Sunday 19 February 2017

एन. जी. ओ. कर्मचारी वेतन राष्ट्रीयकृत बँकेत व्हावे...डिजिटल इंडिया NGO Workers Pyament

महाराष्ट्रातील एन.जी. ओ. मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत व्हावेत...समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्रची मागणी...!

पुणे-2-फेब्रुवारी-2017:- महाराष्ट्रातील सर्व सामाजिक आणि धार्मिक संस्था अर्थात N.G.O. मध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेमार्फत करावेत अशी मागणी करणारे पत्र समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्राने आज महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांकडे पाठवले आहे...!

आता सध्या राज्यातील सामाजिक आणि धार्मिक संस्था अर्थात N.G.O. मध्ये काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाची संख्या काही लाखात आहे परंतु त्यांच्या वेतनाबाबत कोणतेही नियमन नाही आणि त्यामुळेच त्या संस्था आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार आपल्या सोईनुसार रोख,डी.डी,चेक इत्यादी प्रकारे करत आहेत....यातून बऱ्याच वेळा फसवणूचे प्रकारही घडतात...!

त्याचबरोबर केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या शासनाचे डिजिटल इंडिया अंतर्गत पारदर्शक आणि कॅशलेस व्यवहार करण्याचे धोरण अवलंबले आहे याचा NGO मधील कर्मचाऱ्यांना लाभ व्हावा या हेतूने समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाचे अध्यक्ष मा. अनिल गायकवाड,उपाध्यक्ष संदीप आखाडे, खजिनदार वर्षा डांगे,हरिभाऊ सणस तसेच पदाधिकारी आणि इतर अनेक कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार सदर मागणी केलेली आहे...!

धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून या पत्रास सकारात्मक प्रतिसाद मिळावा म्हणून याच्या प्रती कामगार विभाग आणि मुख्यमंत्री तसेच प्रधानमंत्री यांच्या कार्यालयाकडे पाठपुरावा व्हावा म्हणून पाठवण्यात येतील...!

आपणांस अशा कोणत्या NGO माहित असल्यास की ज्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार अजूनही रोख,डी.डी. अथवा चेकने दिले जातात आणि त्यामुळे फसवणूक होत आहे तर आमच्याशी नक्की संपर्क करावा...!

शिवराम ठवरे-9175273528
सेक्रेटरी-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र
Shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment