्रशेखर आझाद पासून ते नेताजी सुभाषचन्द्र बोस हेदेखील सशत्र लढले...क्रांतिसिंह नाना पाटील यांचे प्रतिसरकार आपण कसे विसरु शकतो...बिरसा मुंडा,तंट्या भिल्ल,उमाजी राजे, लहुजी वस्ताद याना बहुजन समाज कसा विसरेल...!

या सारया सशस्त्र चरित्र गाथा आपल्याला वाचताना ऐकताना बरे वाटते आपल्या हे सारे नायक आपल्याला जवळचे वाटतात....पण "नक्षलवाद चळवळी" बद्दल असलेला अपुरा अभ्यास आपणास त्यांचेबद्दल गैरसमज तयार करतो...!

भारत स्वतंत्र झालेनंतर खरे तर इथल्या बहुसंख्य भूमिहीन शेतमजुर,अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी,कामगार,कष्टकरी बहुजन समाजाला आता आपले कल्याण होईल असे वाटले होते...!

परंतु देशातील समाजवादी विचार जसजसा मागे पडत गेला स्वतंत्र संग्रामातील प्रत्यक्ष लढणारे नेतृत्व जसजसे कमी होत गेले तसतसे लोककल्याणकारी धोरण बदलत गेले...!

भांडवल धार्जिणे निर्णय घेत जंगल,जमीन,पाणी,हवा,खानिजे आणि सूर्यप्रकाश यावरील सार्वजनिक मालकी खाजगी करण्यात आली...जागतीकरणाचे नावाखाली बड़या आंतरराष्ट्रीय शेटजीना उदार सवलती मिळू लागल्या आहेत...!

सर्वसामान्य तरूणाला कामगार कायदे कमजोर करुन त्या शेटजिंकडे त्यांची स्वप्ने पूर्ण करायला "कंत्राटी स्वरूपातील नोकरया" करायला लावणे हा "औद्योगिक विकास" वाढला आहे...!

या अशा स्फोटक परिस्थितीत संविधानाला अभिप्रेत नसलेली हिंसा "वाट चुकलेले आपलेच देश बांधव" करीत आहे हे मलाही पटत नाही....त्याचा निषेधच करावा लागेल पण "नक्षलवाद म्हणजे धार्मिक" वा जातीय द्वेषाने हेतू पूर्वक केलेला अत्याचार नाही हे वास्तव स्विकारावे लागेल...!

नक्षलवाद हा प्रश्न मुळातून संपवणेसाठी भारतीय घटनेला अभिप्रेत असलेली आर्थिक,सामाजिक,राजकीय,संस्कृतिक समता स्थापन होणे गरजेचे आहे...!

याकरीता "सर्वकष, समान आणि शास्वत विकास" या संकल्पनेवर उभ्या असलेल्या "डाव्या" चळवळीतील राजकीय पक्षाना सत्ता मिळालेशिवाय तो बदल होईल अशी कल्पना करणे चुकीचे असेल.....!

कारण बाबासाहेब देखील म्हणाले होते राज्यघटना कितीही चांगली असली तरी त्याची "अमलबजावाणी करणारे" चांगले असले पाहिजेत....!

कदाचित हा लेख लिहला म्हणून मला कोणी "नक्षलवाद समर्थक" बोलेल कारण या व्यवस्थे विरोधात बोलणारा आवाज बंद करणेसाठी चळवळीतील तरुण कसे तुरुंगात सडवले जातात ते आपण वेळोवेळी पाहत आलो आहोत...गुन्हे सिद्ध न झालेमुळे अनेकजण निर्दोष मुक्तही झाले आहेत पण त्यांची उमेदिची 5 ते 10 वर्षे वाया गेल्यावर....!

आजही दिल्लीचे एक आंतरराष्ट्रीय किर्तीचे "प्रा.साईंबाबा" आणि महाराष्ट्रातील कबीर कला मंचचे कार्यकर्ते यांचे उदाहरण ताजे आहे...यातील "सचिन माळी" तर बाप होऊन देखील आपल्या स्वतःचे मुलाला 2 वर्षे झाली तरी मांड़ीवर खेळऊ शकला नाही यापेक्षा जास्त शिक्षा काय असेल...!

उदया कदाचित ते निर्दोष सुटतीलही पण गेलेली वर्षे परत मिळतील काय..? त्यांचे पेक्षा गंभीर आरोप असलेले "अमित शहा आणि नरेंद्र मोदी" यांचे प्रमाणे ते राजकीय सामाजिक पद प्रतिष्ठा मिळवतील काय...?

उत्तर नाहीच आहे....बरोबर ना...?

शिवराम ठवरे-07-01-2016
मुक्त पत्रकार-9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.
shivramthavare25@gmail.com

Wednesday 3 February 2016

सरसंघचालक मोहन भागवत यांची समरसता वर्षाच्या नियोजनाबाबत मी घेतलेली मुलाखत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे "सरसंघचालक मोहन भाागवत" यांची मी घेतलेली एक अविस्मरणीय मुलाखत...!

जागतिक विचारवंत,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि आपल्यासोबत 13 कोटी लोकांचे सामुदायिक धर्मांतर करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष भाजपाप्रणीत NDA सरकारने "सामाजिक समता आणि न्याय वर्ष" म्हणून घोषित केले आहे...!

भाजपचा मार्गदर्शक असणाऱ्या आणि संपूर्ण भारतात मनूस्मृतीवर आधारित धार्मिक राष्ट्र स्थापन करण्याचा अंतिम उद्देश असणाऱ्या "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने" देखील याचा आधार घेत "समरसता वर्ष" म्हणून साजरे करण्याचे घोषीत केले आहे...!

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना "पूजनीय स्वरूप" देण्याचा प्रयत्न चालवलेमुळे सामाजिक समतेसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे विचारवंत,नेते आणि डॉ.आंबेडकर यांना आदर्श मानून काम करणारे कार्यकर्ते या साऱ्यांना आश्चर्य वाटत आहे...!

अशा वातावरणात माझ्या मनातही चाललेला वैचारिक गोंधळ कमी करणेसाठी थेट "सरसंघचालक मोहन भागवत" यांचेशी संपर्क साधला आणी माझ्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबत असलेल्या काही शंकांची उकल करण्याचा हा छोटासा प्रयत्न केला...!

जागतिक पातळीवर अतीमहत्वाची व्यक्ती असल्यामुळे "झेड प्लस सुरक्षा व्यवस्था" असतानाही डॉ. मोहन भागवत यांच्यासोबत ही काल्पनिक मुलाखत घेताना एक वेगळाच अनुभव मिळाला....!

तुम्हालादेखील तुमच्या मनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाबत असणाऱ्या शंका दूर करायला या मुलाखतीचा खूप आधार होईल असे मला वाटते म्हणून हि मुलाखत सार्वजनिक करीत आहे....!

शिवराम ठवरे(मुलाखतकार)-नमस्कार आपल्यासारख्या व्यक्तीने माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद....मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीं आणि संघाच्या इतिहासाबाबतही काही विचारणार नाही...केवळ "समरसता आणी बाबासाहेब आंबेडकर" यांचे विषयीचे निवडक प्रश्न आपणास विचारेन.

उत्तर :- सरसंघचालक मोहन भागवत-समाजासाठी शकय तितका वेळ देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे...त्यामुळे आपल्यासोबत होणाऱ्या संवादाबाबत धन्यवाद देण्याची काहीच गरज नाही... तुमच्या मनातील कोणत्याही प्रश्नाला मी सरसंघचालक म्हणून निश्चित समाधानकारक उत्तरे देईन.

शिवराम ठवरे-बाबासाहेबांच्या 125 व्या जयंती वर्षात अचानक त्यांची संघाला आठवण यायला काय कारण आहे...यामागे काही रणनीती ठरवली आहे काय..?
उत्तर :- सरसंघचालक मोहन भागवत-बाबासाहेब संघाला स्थापनेपासूनच वंदनीय आहेत...त्यांची आणि त्यांच्या विचारांची मी स्वतःदेखील नियमित पूजा करतो...परंतु 125 वर्षे हा एक महत्वाचा टप्पा वाटतो म्हणून आमच्या संघस्वयंसेवकांमध्ये समरसता यावी याकरिता यावर्षीपासून विशेष लक्ष देण्याचे निश्चित केलेले आहे.

शिवराम ठवरे-बाबासाहेब आंबेडकर "हिंदू धर्माचे शत्रू" होते असा प्रचार काही संघप्रणीत हिंदू संघटनाकडून केला जातो त्यांच्या धर्मांतरालादेखील हिणवले जाते हे माहित असूनही तुम्ही बाबासाहेब संघाला पूजनीय आहेत असे कशाच्या आधारावर बोलता...?

उत्तर :- सरसंघचालक मोहन भागवत-संघाने अधिकृतपणे कधीही "बाबासाहेब हिंदूद्वेषी" होते असे जाहीर केलेले नाही.... आमच्या "उपसंघटना" स्वतंत्र विचारांच्या आहेत त्यामुळे त्यांचे मत व्यक्त करण्याचे त्यांना स्वातंत्र आहे..सध्या केवळ मुस्लिम आणी ख्रिश्चन धर्माचे आव्हान माघारी लावणे असे संघाचे धोरण आहे...बौद्ध लिंगायत शिख जैन आणि इतर धर्मांचे अस्तित्व संपवणे हे दीर्घकालीन धोरण आहे...तोपर्यंत मी देखील नसेन आणि तुम्हीदेखील असाल असे मला वाटत नाही... सामाजिक बदल ही काही एका वर्षात होणारी प्रक्रिया नाही ते दीर्घकालीन धोरण आहे.

शिवराम ठवरे-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला "सामजिक समरसता" याचा नक्की अर्थ काय अपेक्षित आहे..?

उत्तर :- सरसंघचालक मोहन भागवत-संघाची संरसतेची संकल्पना खूप सोपी आहे...इथल्या मूळच्या "सिंधुजन अनार्य संस्कृतीचा" नाश करून परकीय ब्रह्माणी पुरुषसत्ताक पद्धती निर्माण करणे या एकमेव उद्देशाने आमचे बाहेरून आलेले आर्य पूर्वज वेगवेगळ्या मार्गाने हजारो वर्षे झाली प्रयत्न करीत आहेत...पण "सिंधूजन अनार्य संस्कृती" नाश होणार नाही हे लक्षात आल्यामुळे आम्ही तीच आमची संस्कृती म्हणवून घ्यायला सुरुवात केली याचप्रमाणे इथल्या सर्व जाती धर्मातील लोकांना संघाने प्रमोट केलेला विचारच स्वीकारावा लागेल म्हणजे यात मिसळून समरस व्हावे असा सोपा अर्थ आहे....वर्णव्यवस्थेनुसार जन्माने मिळणाऱ्या प्रत्येक जातीला नेमून दिलेले काम करायला कमीपणा न वाटता ते काम सामाजिक हित म्हणून करावे म्हणजे समरसता...आजची पिढी शिक्षित झाली आहे त्यामुळे पाप-पुण्याची भीती त्यांना वाटत नाही आणि "दशावतार" सारख्या "काल्पनिक कथा" आता कोणी स्वीकारत नाही त्यामुळे अशी गोंडस नावे ठेऊन समाजात जावे लागते.

शिवराम ठवरे-बाबासाहेब हयात असताना "अस्पृश्यता निर्मूलन,जातप्रथा निर्मूलन" याकरिता संघाने कधीच मदत केली नाही उलट त्यांच्या प्रत्येक सामाजिक बदलाचे कामास हिंदूंच्या संघटना विरोधच करत होत्या आणि आता तुम्ही त्यांच्या विचरांवर चालायचे ठरवले आहे हे कसे शक्य झाले...?

उत्तर :- सरसंघचालक मोहन भागवत-मला मान्य आहे हिंदुत्ववादी लोकांनी भूतकाळात बाबासाहेब आंबेडकर याना खूप त्रास दिला आहे...अगदी राज्यघटना समितीवर बाबासाहेब नकोत अशीच संघाची भूमिका होती...घटना संमत होताना झालेली चर्चा आजही लोकसभा ग्रंथालयात उपलब्ध आहे त्यामध्ये अनेक हिंदुत्ववादी नेते विरोध करताना दिसतील अगदी हिंदू कोड बिलास देखील त्यांचा विरोधच होता..पण आता त्याचा सर्वच लोकांना विसर पडला असून तितका खोलवर अभ्यास करणारी पिढी आताची नाही. बाबासाहेबांच्या नावाखाली जागृत असणाऱ्या आंबेडकरी अनुयायांचे निर्दालन करणे हा एकमेव उद्देश आहे...चवदार तळ्यावर बाबासाहेबाना मारणारी वृत्ती मनुवादीच होती पण आता "गोड बोलून फसवणे" हाच एकमेव पर्याय आहे त्यामुळे आम्ही बाबसाहेब जवळ केले आहेत.

प्रश्न क्रमांक सहा :- शिवराम ठवरे-शेवटचा प्रश्न समरसता वर्ष साजरे करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आगामी "कृतीकार्यक्रम" काय असेल...?

उत्तर :- सरसंघचालक मोहन भागवत-अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात त्याबाबद्दल तुमचे अभिनंदन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अंतर्गत असलेला विरोध झुगारत "पंचशील" हे सूत्र लक्षात ठेवत खालील प्रमाणे "पाचकलमी कार्यक्रम" तयार केला आहे.

1. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व शाखा कार्यालयावर "राष्ट्रध्वज तिरंगा आणि पंचशील ध्वज" फडकावणे.

2. संघाचे शाखेत "बाबासाहेब आंबेडकर याची प्रतिमा" लावणे व त्यास दररोज "त्रिसरण आणि पंचशील" म्हणत अभिवादन करणे...याचा अधिक प्रचार व्हावा म्हणून सर्व संघ स्वयंसेवक आणि संघाच्या कोणत्याही शाखेत भेट देणाऱ्या व्यक्तीस बाबासाहेबांची प्रतिमा आणि त्रिसरण पंचशील असलेली हँडवेल भेट देण्यात येईल.

3.संघाचे शाखेत येणाऱ्या सर्वांना जातव्यवस्था निर्दालन व्हावी याकरिता "आंतरजातीय विवाह" करावेत म्हणून प्रोत्साहित किले जाईल त्याचाच एक भाग म्हणून "आंतरजातीय विवाह केलेल्या व्यक्तीचीच पदाधिकारी" म्हणून निवड केली जाईल.

4.बाबासाहेबानी धर्मांतर करताना दिलेल्या "22 प्रतिज्ञा" दररोज म्हणून त्याचे अनुकरण करावे असा दंडक केला जाईल.

5.भारतीय "संविधानाचे पारायण" सुरु केली जाईल आणि त्याचा अर्थ उलगडून सांगणेकरीता अभ्यासू लोकांची नियुक्ती करण्यात येईल.

वरील "पंचसूत्रीचा" किमान पुढील 10 वर्षेतरी अंमल व्हावा हे आमचे धोरण आहे माझी या खूप महत्वाच्या मुद्यासाठी मुलाखत घेतलीत त्याबद्दल धन्यवाद आभारी आहे.

शिवराम ठवरे- 03-02-2015
मुक्त पत्रकार 9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.
Shivramthavare25@gmail.com

टिप- वरील संपूर्ण काल्पनिक मांडणी तयार करण्यात आमचे विद्रोही मित्र डॉ. जालिंदर घिगे,दिग्विजय पाटील,मयुर खराडे,युवराज जाधव,गौतम कांबळे,राहुल गंगावणे,रोहित क्षीरसागर आणी निलेश पाटील यांच्यासोबत रविवार दिनांक 31 जानेवारी 2016 रोजी सातारा येथे केलेली चर्चा खूप उपयोगी पडली असून "मोहन भागवत" यांनी वेळ दिल्यास प्रत्यक्ष मुलाखत घ्यायला आनंद वाटेल.