Sunday 19 February 2017

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकत समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्रचा प्रकाश (राजू) देसलेना पाठिंबा

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०१७

समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्रचा प्रकाश (राजू) देसले याना जाहीर पाठिंबा

महाराष्ट्रातील MSW आणि BSW पदवीधरांच्या शिकत असताना असणाऱ्या स्वतंत्र विद्यापीठ,प्रवेश,अभ्यासक्रम तसेच कोर्स फी,ई.बी.सी.,भारत सरकार शिष्यवृत्ती आणि शिक्षण झाल्यानंतर बेरोजगारी, कंत्राटी नोकरी आणि त्यातील नियमन,NGO कडून होणारी फसवणूक आदी प्रश्नाच्या सोडवणुकीच्या उद्देशाने स्थापन झालेला राज्यव्यापी मंच म्हणून समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाची थोड्याच दिवसात ओळख निर्माण झालेली आहे...!

आपल्या संघटनेच्या नाशिक आणि परिसरातील जेष्ठ पदवीधर मतदारांच्यासोबत आपल्या संघटनेचे नाशिकमधील कार्यकर्ते माधुरी पाटील,राणी जाधव,दिपक देवरे,किरण गोरे,गोकुल मेडगे,मंगेश निकम यांच्या पुढाकाराने काल रविवार दिनांक २९ जानेवारी २०१७ रोजी झालेल्या बैठकीत आजवर पदवीधरांच्या हक्कांसाठी आणि कामगार - कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे चळवळीतील कार्यकर्ते प्रकाश (राजू) देसले यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....!

मित्रांनो पदवीधरांच्या समस्या लोकशाही मार्गाने वरिष्ठ सभागृहात चर्चेला याव्यात त्या समस्या सुटाव्यात म्हणून शासनाने त्याकरिता विविध कायदे बनवावेत शासन निर्णय घ्यावेत याउद्देशाने पदवीधर प्रतिनिधींची निवड करण्यात येते परंतु प्रस्थापित राजकीय पक्ष  पदवीधर आमदार म्हणजे केवळ संख्याबळ वाढवण्यासाठीच असतो असे गृहीत धरतात म्हणून न  बोलणारा सांगेल तेव्हा हात वर करणारा मुका बाहुला त्यांना निवडून येणे अपेक्षित असते...!

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या ७० वर्षांतही शिकलेल्या लोकांचे प्रश्नही सुटलेले नाहीत हे वास्तव आहे...म्हणूनच आपण गेली अनेक वर्षे आयटक या भारतातील पहिल्या आणि देशव्यापी कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार कल्याणासाठी संघर्ष करणाऱ्या प्रकाश (राजू) देसले यांना या निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांच्यासोबत संघटनेचे उपाध्यक्ष संदीप आखाडे यांच्याशी झालेल्या चर्चेतून MSW आणि BSW पदवीधरांचे प्रश्न कायमचे सुटावेत यासाठी काम करण्याचे आश्वासनही मिळालेले आहे...!

प्रकाश (राजू) देसले हे सर्वसामान्य पदवीधरांचे खरे प्रतिनिधी असून बेरोजगार पदवीधरांच्या आजी-माजी सत्ताधाऱ्यांनी निर्माण करून ठेवलेल्या सत्तर वर्षांतील समस्यांना विधानपरिषदेत वाचा फोडतील...!

आपलं प्रथम पसंतीचं मत प्रकाश (राजू) देसले यांना देऊन विजयी करा ही विनंती.

शिवराम ठवरे-9175273528
सेक्रेटरी-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र.
shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment