Thursday, 7 April 2016

पुण्याची बुधवार पेठ...आमची देशभगिनी आणि भारत माता कि जय...!

आता शिवाजीनगरवरून जालिंदरला भेटून घरी निघालो आहे...पाकिस्तानी क्रिकेट टीमला हरवून बी.सी. सी. आयच्या क्रिकेट टीमने विजय मिळवला म्हणून बरीच पुणेकर तरुण मुले दगडूशेठ हलवाई च्या मंदिरासमोर गर्दी करून घोषणा देत होते....!

गणपती बाप्पा मोरया....भारत माता कि जय...!

शेजारीच बुधवार पेठेतील स्वतःच्या शरीराची विक्री करणाऱ्या महिला पाहून त्यांना अजून जोर चढतो...!

गर्दीमधील एक जण त्या महिलांकडे पाहून म्हणतो...भारत माता कि जय म्हण....भारत माता कि जय म्हण...भारत माता कोण माहित नाही का...?

त्यातील एक महिला उत्तर देते...."माझी पुच्ची" हीच माझी भारतमाता...!

गर्दी झटक्यात बाजूला होते....काय बोलते बाई...म्हणत सगळे टिंगल करतात...माझी बसही पुढेच निघाली...!

ती अजून तिथेच उभी असेल कुणीतरी गिऱ्हाईक मिळावे म्हणून....!

हेच आहे भारताचे वास्तव....जय भारत...!

शिवराम ठवरे 20-03-2016
मुक्त पत्रकार-9175273528
Shivramthavare25@gmail.com

संपूर्ण शैक्षणिक कर्जमुक्ती कृतीसमिती

"संपूर्ण शैक्षणिक कर्जमुक्ती कृती समिती"

जाहीर आवाहन,

महाराष्ट्रातील काही भागात गेली अनेक वर्षे अवर्षणाची अर्थात "भयानक दुष्काळ परिस्थिती" निर्माण झाली आहे...दुष्काळ निवारणासाठी शासनाने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत...टंचाई भागातील माणसांचे जीवनमान काही प्रमाणत सुलभ व्हावे याकरिता "शासकीय यंत्रणा" प्रयत्न करीत आहे...शेतकरी कर्जमाफी मिळावी म्हणून सर्वच राजकीय पक्ष मागणी करीत आहेत...यावर्षीच्या बजेटमध्ये देखील दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्याचे समजले आहे...इतकेच काय दुष्काळी भागातील पाळीव प्राणी जगावे म्हणून देखील उपाययोजना सुरु आहेत..!

आजच्या शिक्षण पद्धतीत घरची परस्थिती बेताची असल्यामुळे "शैक्षणिक कर्ज" काढून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी वर्गाची संख्या मोठी आहे...स्वतःच्या पायावर आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळाली कि कर्ज फेडायचेे असे ठरवून "शिक्षण पूर्ण केलेल्या पण नोकरीच न मिळालेल्या" शेतकरी शेतमजूर कुटुंबातील मुलांची अवस्था कुणाच्याही लक्षात येत नाही हे विशेष आहे... एका बाजूला "मेक इन इंडिया" आणि "मेक इन महाराष्ट्र" अशी मोठाली नावे घेऊन शासन लाखो रोजगार आणले अशी आकडेवारी जाहीर करीत आहे...!

तर दुसऱ्या बाजूला याच महाराष्ट्रात कर्ज काढून शिकलेले तरुण हातात "उच्च शिक्षणाची कागदपत्रे आणि डोक्यावर शैक्षिणक कर्जाचे ओझे" घेऊन पुण्या-मुंबईला "कंत्राटी" का होईना पण "रोजगार" मिळवा म्हणून कार्पोरेट कंपन्यांचे उंबरठे झिजवत आहेत...कुठेतरी जॉब मिळून डोक्यावर असणारे कर्ज फेडावे स्वतःचे लग्न करावे आणि दुष्काळात होरपळणाऱ्या आई-बापाला मदत करावी अशी स्वप्ने पाहत आहेत....!

काम करायची इच्छा असूनही "नोकरीच मिळत नाही" गावाकडे जाऊन शेती करावी तरी "पाणी नाही" त्यामुळे अनेक तरुण निराश होऊन व्यसनाकडे वळत आहेत...काहीजण आत्महत्या करीत आहेत...काहीजण राजकीय पक्ष आणि या व्यवस्थेचा निषेध नोंदवत आला दिवस ढकलत आहेत...अनेकांची लग्ने ठरत नाहीत...कर्ज असलेल्या मुलींशी ते आपल्याला फेडावे लागेल म्हणून कुणी सोयरिक करत नाहीत...अशा बिकट परस्थितीत महाराष्टातील हुशार शैक्षणिक कर्जदार तरुण "जगावे कि मरावे" अशा विवंचनेत आहेत...!

विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते शैक्षणिक प्रश्नावर अभ्यास करत असताना हे "भयानक वास्तव" लक्षात आले...काल 19 मार्च 2016 रोजी "शिवाजीनगर,पुणे" यथे झालेल्या विद्रोही विदयार्थी संघटनेच्या बैठकीत आता महाराष्ट्रात "संपूर्ण शैक्षणिक कर्जमुक्ती कृती समिती" स्थापन करून दुष्काळी भागातील बेरोजगार विदयार्थी वर्गाची संपूर्ण "शैक्षणिक कर्जमुक्ती" करायची मागणी शासनाकडे करावी असे ठरले आहे...!

एका बाजूला सरकार,मोठ्या बँका मोठमोठ्या भांडवलदार कंपन्यांचे "लाखो करोड रुपयांचे कर्ज माफ" करत आहे...व्यापारी वर्गाचा LBT कर माफ केला आहे...विजय मल्ल्या सारखे लोक लाखो करोड घेऊन पळून जात आहेत....तर दुसऱ्या बाजूला "कर्ज फेडण्याची इच्छा असूनही" केवळ नोकरी लागत नाही म्हणून आणि गावाकडे दुष्काळामुळे शेतातही उत्पन्न नाही त्यामुळे काढलेले शिक्षण कर्ज फेडू शकत नाहीत....!

यावर कहर म्हणजे "शिक्षण कर्ज फेडावे" म्हणून बँकांनी आपले पगारी कर्मचारी या "हतबल बेरोजगार" तरुणांच्या पाठी लावले आहेत...कर्जदार बेरोजगार तरुणांना बँका सतत नोटिसा पाठवत आहेत...त्यांचे राहत्या गावात येऊन बदनामी करत आहेत...त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना वरचेवर फोन करीत आहेत...लोन मागायला येऊन घरात तासनतास बसून आई वडिलांना दमदाटी करत आहेत...एका बाजूला "दुष्काळ" दुसऱ्या बाजूला "बेरोजगारी" तर तिसऱ्या बाजूला "बँकांच्या कर्जवसुली अधिकाऱ्यांचा त्रास" अशा परिस्थितीत तरुण हतबल झाले आहेत...सरकारने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे म्हणून सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे...याकरिता "विद्रोही विदयार्थी" संघटनेच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या "संपूर्ण शैक्षणिक कर्जमुक्ती कृती समितीच्या" वतीने महराष्ट्रातील शैक्षणिक कर्जदार मित्र मैत्रिणींना आवाहन करीत आहोत कि त्यांनी आपले शिक्षण कर्जाची माहिती असणारे "लोन स्टेटमेंट" खाली दिलेल्या कार्यकर्त्यांचे मेलवर स्वतःची प्राथमिक माहिती आणि मोबाईल नंबर यांचेसह पाठवावी...!

कृपया आपणही या "संपूर्ण शैक्षणिक कर्जमुक्ती कृती समिती"मध्ये सक्रीय सहभाग नोंदवावा आणि या कर्जमुक्तीच्या मागणीला पाठिंबा दयावा ही विनंती...!

आपले सहकारी-निमंत्रक
"संपूर्ण शैक्षणिक कर्जमुक्ती कृती समिती"
जालिंदर घिगे-7588029196
शिवराम ठवरे-9175273528
स्वप्नील धांडे-8408878804
सागर दोंदे-9767271094
मयुर खराडे-9503633029
shivramthavare25@gmail.com
kharade.mayur@gmail.com

कृपया या मागणीला जनमत तयार होणे खूप गरजेचे आहे...केवळ बोलण्यासाठी फोन करू नये...आपल्या "कर्जाची स्टेटमेंट" व्यक्तीगत माहितीसह वर दिलेल्या मेलवर पाठवावी...!

"संपूर्ण शैक्षणिक कर्जमुक्ती कृती समिती" कोणाकडूनही "देणगी वा निधी" घेत नाही त्यामुळे संपूर्ण शैक्षणिक कर्जमुक्ती कृती समितीच्या नावाने कोणालाही "देणगी वा निधी" देऊ नये...!

पुरोगामी कोणाची बाजू घेत आहेत..?

पुरोगामी कुणाची बाजू घेतात...?

शोषीत शोषक यांच्या बाबतीत शोषितांची......!
काळा गोरा अशा वर्णभेदात काळ्या लोकांची..!
स्त्री-पुरुष अशा लिंगभेदात नक्कीच स्त्रियांची..!
अल्पसंख्य बहुसंख्य लोकांत अल्पसंख्याची....!
मूळचे उपरे यात उपऱ्यांची(उदा.भय्या हटाव)..!
कष्टकरी बुद्धिजीवी यात कष्टकरी वर्गाची.......!
संघटित असंघटित यात असंघटीत लोकांची....!

कोणत्याही भेदात जिकडे पडती बाजू असेल तिला सावरतात... चुकीचे असेल तर अभ्यास आणि प्रबोधन करतात...लगेच काही मिळावे म्हणून काम करीत नाहीत...निश्चितपणे ठरवलेल्या वाटेवर प्रामाणिकपणे चालतात...आणि आपण चुकत असलो असे लक्षात आले तर ती चूक मान्य करून स्वतःमध्ये बदल करतात...!

असे वागायला खूप निग्रह,निर्भयता आणि नीती असावी लागते...ती ज्यांचाकडे आहे ते पुरोगामी...!

मंदिर प्रवेश,संविधान,उच्च न्यायालय,विदया बाळ आणि तृप्ती देसाई

तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी महिला याच्यामुळे  मंदिर प्रवेशाचा मुद्दा गाजत आहे ....!

मंदिर प्रवेशासाठी "रस्त्यावर लढणाऱ्या" कार्यकर्त्यांना कायदेशीर आधार देणाऱ्या "डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी" लिहलेल्या "भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांच्या" आधारे तयार झालेल्या कायद्यांची अमलबजावणी झालीच पाहिजे....!

याकरिता वाढत्या वयामुळे शाररिक बळ अपुरे असतानाही "उच्च न्यायालयात" मंदिर प्रवेशाची कायदेशीर लढाई जिंकणाऱ्या जेष्ठ पुरोगामी नेत्या विचारवंत "विदया बाळ" यांचे हार्दिक अभिनंदन....!

विदयाताई सारखी अनेक लोकं आज प्रसिद्धीपासून दूर राहतात...आणि ते सोशल मीडियावरही सक्रिय नाहीत....!

त्यामुळे त्यानी केलेलं काम आपल्यापर्यंत पोहचते...आपल्याला त्याचा प्रत्यक्ष लाभही मिळतो...पण त्यांचे कर्ते धर्ते कोण हेच समजत नाही....!

लढे है.....ओर जिते भी है...विदयाताई को विद्रोही सलाम....!

शिवराम ठवरे 02-04-2016
मुक्त पत्रकार-9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.
Shivramthavare25@gmail.com

बाळ ठाकरे जनता अपघात विमा योजना आणि 1 रुपया कारभार...!

शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे बसले सर्वसामान्य माणसाच्या मानगुटीवर....!

एस. टी. च्या प्रत्येक प्रवासाला आजपासून 1 रुपया प्रतितिकीट जादा सारचार्ज तिकीट मोजावे लागणार....!

या शासनाचे असे आहे योजना जाहीर करायची आणि पुन्हा पैसे नाही म्हणून बोंब ठोकायची....!

भीक नको पण कुत्रे आवर....!

"बाळ ठाकरे जनता अपघात विमा योजना" आणखी एका विमा कंपनीला आणि मंत्रीमंडळास मलई मिळण्याची तरतूद सुरू....!

आताच शिक्षण हक्क परिषदेला जायला अकोलेला निघाला आहे 1 रुपया जादाचे तिकीट घेतले....एस. टी. प्रवास करा वास्तव समजेल...!

विजय मल्ल्यासारखे बडे भांडवलदार लाखो कोटी बडवून पळतात आणि हे सरकार अशी जनतेकडून 1 रुपया गोळा करून दात कोरून पोट भरत आहे...!

शिवराम ठवरे 9175273528
03-04-2016

आम्ही भारतीय आहोत...!

आम्ही "भारतीय" आहोत याचा आम्हाला अभिमान आहे....!

असे घोषवाक्य मोठ्या बॅनरवर लाऊन दोनवर्षापूर्वी  पुण्यात हिंदू राष्ट्रसेनेच्या लोकांनी "मोहसीन शेख" या निरपराध इंजिनिअर तरुणाला केवळ मुस्लिम आहे म्हणून मारल्यानंतर...87 वर्षे वयाचा तरुण वृद्ध "बाबा आढाव" हडपसर पासून शेकडो लोकांचा मोर्चा घेऊन चालत निघाला होता....त्यावेळी आता "भारत माता कि जय" बोललेंच पाहिजे म्हणणारे मूग गिळून गप्प होते....!

सांगली जिल्ह्यातील नवीन बौद्ध लेणी

सांगली जिल्ह्यातील प्राचीन इतिहास प्रकाशात आणणाऱ्या गिरिलिंग डोंगरावरील बौद्ध लेण्याचे जतन, संवर्धन करून "कुकटोळी गाव" "जागतिक वारसा" जोपासणारे "पर्यटन स्थळ" व्हायला हवे हीच लेणी संशोधक "मानसिंग कुमठेकर आणि  प्रा. गौतम काटकर" यांची प्रामाणिक भूमिका आहे....!

मागच्या महिन्याच्या अखेरीस राज्यभरातील प्रमुख आणि स्थैनक दैनिकांत सांगली जिल्ह्यातील "बौद्ध श्रमण परंपरा" सांगणाऱ्या डोंगररांगेतील लेण्या शोधल्याच्या बातम्या आल्या आणि महाराष्ट्राला येथील नवा ऐतिहासिक वारसा माहित झाला....यनिमित्तताने या विषयाचा घेतलेला आढावा...!

गेली अनेक वर्षे मिरज इतिहास संशोधन मंडळाचे "मानसिंग कुमठेकर" व "प्रा. गौतम काटकर" या दोन्ही अभ्यासकांनी दंडोबा डोंगररांगेत कुकटोळी ता.कवठेमहांकाळ गावच्या हद्दीत "गिरिलिंग डोंगर" नावाने ओळ्खणारा परिसर स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने संशोधक दृष्टीने पायी घातला आहे.....!

सुमारे ८ किलोमीटर चौरस पसरलेल्या सगळ्या डोंगराच्या कडा त्यांनी अभ्यासू नजरेने पाहत..."ऐतिहासिक संदर्भ" जोडत या लेण्या बौद्धकालीन आहेत की नाही यावर त्यांनी अभ्यास पूर्ण संशोधन केले.....!

आजच्या काळात सांगली जिल्ह्यातील नवीन संशोधन करण्याची वृत्ती कमी झाली आहे काय असे वाटत असताना या '₹"नव्या शोधामुळे" सांगली जिल्हा पुन्हा एकदा जगात चर्चेला आला आहे...!

खरे तर या "गिरीलिंग" डोंगरातील  लेण्या अगोदर पासूनच अस्तित्वात होत्या...पण स्थानिक लोकांना "इथे जे आहे ते नक्की  काय आहे" ते माहित नसल्यामुळे ते उजेडात आले नाही...पण आता "मानसिंग कुमठेकर आणि गौतम काटकर" यांची अभ्यासू नजर याकडे गेल्यामुळे आणि संपूर्ण राज्यातील प्रसिद्धी दिल्यामुळे लेण्यांचा कालखंड, त्यांची रचना, लेण्यांच्या भिंती, लेण्यातील खांब, स्तुप यास सर्वांचा अभ्यास करून या लेण्या बौद्ध धर्मीय आहेत हे उजेडात आले आहेत...!

उन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता या दोन अभ्यासकांनी केलेले हे संशोधन जिल्ह्याच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली आहे....आता खरी गरज आहे कि हा "ऐतिहासिक वारसा" जतन करायची...याचा लौकिक टिकवून ठेवायची...!

अभ्यासकांनी आपले काम केले आहे खरे...पण त्यांना या ठिकाणी सातत्याने येणे शक्य नाहीच...त्यामुळे गावातीलच स्थानिकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याचे "जागतिक पर्यटन केंद्र" म्हणून विकास होण्यासाठी प्रयत्न करावेत असे वाटते....!

खरे तर शासकीय यंत्रणेने याकडे गांभीर्याने पाहून या शोधाची दखल घ्यायला पाहिजे होती...परंतु आपल्या स्वतःच्या गावातील हा ठेवा आपणच जपायला पाहिजे असे वाटते...!

शोधला चांगली प्रसिद्धी मिळाली आहे त्यामुळे इतिहास अभ्यासक आणि चिकिस्तक लोकांनी "कुकटोळी" गावाकडे धाव घेतली आहे...याचा आता केवळ "पर्यटन स्थळ" म्हणून वापर होण्याची शक्यता आहे...परंतु याला "एक जागतिक पर्यटन केंद्र" म्हणून निर्मिती व्हावी असे वाटते...!

सांगली जिल्ह्याच्या मातीत असणाऱ्या ऐतिहासिक व सांस्कृतिक प्राचीन ठेवा असल्याने त्याचे जतन व संवर्धन ऐतिहासिक दृष्टिकोनातूनच केले पाहिजे....याकरिता या गावातच यासाठी काय करता येईल याची दिशा ठरवणेसाठी सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामजिक जाणीव असणाऱ्या लोकांची "इतिहास परिषद" घ्यावी असे मला वाटते...!

जेष्ठ संशोधक मानसिंग कुमठेकर व प्रा. गौतम काटकर यांच्या कार्याला सलाम करून कुकटोळी गावात येत्या काही महिन्यात "इतिहास परिषद" होऊन स्थानिक लोकांना या "जागतिक वारसा केंद्राचे" संवर्धनासाठी कायमदत करता येईल यासाठी एकत्रित प्रयत्न होतील अशी आशा करूयात...!

तुमच्याही मनात काही कल्पना असतील काही करावे असे वाटत असेल यासाठी नक्की प्रसार करा...चर्चा करा...सहभागी व्हा...चला या नवीन शोधला जगासमोर आणायचे "साक्षिदार" बनूयात....!

शिवराम ठवरे 04-04-2016
मुक्त पत्रकार-9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र
Shivramthavare25@gmail.com