Sunday 19 February 2017

YCSSW माजी विद्यार्थी मेळावा

बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा महाविद्यालयातील परिसरात काल आयोजित केलेल्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्कचा आजी-माजी विद्यार्थी संवादाचा कार्यक्रम खूप उत्तम झाला...अधिकृत माजी विद्यार्थी संघ आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्कचे विद्यार्थी,प्राचार्य,प्राध्यापक आणि व्यवस्थापणाचे आभार..!

कार्यक्रमाच्या निमित्ताने होणाऱ्या भेटी चर्चा महत्वाच्या असतात म्हणून मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होतो...त्यातच समाजकार्य पदवीधरांची संघटना उभराणी चालू असल्यामुळं मला ज्युनिअर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर(हेदेखील माझ्यासाठी नवीन)तुम्ही आलंच पाहिजे आमची भेट होईल असा आग्रह केलेला होता...आमच्या बॅचचे फक्त हिना,पौर्णिमा,विकी शशी आणि प्राजक्ता एवढेच जण होतो त्यामुळं चुकल्यासारखं वाटत होतं.. पण मला ओळखणारे इतके जण आहेत याची जाणीव पहिल्यांदाच झाली..!

प्रदीप मोरे,साईदर्शन,राहुल कांबळे,हेमेंत भोसले आदी जेष्ठ मार्गर्शकांची भेट बऱ्याच दिवसांतून भेट होऊ शकली...प्राचार्य शाली जोसेफ नेहमीप्रमाणे आवर्जून "मेरे को मिल के जाना" असं सकाळीच बोलल्या होत्या त्यांचाशीदेखील खूप गप्पा झाल्या...विजय माने सर,मनीषा मॅडम,प्रमोद सर भाई सर जीवन सर यांच्याशी वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा संवाद झाला..विशेष बाब म्हणजे सोशल मीडियावर नेहमी संवाद करणाऱ्या पण समोर कधीच न भेटलेल्या सुजाता जाधव यांची भेट झाली...!

विशेष म्हणजे आपल्याला काय डान्स जमत नाही म्हणून कार्यक्रमातून लांब पळणाऱ्या चेतन कणसे आणि मला भाई सरांनी लपलेलो असताना शोधून काढून डान्स करायला लावलाच आणि सोबतीला दिवसभर न बोलणाऱ्या स्वतः समता मॅडम आल्या,गौरी आणि इतर ज्युनिअर मित्रांनी देखील मला नाचवलं आणि माझा नाईलाज झाला...आता विनंती एवढीच आहे..त्याचं कुणी शूटिंग केलं असेल तर मलादेखील परत दाखवून लाजवू नका...!

दिवसभराच्या कार्यक्रमात संस्थेचे मार्गदर्शक मा. लक्ष्मण माने यांची किशोर काळोखेंनी घेतलेली मुलखात वैचारिक होती..कारण त्या मुलाखतीतून काही नवीनच प्रश्न उपस्थित झाल्यासारखं वाटलं त्याबद्दल दादांशी सविस्तर बोलावं लागेल...कारण कार्यकर्ता म्हणून मला त्यातील काही मुद्दे पटणारे नाहीत...!

रात्री पहिल्यांदाच आजी-माजी विद्यार्थी आयोजित उमंग चा बहारदार कार्यक्रम झाला..कालचा दिवस खरंच छान केला रोजच्या रहाटगाडग्यातून तेवढीच उसंत मिळाली...मागच्या काही कारणांमुळे माझ्याशी जराही न बोलणाऱ्या संपदा मॅडम आणि कृष्णा शिपकुले यांच्याशी स्वतः जाऊन माफी मागावी आणि संवाद सुरु करावा अशी मनातली भावना मात्र मनातच राहिली....!

शिवराम ठवरे-9175273528
माजी विद्यार्थी-यशवंतराव चव्हाणस्कूल ऑफ सोशल वर्क,जकातवाडी सातारा
shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment