Monday, 10 January 2022
प्रत्येक शाळेत समुपदेशक असणं काळाची गरज :- प्रा. समता जीवन
कोवीड मृतांच्या नातेवाईकांना 50,000 मदत
प्रसेनजी साबळे-पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 10 जानेवारी
बहुजनांच्या रयतला बदनाम करण्याचा नागपुरी डाव साध्य होणार नाही: शिवराम ठवरे
Sunday, 19 February 2017
समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्र सोशल मीडिया नियमावली
समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्र
नमस्ते,
महाराष्ट्रातील समाजकार्य पदवीधरांच्या(MSW आणि BSW) प्रश्नावर काम करणाऱ्या करण्यासाठी अनिल गायकवाड (लातूर) यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्रच्या कामांची प्रसिद्धी तसेच सभासदांशी संवाद आणि महाराष्ट्रातील समाजकार्य पदवीधरांशी संवादाच्या हेतूने हे व्हाट्सग्रुप बनवले आहेत...!
संस्थेच्या संघटनासाठी यापूर्वी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी 23 छोट्या मोठ्या बैठका घेतल्या होत्या...2013 पासून संस्था उभारणीसाठी बरेच कार्यकर्ते जनजागृती करत होते त्याला पुण्यात झालेल्या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात आले यामध्ये समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र अर्थात Social work Gratitude's Welfare Association,Maharashtra अशा नावाने नोंदणी प्रक्रिया सुरु करावी असे ठरले.संस्थेचे अध्यक्ष म्हणून अनिल गायकवाड-लातूर उपाध्यक्ष संदीप आखाडे आणि खजिनदार वर्षा डांगे तर शिवराम ठवरे आणि हरिभाऊ सणस यांची सेक्रेटरी म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली...त्यानंतर संस्थेच्या 3 अधिकृत बैठकी झाल्या आहेत...!
समाजकार्य पदवीदधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र नावाची नोंदणी प्रक्रिया चालू असल्यामुळे आपण अजून अधिकृत सभासद नोंदणी केलेली नाही परंतु प्राथमिक संवादाच्या माध्यमातून आपल्याशी आजपर्यंत सुमारे 550 पदवीधर संपर्कात आहेत ते सभासद होण्यास इच्छुक आहेत त्यांची नाव,मोबाईल नंबर आणि इ-मेल आयडीसह प्राथमिक माहिती माझ्याकडे एकत्रित संकलित केलेली आहे...अजूनही कोणाला स्वतःची माहिती दयायची इच्छा असेल तर त्यांनी मला *खाली दिलेल्या मेल आयडीवरती तुमचे नाव मोबाईल नंबर कॉलेज आणि सध्याचे ठिकाण यासह प्राथमिक माहितीचा मेल करावा* हि विनंती...!
आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईबीसी सवलत,मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती समाजकार्य महाविद्यालयास एक विद्यापीठ एकच फी आणि समान प्रवेशप्रक्रिया याची मागणी,NGO/Project बेस कामगारांना व त्यांचा संघटनांना मार्गदर्शन करणे,NGO मधील कामगारांना कामाचे तास,किमान वेतन पीएफ इएसआयसी ग्रॅच्युटी आदी लाभ मिळावेत या आणि इतर प्रश्नावर काम सुरु केले आहे...!
आपणही आपणांस माहित असलेले प्रश्न उपस्थित करावेत आणि इतर सहकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला मदत करावी...महाराष्ट्र्रात सध्या ठीकठिकाणी मिटिंग नियोजन चालू आहे आपणही मदत करा सहभागी व्हा...आपणांस समाजकार्य पदवीधरांसाठी नोकरी मेळावे आणि नोकरीची गरज असणाऱ्या सर्वांची एकत्रित माहिती गोळा करून त्यांचे रिजुम एकत्रित करता येतील काय असाही प्रयत्न चालू आहे...!
आपणांस विनंती आहे...ग्रुपचे नाव किंवा ग्रुप आयकॉन बदलू नये... जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारे,शुभेच्छा किंवा पर्सनल टीका टिपणी करणारे अनावश्यक मेसेजेस पाठवू नयेत... गैरवर्तन करणाऱ्या कोणासही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात येईल..!
आपण सगळे उच्चशिक्षित आहोत वारंवार सांगण्याची गरज नसावी...कुणाला काही अधिक शंका असतील तर पर्सनल मेसेज करून विचारावं निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल..!
शिवराम ठवरे-9175273528
सेक्रेटरी-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र.
shivramthavare25@gmail.com
भारती विद्यापीठ शिष्यवृत्ती प्रश्न Bhrati University SC ST VJ NT SBC OBC Scholarship issue
समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र
खुल्या प्रवर्गातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ईबीसी सवलतीच्या प्रश्नासोबत आता अभिमत विद्यापीठातून (भारती विद्यापीठ आणि टाटा इन्स्टिट्यूट) समाजकार्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाना भारत सरकाराच्या शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती आणि शिष्यवृत्ती योजनेचा लाभ पूर्ववत होण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे...!
काल पुण्याच्या भारती विद्यापीठात MSW चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चेतून त्यांना भारत सरकारच्या शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती आणि शिष्यवृत्तीयोजनांचा लाभ मिळत नाही अशी माहिती समजली...त्यांनतर ताबडतोब समाजकार्य पदवीधर मंडळाच्यावतीने हरिभाऊ सणस यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष संदीप आखाडे यांच्यासह आम्ही महाविद्यालयाचे प्राचार्य/डायरेक्टर मा.राठोड सर यांना लेखी निवेदन देऊन याबाबत खुलासा करण्याची मागणी केली...!
सदर निवेदनासोबतच आम्ही प्राचार्य राठोड आणि प्रा. किर्तीराज सर यांच्यासोबत समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळातर्फे चाललेले संघटन आणि कार्यक्रमांबाबत चर्चा केली...दोघांनाही संघटनांचे कौतुक केले भारती विद्यापीठात मंडळामार्फ़त समाजकार्य पदवीधरांचे प्रश्नांबाबत एखादे चर्चासत्र आयोजित केले तर आम्ही नक्की सहकार्य करू असे आश्वासन दिले आहे..!
यानिमित्ताने आपणांस विनंती आहे की अभिमत महाविद्यालयातून शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची भारत सरकार शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती व शिष्यवृत्ती काही वर्षे झाली बंद केलेली असून त्याबाबत अधिक माहिती,संदर्भातील शासननिर्णय यांचा अभ्यास करून आपण पुढील दिशा ठरवून सरकारकडून हा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे...!
आपणांस याबाबत अधिक माहिती असेल किंवा काही प्रश्न असतील तर नक्की संपर्क करावा...!
शिवराम ठवरे-9175273528
सेक्रेटरी-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र
shivramthavare25@gmail.com
दुसरा दिवस उत्तर मिळाले
मित्रांनो आताच समाजकल्याण विभागाच्या वेबसाईटवर माहिती घेतली आहे...तसेच समाजकल्याण आयुक्त कार्यालय पुणे यांचेशीदेखील फोनवरून संपर्क केला आहे...भारती विद्यापीठमधील MSW अभ्यासक्रमास भारत सरकारच्या शुल्क प्रतिपूर्ती आणि शिष्यवृत्तीला पात्र आहे त्याचा महाविद्यालय कोड 14511 B.V.D.U Social Sciences Center असा आहे कृपया फॉर्म भरावेत...!
कृपया शासनाच्या https://mahaeschol.maharashtra.gov.in/MahaEschol/Scholarships/Account/Login.aspx#1 या संकेतस्थळावर भेट देऊन लवकरात लवकर आपले अर्ज भरावेत...31 जानेवारी 2017 अशी शेवटची तारीख आहे...काही अडचण आली तर नक्की संपर्क करा...!
शिवराम ठवरे-9175253528
सेक्रेटरी-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र
shivramthavare25@gmail.com
YCSSW माजी विद्यार्थी मेळावा
बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा महाविद्यालयातील परिसरात काल आयोजित केलेल्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्कचा आजी-माजी विद्यार्थी संवादाचा कार्यक्रम खूप उत्तम झाला...अधिकृत माजी विद्यार्थी संघ आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्कचे विद्यार्थी,प्राचार्य,प्राध्यापक आणि व्यवस्थापणाचे आभार..!
कार्यक्रमाच्या निमित्ताने होणाऱ्या भेटी चर्चा महत्वाच्या असतात म्हणून मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होतो...त्यातच समाजकार्य पदवीधरांची संघटना उभराणी चालू असल्यामुळं मला ज्युनिअर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर(हेदेखील माझ्यासाठी नवीन)तुम्ही आलंच पाहिजे आमची भेट होईल असा आग्रह केलेला होता...आमच्या बॅचचे फक्त हिना,पौर्णिमा,विकी शशी आणि प्राजक्ता एवढेच जण होतो त्यामुळं चुकल्यासारखं वाटत होतं.. पण मला ओळखणारे इतके जण आहेत याची जाणीव पहिल्यांदाच झाली..!
प्रदीप मोरे,साईदर्शन,राहुल कांबळे,हेमेंत भोसले आदी जेष्ठ मार्गर्शकांची भेट बऱ्याच दिवसांतून भेट होऊ शकली...प्राचार्य शाली जोसेफ नेहमीप्रमाणे आवर्जून "मेरे को मिल के जाना" असं सकाळीच बोलल्या होत्या त्यांचाशीदेखील खूप गप्पा झाल्या...विजय माने सर,मनीषा मॅडम,प्रमोद सर भाई सर जीवन सर यांच्याशी वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा संवाद झाला..विशेष बाब म्हणजे सोशल मीडियावर नेहमी संवाद करणाऱ्या पण समोर कधीच न भेटलेल्या सुजाता जाधव यांची भेट झाली...!
विशेष म्हणजे आपल्याला काय डान्स जमत नाही म्हणून कार्यक्रमातून लांब पळणाऱ्या चेतन कणसे आणि मला भाई सरांनी लपलेलो असताना शोधून काढून डान्स करायला लावलाच आणि सोबतीला दिवसभर न बोलणाऱ्या स्वतः समता मॅडम आल्या,गौरी आणि इतर ज्युनिअर मित्रांनी देखील मला नाचवलं आणि माझा नाईलाज झाला...आता विनंती एवढीच आहे..त्याचं कुणी शूटिंग केलं असेल तर मलादेखील परत दाखवून लाजवू नका...!
दिवसभराच्या कार्यक्रमात संस्थेचे मार्गदर्शक मा. लक्ष्मण माने यांची किशोर काळोखेंनी घेतलेली मुलखात वैचारिक होती..कारण त्या मुलाखतीतून काही नवीनच प्रश्न उपस्थित झाल्यासारखं वाटलं त्याबद्दल दादांशी सविस्तर बोलावं लागेल...कारण कार्यकर्ता म्हणून मला त्यातील काही मुद्दे पटणारे नाहीत...!
रात्री पहिल्यांदाच आजी-माजी विद्यार्थी आयोजित उमंग चा बहारदार कार्यक्रम झाला..कालचा दिवस खरंच छान केला रोजच्या रहाटगाडग्यातून तेवढीच उसंत मिळाली...मागच्या काही कारणांमुळे माझ्याशी जराही न बोलणाऱ्या संपदा मॅडम आणि कृष्णा शिपकुले यांच्याशी स्वतः जाऊन माफी मागावी आणि संवाद सुरु करावा अशी मनातली भावना मात्र मनातच राहिली....!
शिवराम ठवरे-9175273528
माजी विद्यार्थी-यशवंतराव चव्हाणस्कूल ऑफ सोशल वर्क,जकातवाडी सातारा
shivramthavare25@gmail.com