Sunday 19 February 2017

समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्र सोशल मीडिया नियमावली

समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्र

नमस्ते,
महाराष्ट्रातील समाजकार्य पदवीधरांच्या(MSW आणि BSW) प्रश्नावर काम करणाऱ्या  करण्यासाठी अनिल गायकवाड (लातूर) यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्रच्या कामांची प्रसिद्धी तसेच सभासदांशी संवाद आणि महाराष्ट्रातील समाजकार्य पदवीधरांशी संवादाच्या हेतूने हे व्हाट्सग्रुप बनवले आहेत...!

संस्थेच्या संघटनासाठी यापूर्वी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी 23 छोट्या मोठ्या बैठका घेतल्या होत्या...2013 पासून संस्था उभारणीसाठी बरेच कार्यकर्ते जनजागृती करत होते त्याला पुण्यात झालेल्या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात आले यामध्ये समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र अर्थात Social work Gratitude's Welfare Association,Maharashtra अशा नावाने नोंदणी प्रक्रिया सुरु करावी असे ठरले.संस्थेचे अध्यक्ष म्हणून अनिल गायकवाड-लातूर उपाध्यक्ष संदीप आखाडे आणि खजिनदार वर्षा डांगे तर शिवराम ठवरे आणि हरिभाऊ सणस यांची सेक्रेटरी म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली...त्यानंतर संस्थेच्या 3 अधिकृत बैठकी झाल्या आहेत...!

समाजकार्य पदवीदधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र नावाची नोंदणी प्रक्रिया चालू असल्यामुळे आपण अजून अधिकृत सभासद नोंदणी  केलेली नाही परंतु प्राथमिक संवादाच्या माध्यमातून आपल्याशी आजपर्यंत सुमारे 550 पदवीधर संपर्कात आहेत ते सभासद होण्यास इच्छुक आहेत त्यांची नाव,मोबाईल नंबर आणि इ-मेल आयडीसह प्राथमिक माहिती माझ्याकडे एकत्रित संकलित केलेली आहे...अजूनही कोणाला स्वतःची माहिती दयायची इच्छा असेल तर त्यांनी मला *खाली दिलेल्या मेल आयडीवरती तुमचे नाव मोबाईल नंबर कॉलेज आणि सध्याचे ठिकाण यासह प्राथमिक माहितीचा मेल करावा* हि विनंती...!

आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईबीसी सवलत,मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती समाजकार्य महाविद्यालयास एक विद्यापीठ एकच फी आणि समान प्रवेशप्रक्रिया याची मागणी,NGO/Project बेस कामगारांना व त्यांचा संघटनांना मार्गदर्शन करणे,NGO मधील कामगारांना कामाचे तास,किमान वेतन पीएफ इएसआयसी ग्रॅच्युटी आदी लाभ मिळावेत या आणि इतर प्रश्नावर काम सुरु केले आहे...!

आपणही आपणांस माहित असलेले प्रश्न उपस्थित करावेत आणि इतर सहकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला मदत करावी...महाराष्ट्र्रात सध्या  ठीकठिकाणी मिटिंग नियोजन चालू आहे आपणही मदत करा सहभागी व्हा...आपणांस समाजकार्य पदवीधरांसाठी नोकरी मेळावे आणि नोकरीची गरज असणाऱ्या सर्वांची एकत्रित माहिती गोळा करून त्यांचे रिजुम एकत्रित करता येतील काय असाही प्रयत्न चालू आहे...!

आपणांस विनंती आहे...ग्रुपचे नाव किंवा ग्रुप आयकॉन बदलू नये... जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारे,शुभेच्छा किंवा पर्सनल टीका टिपणी करणारे अनावश्यक मेसेजेस पाठवू नयेत... गैरवर्तन करणाऱ्या कोणासही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात येईल..!

आपण सगळे उच्चशिक्षित आहोत वारंवार सांगण्याची गरज नसावी...कुणाला काही अधिक शंका असतील तर पर्सनल मेसेज करून विचारावं निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल..!

शिवराम ठवरे-9175273528
सेक्रेटरी-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र.
shivramthavare25@gmail.com

भारती विद्यापीठ शिष्यवृत्ती प्रश्न Bhrati University SC ST VJ NT SBC OBC Scholarship issue

समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र

खुल्या प्रवर्गातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ईबीसी सवलतीच्या प्रश्नासोबत आता अभिमत विद्यापीठातून (भारती विद्यापीठ आणि टाटा इन्स्टिट्यूट) समाजकार्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाना भारत सरकाराच्या शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती आणि शिष्यवृत्ती योजनेचा लाभ पूर्ववत होण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे...!

काल पुण्याच्या भारती विद्यापीठात MSW चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चेतून त्यांना भारत सरकारच्या शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती आणि शिष्यवृत्तीयोजनांचा लाभ मिळत नाही अशी माहिती समजली...त्यांनतर ताबडतोब समाजकार्य पदवीधर मंडळाच्यावतीने हरिभाऊ सणस यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष संदीप आखाडे यांच्यासह आम्ही महाविद्यालयाचे प्राचार्य/डायरेक्टर मा.राठोड सर यांना लेखी निवेदन देऊन याबाबत खुलासा करण्याची मागणी केली...!

सदर निवेदनासोबतच आम्ही प्राचार्य राठोड आणि प्रा. किर्तीराज सर यांच्यासोबत समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळातर्फे चाललेले संघटन आणि कार्यक्रमांबाबत चर्चा केली...दोघांनाही संघटनांचे कौतुक केले भारती विद्यापीठात मंडळामार्फ़त समाजकार्य पदवीधरांचे प्रश्नांबाबत एखादे चर्चासत्र आयोजित केले तर आम्ही नक्की सहकार्य करू असे आश्वासन दिले आहे..!

यानिमित्ताने आपणांस विनंती आहे की अभिमत महाविद्यालयातून शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची भारत सरकार शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती व शिष्यवृत्ती काही वर्षे झाली बंद केलेली असून त्याबाबत अधिक माहिती,संदर्भातील शासननिर्णय यांचा अभ्यास करून आपण पुढील दिशा ठरवून सरकारकडून हा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे...!

आपणांस याबाबत अधिक माहिती असेल किंवा काही प्रश्न असतील तर नक्की संपर्क करावा...!

शिवराम ठवरे-9175273528
सेक्रेटरी-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र
shivramthavare25@gmail.com

दुसरा दिवस उत्तर मिळाले

मित्रांनो आताच समाजकल्याण विभागाच्या वेबसाईटवर माहिती घेतली आहे...तसेच समाजकल्याण आयुक्त कार्यालय पुणे यांचेशीदेखील फोनवरून संपर्क केला आहे...भारती विद्यापीठमधील MSW अभ्यासक्रमास भारत सरकारच्या शुल्क प्रतिपूर्ती आणि शिष्यवृत्तीला पात्र आहे त्याचा महाविद्यालय कोड 14511 B.V.D.U Social Sciences Center असा आहे कृपया फॉर्म भरावेत...!

कृपया शासनाच्या https://mahaeschol.maharashtra.gov.in/MahaEschol/Scholarships/Account/Login.aspx#1 या संकेतस्थळावर भेट देऊन लवकरात लवकर आपले अर्ज भरावेत...31 जानेवारी 2017 अशी शेवटची तारीख आहे...काही अडचण आली तर नक्की संपर्क करा...!

शिवराम ठवरे-9175253528
सेक्रेटरी-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र
shivramthavare25@gmail.com

YCSSW माजी विद्यार्थी मेळावा

बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा महाविद्यालयातील परिसरात काल आयोजित केलेल्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्कचा आजी-माजी विद्यार्थी संवादाचा कार्यक्रम खूप उत्तम झाला...अधिकृत माजी विद्यार्थी संघ आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्कचे विद्यार्थी,प्राचार्य,प्राध्यापक आणि व्यवस्थापणाचे आभार..!

कार्यक्रमाच्या निमित्ताने होणाऱ्या भेटी चर्चा महत्वाच्या असतात म्हणून मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होतो...त्यातच समाजकार्य पदवीधरांची संघटना उभराणी चालू असल्यामुळं मला ज्युनिअर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर(हेदेखील माझ्यासाठी नवीन)तुम्ही आलंच पाहिजे आमची भेट होईल असा आग्रह केलेला होता...आमच्या बॅचचे फक्त हिना,पौर्णिमा,विकी शशी आणि प्राजक्ता एवढेच जण होतो त्यामुळं चुकल्यासारखं वाटत होतं.. पण मला ओळखणारे इतके जण आहेत याची जाणीव पहिल्यांदाच झाली..!

प्रदीप मोरे,साईदर्शन,राहुल कांबळे,हेमेंत भोसले आदी जेष्ठ मार्गर्शकांची भेट बऱ्याच दिवसांतून भेट होऊ शकली...प्राचार्य शाली जोसेफ नेहमीप्रमाणे आवर्जून "मेरे को मिल के जाना" असं सकाळीच बोलल्या होत्या त्यांचाशीदेखील खूप गप्पा झाल्या...विजय माने सर,मनीषा मॅडम,प्रमोद सर भाई सर जीवन सर यांच्याशी वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा संवाद झाला..विशेष बाब म्हणजे सोशल मीडियावर नेहमी संवाद करणाऱ्या पण समोर कधीच न भेटलेल्या सुजाता जाधव यांची भेट झाली...!

विशेष म्हणजे आपल्याला काय डान्स जमत नाही म्हणून कार्यक्रमातून लांब पळणाऱ्या चेतन कणसे आणि मला भाई सरांनी लपलेलो असताना शोधून काढून डान्स करायला लावलाच आणि सोबतीला दिवसभर न बोलणाऱ्या स्वतः समता मॅडम आल्या,गौरी आणि इतर ज्युनिअर मित्रांनी देखील मला नाचवलं आणि माझा नाईलाज झाला...आता विनंती एवढीच आहे..त्याचं कुणी शूटिंग केलं असेल तर मलादेखील परत दाखवून लाजवू नका...!

दिवसभराच्या कार्यक्रमात संस्थेचे मार्गदर्शक मा. लक्ष्मण माने यांची किशोर काळोखेंनी घेतलेली मुलखात वैचारिक होती..कारण त्या मुलाखतीतून काही नवीनच प्रश्न उपस्थित झाल्यासारखं वाटलं त्याबद्दल दादांशी सविस्तर बोलावं लागेल...कारण कार्यकर्ता म्हणून मला त्यातील काही मुद्दे पटणारे नाहीत...!

रात्री पहिल्यांदाच आजी-माजी विद्यार्थी आयोजित उमंग चा बहारदार कार्यक्रम झाला..कालचा दिवस खरंच छान केला रोजच्या रहाटगाडग्यातून तेवढीच उसंत मिळाली...मागच्या काही कारणांमुळे माझ्याशी जराही न बोलणाऱ्या संपदा मॅडम आणि कृष्णा शिपकुले यांच्याशी स्वतः जाऊन माफी मागावी आणि संवाद सुरु करावा अशी मनातली भावना मात्र मनातच राहिली....!

शिवराम ठवरे-9175273528
माजी विद्यार्थी-यशवंतराव चव्हाणस्कूल ऑफ सोशल वर्क,जकातवाडी सातारा
shivramthavare25@gmail.com

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकत समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्रचा प्रकाश (राजू) देसलेना पाठिंबा

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०१७

समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्रचा प्रकाश (राजू) देसले याना जाहीर पाठिंबा

महाराष्ट्रातील MSW आणि BSW पदवीधरांच्या शिकत असताना असणाऱ्या स्वतंत्र विद्यापीठ,प्रवेश,अभ्यासक्रम तसेच कोर्स फी,ई.बी.सी.,भारत सरकार शिष्यवृत्ती आणि शिक्षण झाल्यानंतर बेरोजगारी, कंत्राटी नोकरी आणि त्यातील नियमन,NGO कडून होणारी फसवणूक आदी प्रश्नाच्या सोडवणुकीच्या उद्देशाने स्थापन झालेला राज्यव्यापी मंच म्हणून समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाची थोड्याच दिवसात ओळख निर्माण झालेली आहे...!

आपल्या संघटनेच्या नाशिक आणि परिसरातील जेष्ठ पदवीधर मतदारांच्यासोबत आपल्या संघटनेचे नाशिकमधील कार्यकर्ते माधुरी पाटील,राणी जाधव,दिपक देवरे,किरण गोरे,गोकुल मेडगे,मंगेश निकम यांच्या पुढाकाराने काल रविवार दिनांक २९ जानेवारी २०१७ रोजी झालेल्या बैठकीत आजवर पदवीधरांच्या हक्कांसाठी आणि कामगार - कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे चळवळीतील कार्यकर्ते प्रकाश (राजू) देसले यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....!

मित्रांनो पदवीधरांच्या समस्या लोकशाही मार्गाने वरिष्ठ सभागृहात चर्चेला याव्यात त्या समस्या सुटाव्यात म्हणून शासनाने त्याकरिता विविध कायदे बनवावेत शासन निर्णय घ्यावेत याउद्देशाने पदवीधर प्रतिनिधींची निवड करण्यात येते परंतु प्रस्थापित राजकीय पक्ष  पदवीधर आमदार म्हणजे केवळ संख्याबळ वाढवण्यासाठीच असतो असे गृहीत धरतात म्हणून न  बोलणारा सांगेल तेव्हा हात वर करणारा मुका बाहुला त्यांना निवडून येणे अपेक्षित असते...!

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या ७० वर्षांतही शिकलेल्या लोकांचे प्रश्नही सुटलेले नाहीत हे वास्तव आहे...म्हणूनच आपण गेली अनेक वर्षे आयटक या भारतातील पहिल्या आणि देशव्यापी कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार कल्याणासाठी संघर्ष करणाऱ्या प्रकाश (राजू) देसले यांना या निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांच्यासोबत संघटनेचे उपाध्यक्ष संदीप आखाडे यांच्याशी झालेल्या चर्चेतून MSW आणि BSW पदवीधरांचे प्रश्न कायमचे सुटावेत यासाठी काम करण्याचे आश्वासनही मिळालेले आहे...!

प्रकाश (राजू) देसले हे सर्वसामान्य पदवीधरांचे खरे प्रतिनिधी असून बेरोजगार पदवीधरांच्या आजी-माजी सत्ताधाऱ्यांनी निर्माण करून ठेवलेल्या सत्तर वर्षांतील समस्यांना विधानपरिषदेत वाचा फोडतील...!

आपलं प्रथम पसंतीचं मत प्रकाश (राजू) देसले यांना देऊन विजयी करा ही विनंती.

शिवराम ठवरे-9175273528
सेक्रेटरी-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र.
shivramthavare25@gmail.com

एन. जी. ओ. कर्मचारी वेतन राष्ट्रीयकृत बँकेत व्हावे...डिजिटल इंडिया NGO Workers Pyament

महाराष्ट्रातील एन.जी. ओ. मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत व्हावेत...समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्रची मागणी...!

पुणे-2-फेब्रुवारी-2017:- महाराष्ट्रातील सर्व सामाजिक आणि धार्मिक संस्था अर्थात N.G.O. मध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेमार्फत करावेत अशी मागणी करणारे पत्र समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्राने आज महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांकडे पाठवले आहे...!

आता सध्या राज्यातील सामाजिक आणि धार्मिक संस्था अर्थात N.G.O. मध्ये काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाची संख्या काही लाखात आहे परंतु त्यांच्या वेतनाबाबत कोणतेही नियमन नाही आणि त्यामुळेच त्या संस्था आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार आपल्या सोईनुसार रोख,डी.डी,चेक इत्यादी प्रकारे करत आहेत....यातून बऱ्याच वेळा फसवणूचे प्रकारही घडतात...!

त्याचबरोबर केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या शासनाचे डिजिटल इंडिया अंतर्गत पारदर्शक आणि कॅशलेस व्यवहार करण्याचे धोरण अवलंबले आहे याचा NGO मधील कर्मचाऱ्यांना लाभ व्हावा या हेतूने समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाचे अध्यक्ष मा. अनिल गायकवाड,उपाध्यक्ष संदीप आखाडे, खजिनदार वर्षा डांगे,हरिभाऊ सणस तसेच पदाधिकारी आणि इतर अनेक कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार सदर मागणी केलेली आहे...!

धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून या पत्रास सकारात्मक प्रतिसाद मिळावा म्हणून याच्या प्रती कामगार विभाग आणि मुख्यमंत्री तसेच प्रधानमंत्री यांच्या कार्यालयाकडे पाठपुरावा व्हावा म्हणून पाठवण्यात येतील...!

आपणांस अशा कोणत्या NGO माहित असल्यास की ज्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार अजूनही रोख,डी.डी. अथवा चेकने दिले जातात आणि त्यामुळे फसवणूक होत आहे तर आमच्याशी नक्की संपर्क करावा...!

शिवराम ठवरे-9175273528
सेक्रेटरी-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र
Shivramthavare25@gmail.com

एन. जी. ओ. कर्मचाऱ्यांना किमान वेतन Minimum Wages for NGO Workers

महाराष्ट्रातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंद असणाऱ्या सर्व सामाजिक आणि धार्मीक संस्थां अर्थात NGO मधील सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा कायदा लागू आहे...महाराष्ट्राच्या कामगार आयुक्त कार्यालयातून माहिती अधिकारात आजच याबाबत लेखी माहिती मिळाली आहे...!

महाराष्ट्रातील समाजकार्य पदवीधरांच्या (MSW-BSW) प्रश्नावर काम करण्यासाठी तयार झालेल्या समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाच्या 26 नोव्हेबर 2016 रोजी पुण्यात झालेल्या बैठकीतील ठरावानुसार मंडळाचे अध्यक्ष अनिल गायकवाड पदाधिकारी संदीप आखाडे,वर्षा डांगे,हरिभाऊ सणस यांच्या सूचनेवरून केलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जास उत्तर मिळाले आहे

आता याची अमलबजावणी होण्याच्या दृष्टीने मिळणाऱ्या किमान वेतनाचे सध्याचे निश्चित दर किती आहेत ते पाहावे लागतील आणि त्यानुसार किमान वेतन मिळत नसल्यास कारवाई करावी अशी मागणी करता येईल...माझ्या माहिती प्रमाणे सध्या महाराष्ट्रात 7200 रुपये किमान वेतन आहे आणि प्रत्येक 6 महिन्यांनी त्यात वाढ केली जाते...!

आपणांस विनंती आहे...कोणत्याही NGO मध्ये किमान वेतन मिळत नाही असे वाटत असल्यास आमच्याशी नक्की संपर्क करा...!

आता यापुढे जाऊन हा मिळणारा पगार पेमेंट ऑफ वेजेस कायद्यानुसार (500 पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर 10 अन्यथा महिन्याच्या 7 तारखेच्या अगोदर आपल्या खात्यात जमा व्हावा यासाठी प्रयत्न करूयात कारण बहुतांश संस्था निधीचे कारण सांगून नियमित पगार देत नाहीत...!

शिवराम ठवरे-9175273528
सेक्रेटरी-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र
shivramthavare25@gmail.com

NGO Workers एन. जी.ओ. कर्मचारी फसवणूक

समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र

प्रत्येक आठवड्यात एका तरी NGO ची तक्रार येत आहे...पगार नाही दिला...अपॉइंटमेंट लेटर नाही...कामावरून काही न सांगता काढले...12-12 तास कामावर राबवतात...स्वतःच्या कामगारांचे शोषण करू पाहणाऱ्या असल्या NGO समाजासाठी काय काम करणार..?

आजवर तक्रार कुणाकडे करायची असा प्रश्न होता पण आता समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्र नावाचा या आणि अशाच प्रकारच्या प्रश्नांवर काम कारण्यासाठी सक्षम राज्यव्यापी मंच उभा राहिला आहे...अनिल गायकवाड,वर्षा डांगे,संदीप आखाडे,विक्रांत मोरे,हरिभाऊ सणस,गजानन देशमुख,अमितकुमार अजनाळकर,सागर धुमाळ,शैला यादव आणि इतर अनेक सहकारी मित्र आपआपलं काम पहात मंडळाचे काम करत आहेत...!

आतापर्यंत अनेक NGO मधील आमच्याकडे आलेले प्रश्न कधी प्रेमाने...सामंजस्याने...कधी सध्या पत्रव्यवहारने...कधी सोशल मीडियाचा प्रभावी वापर तर कधी कधी शासनाकडे पत्रव्यवहार करून सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे..याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे...!

आपणासही स्वतःला असे प्रश्न असतील किंवा आपणांस असे प्रश्न असणारे सहकारी माहीत असतील...तर नक्की आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याशी संपर्क साधा...कोणताही मोबदला न घेता मार्गदर्शन करण्यात येईल...कोणतेही खोटे आश्वासन नाही आणि सदस्यत्व स्वीकारावं असं बंधन नाही...!

शिवराम ठवरे-9175273528
सेक्रेटरी-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र.
shivramthavare25@gmail.com

सोस्वा अर्थात स्टापी कर्मचारी आंदोलन दुसरा दिवस 19-02-2017

सोस्वातील कर्मचाऱ्यांचे शोषण

SOSVA Training and Pramotion Institute http://stapi.org नावाच्या येरवडा पुणे येथील नामांकित NGO मधील कर्मचाऱ्यांचा आत्मकेश आंदोलनाचा आज दुसरा दिवस पूर्ण होत आहे...आजची रात्र देखील कर्मचारी ऑफिससमोर बसून राहणार आहेत...आज सुट्टी होती तरी कर्मचारी ठाण मांडून बसले होते तर संस्थाचालक आणि अधिकारी निवांत घरी मजेत असतील...!

आता उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे...सकाळी पुन्हा दडपशाही होण्याची शक्यता आहे...पाहुयात कर्मचारी एकजूट आहेत त्यांनी आता..सोस्वा कर्मचारी कृती समितीअशा नावाने इंफॉर्मल गटदेखील बनवला आहे...!

MSW आणि BSW पदवीचे सोशल वर्क मधील शिकेलेलं जीवनात अमलात आणत आहेत हाच आनंद आहे... संकटापासून पळून जाण्यापेक्षा त्याच्याशी दोन करणार असा निर्धार त्यांनी केला आहे..खरच कौतुकास्पद..!

शिवराम ठवरे-9175273528
मुक्त पत्रकार-19-02-2016
सेक्रेटरी-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र
shivramthavare25@gmail.com

सोस्वा अर्थात स्टापी संस्था कर्मचारी आंदोलन पहिला दिवस 18-02-2017

SOSVA Training and Pramotion Institute http://stapi.org नावाच्या येरवडा पुणे येथील नामांकित NGO मधील कर्मचाऱ्यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली...पुण्यात सगळीकडं प्रचाराची धामधूम असताना उच्चशिक्षित असणारे हे तरुण आपल्या न्याय्य मागण्यासाठी संस्थेच्या व्यवस्थापकांनी चर्चा करून तोडगा काढवा यासाठी आत्मक्लेश म्हणून संस्थेच्या दारात धरणं धरून बसले आहेत...!

काय आहेत मागण्या..?

कर्मचार्यांनी दिलेल्या पत्राचे अवलोकन केले असता त्यांचा खालील फक्त तीनच प्रमुख मागण्या आहेत असं समजतं...!

1.बेकायदेशीर निलंबित केलेल्या 4 सहकारी मित्राचं निलंबन मागे घ्यावे.
2.ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करून घेतले त्याचा अधिकचा मोबदला अर्थात ओव्हरटाईम मिळावा.
3.पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जलस्वराज्य प्रकल्प 2 वर काम करणाऱ्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना शासनाने ठरवलेल्या नियमानुसार वेतन दिले जावे सध्या 2 ते 3 हजार कमी दिले जात आहेत त्यासोबत ठरलेला प्रवास भत्ता आणि मोबाईल भत्ता दिला जात नाही तो नियमित मिळावा.

याचबरोबर बाकी इतरही प्रश्न आहेत यामध्ये..वेळच्या वेळी पगार मिळावा,ऑफिस टाईम ठरवावा,नियमानुसार पगारी सुट्या मिळाव्यात,सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांना अनुभव प्रमाणपत्रं दिली जावीत इत्यादी यासाठी संस्थेच्या अधिकारी आणि व्यवस्थापनांनी चर्चा करून प्रश्न सोडवावा यासाठी विनंती अर्ज दिलेला होता ऑफिस संपण्याची वेळ संध्याकाळी 5.30 पर्यंत कोणताही प्रतिसाद न दिल्यास आत्मक्लेश म्हणून संस्थेच्या दारात बसून राहायचा आणि आपली मागणी मान्य न होईपर्यंत घरीच न जाण्याचा निर्णय त्यांनी पत्रात सांगितला होता...!

व्यवस्थापणाचे पूर्णतः असहकार्य

संस्थेला याबाबत कर्मचाऱ्यांनी पूर्वसूचना दिलेली असताना देखील आजच्या संपूर्ण दिवसात चर्चा झाली नाही...संस्थने कोंडून ठेवलेल्या कर्मचारी वर्गास बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बोलावून पोलीस चौकीत जावं लागलं आणि त्यानंतर चर्चा न करताच विश्वस्त आणि व्यवस्थापणाने पळ काढला...!

त्यांनी चर्चा करावी म्हणून मी संस्थेच्या CEO कानिटकर मॅडम यांना स्वतः फोनही लावला पण उलट मी धमकी दिल्याचे खोटंच सांगत पोलीस स्टेशनला मॅडमनी धाव लगेच  घेतली...परंतु पोलिसांना मी त्यांना केलेला आपला फोन रेकॉर्डिंग केला आहे आणि तो सोशल मीडियावर टाकलेला आहे असं सांगताच तिचा मॅडमचा चेहरा रडवेला झाला...संस्थेच्या मते 30 वर्षात अशी कधी तक्रार नाही त्यांचा एक विश्वस्त सांगत होत्या...आम्ही सर्व नियम पाळतो...उत्तम सामजिक काम करतो...संस्थचे विश्वस्त निवृत्त सरकारी अधिकारी आहेत...वकील आहेत आम्ही काय ते पाहून घेऊ आम्ही सरकारी माणसांना कसेही मॅनेज करू...!

मी स्वतः तसंच कर्मचारी आणि पोलिसांनी देखील चर्चा करून हा प्रश्न सोडावा अशी व्यवस्थापणास विनंती केली परंतु त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही...संस्थेकडे लेखी मागण्यांचे निवेदन दिलेले आहेच त्याचबरोबर पुण्याच्या कामगार आयुक्त कार्यालय...जिल्हा परिषद पुणे आणि याठिकाणी देखील याच्या प्रती दिलेल्या आहेत...पोलिसांनी आणि धर्मादाय आयुक्तांनी आमच्या अखत्यारीत कामगार विषय येत नाही त्यामुळे निवेदन स्वीकारले नाही...!

सहकारी मित्रांचे नेहमीप्रमाणे मार्गदर्शन

संपूर्ण दिवसभरात या प्रश्नाच्या बाबतीत आमचे मार्गदर्शक विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे उपाध्यक्ष कॉ.विजय मांडके,पुण्यातील हमाल पंचायतीचे साथी नितीन पवार,पत्रकार मित्र हर्षल लोहकरे,समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाचे उपाध्यक्ष संदीप आखाडे,सहसचिव हरिभाऊ सणसयांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन घेतले..तर आमचा सहकारी सागर धुमाळ स्वतः उपस्थित होता..!

पोलिसांचे सहकार्य

पुण्याच्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असूनही येरवडा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री.अशोक कदम आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे मा. लोहार साहेब यांनी प्रश्न समजून घेतला आणि लोकशाही मार्गाने चाललेल्या तुमच्या आंदोलनास आम्ही अडवू शकत नाही असं संस्थेच्या पदाधीकाऱ्यासमोरच सांगितले त्यामुळं खूप बरं वाटलं...!

चर्चेसाठी दिलेली मुदत संपली आणि आता...

आज दिवसभरात कोणतीही सकारात्मक चर्चा न झाल्यामुळं अजूनही सर्व कर्मचारी दारासमोर बसलेले आहेत...माहित नाही चर्चा कधी होईल पण कर्मचारी आपल्या मतावर ठाम आहेत याचा आनंद आहे...आता 5 महिला कर्मचाऱ्यासह 13 जण संस्थेच्या दारातच रात्र काढणार असल्याचं कळवलं आहे..संस्थेच्या निगरगट्ट प्रशासनाचा निषेध...लोकशाही मार्गाने सुरु झालेल्या आंदोलनास सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी प्रसिद्धी दिलीत त्यामुळं याची सगळ्या सामजिक संस्थच्या वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार...!

संस्था आणि कर्मचारी यांच्यात लवकरात लवकर चर्चा होऊन सकारात्मक मार्ग लवकरात लवकर निघेल अशी आशा करूयात...यांच्यासारख्या इतरही कामगार हितविरोधी संस्थांना जाग येवो हीच इच्छा आहे...लडेंगे जितेंगे...!

शिवराम ठवरे-9175273528
मुक्त पत्रकार-18-02-2017
सेक्रेटरी- समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र