Thursday 17 November 2016

खुल्या प्रवर्गातील (विशेषतः मराठा) विद्यार्थी वर्गाची ईबीसीसाठी झाली ऑनलाइन फसवणूक...!

महाराष्ट्रातील खुल्या (विशेषतः मराठा) प्रवर्गातील समाजकार्य MSW आणि BSW,पत्रकारिता MBA,BCA,MCA यासारखे व्यावसायिक,इंजिनियरिंग मधील डिप्लोमा आणि डिग्री तसेच वैद्यकीय शिक्षण घेणारे 6 लाखाच्या पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे सर्व आर्थिक मागास विद्यार्थी 50% फी माफीच्या EBC सवलती पासून वंचित राहण्याची भीती...ऑनलाईन फॉर्म भरण्याचा वेबसाईटवर वरील अभ्यासक्रमच नाहीत...!

यावर्षी शासनाच्या शिष्यवृत्तीची अमलबजावणी जलद आणि पारदर्शक होण्याकरिता विद्यार्थी संघटनांचा मागणीवरून महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून पदवी,पदव्युत्तर शिक्षणाचे EBC सवलतीचे अर्ज ऑनलाइन भरायचे कंपल्शन केलेलं आहे... त्याकरिता अर्ज भरायची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2016 आहे http://ebc.dhemaharashtra.in या वेबसाईटवर प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वतंत्र पणे अर्ज भरायचे आहेत आणि त्याची प्रिंट काढून महाविद्यालयात सादर करायचे आहेत..!

मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थी प्रश्नावर काम करत असल्यामुळे शासनाच्या विविध योजनांमधून मिळणारी फी प्रतिपूर्ती,शिष्यवृत्ती याबाबत सखोल माहिती स्वतः आत्मसात करणे गरजेचे आहे याकरिता आजच जेव्हा ईबीसी सवलतीचे अर्ज यावर्षीपासून ऑनलाईन भरायचे आहेत असे आमचे मित्र विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते आणि कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. युवराज जाधव-सातारा यांचेकडून समजले आणि आमचे मार्गदर्शक हेमेंत भोसले प्रा. जीवन बोराटे (समाजकार्य महाविद्यालय सातारा) यांचेशी फोनवरून चर्चा केली आणि स्वतः सदर वेबसाईटवर डमी लॉगीन आयडी तयार करून प्रक्रिया समजावून घेण्याचा प्रयत्न केला असता शासनाची फसवणूक लक्षात आली....!

या वेबसाईटवर आपली प्राथमिक माहिती सादर करून स्वतःचा लॉगिन आय. डी. बनवणे आवश्यक आहे....त्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवरती स्वतःचा लॉगिन आय. डी आणि पासवर्ड मिळतो...त्यानुसार लॉगिन झाल्यावर 1.कॅण्डीडेट डिटेल्स,2.ऍडमिशन डिटेल्स,3.क्वालीफिकेशन डिटेल्स,4.आधार डिटेल्स आणि 5.डॉक्युमेंट अपलोड अशा पाच वेगवेळ्या पायरया  आहेत यामध्ये पहिली स्टेप पूर्णपणे झाली तरच पुढच्या स्टेपला जाता येत आहे...आता आपण कॅण्डीडेट डिटेल्स मध्ये स्वतःची माहिती भरून पुढच्या ऍडमिशन डिटेल्स या स्टेपवर जाताच...ऍडमिशन वर्ष आणि अभ्यासक्रम (Cource) याचे सिलेक्शन करावं लागते....!

सदर वेबसाईटवर केवळ B.A.,B.A.B.Ed,B,.Com,B.Ed,B.F.A(Dance),B.F.Ed,BSL-LLB-5 year,B.Sc,B.Ed,L.L.B-3 year,L. L.M,M.A.,M.Com,M.Ed,M.Sc,M.Sc (By Research) आणि M.S.C (Integrated) इतके मोजून 19 अभ्यासक्रमच आहेत...याव्यतिरिक्त इतर कोणताही अभ्यासक्रम उपलब्ध नाही त्यामुळे आपण फॉर्म भरतानाच्या दुसऱ्या पायरीवरच अडकून पडणार आहोत...आणि मुदतीत संपूर्ण अर्ज भरला नाही त्यामुळे आपण पात्र असूनही 50% फी सवलतीच्या ईबीसी सवलतीचा लाभ घेऊ शकणार नाही हे लक्षात घेतलेे पाहिजे....!

महाराष्ट्र शासन आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सदर वेबसाईट तयार करताना महाराष्ट्रातील सगळे  अभ्यासक्रमच समाविष्ट केले नाहीत त्यामुळे आता ईबीसी सवलतीचा पुरता बोजवारा उडण्याची शक्यता आहे...सर्व अभ्यासक्रम प्रोग्राममध्ये फीड केल्याशिवाय 25 नोव्हेबर 2016 या दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे शक्यच होणार नाही...राहिलेल्या 7 दिवसांत सगळे अभ्यासक्रम ऍड करून महाविद्याल्यातच अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया करायला हवी आहे...!

महाराष्ट्रातील खुल्या (विशेषतः मराठा) प्रवर्गातील समाजकार्य MSW आणि BSW,पत्रकारिता MBA,BCA,MCA यासारखे व्यावसायिक,इंजिनियरिंग मधील डिप्लोमा आणि डिग्री तसेच वैद्यकीय शिक्षण घेणारे 6 लाखाच्या पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे सर्व आर्थिक मागास विद्यार्थ्यांनी आता जागरूक होऊन हा शिक्षणातील हक्काच्या ईबीसी सवलती पासून वंचित ठेवण्याचा शासनपुरस्कृत डाव हाणून पाडला पाहिजे...याकरीता आपण शक्य त्या मार्गाने विरोध नोंदवून आपआपले अभ्यासक्रम ऍड झालेच पाहिजेत अशी मागणी करणे अत्यावश्यक आहे...!

आपण काय करू शकतो...?
👉🏽हा मेसेज वाचल्याबरोबर स्वतः वेबसाईटवर जाऊन सत्यता पाहणे आणि ताबडतोब सोशल मीडियावर फॉरवर्ड करून जास्तीत जास्त प्रसिद्धी देणे...!
👉🏽सोशल मीडिया अधिकृत माध्यम नाही याची जाणीव ठेवून विहित मार्गाने आपले महाविद्यालय,तहसीलदार ,जिल्हाधीकारी,लोकप्रतिनीधी,शिक्षण संचालक,शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री याना पत्र लिहू शकतो किंवा ई-मेल करू शकतो...!
👉🏽कोणत्याही पक्षाच्या विद्यार्थी संघटनेस याबाबत माहिती देऊ शकतो आणि दबाव निर्माण करण्याची विनंती करू शकतो...!

शासनाच्या चुकीमुळे निर्माण झालेली तांत्रिक अडचण दूर होऊन महाराष्ट्रातील खुल्या (विशेषतः मराठा) प्रवर्गातील समाजकार्य MSW आणि BSW,पत्रकारिता MBA,BCA,MCA यासारखे व्यावसायिक,इंजिनियरिंग मधील डिप्लोमा आणि डिग्री तसेच वैद्यकीय शिक्षण घेणारे 6 लाखाच्या पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या सर्व आर्थिक मागास विद्यार्थ्यांना ईबीसी सवलत मिळालीच पाहिजे...!

शिवराम ठवरे-17-11-2016
मुक्त पत्रकार- 9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र
सेक्रेटरी-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र.

आपल्या खात्रीसाठी मी बनवलेला डमी लॉगीन आय. डी. आणि पासवर्ड आपल्याला शेअर करत आहे कृपया पासवर्ड बदलु नका हीच नम्र विनंती...आपणास काही शंका असली किंवा माझ्या माहिती व्यतिरिक्त आपणास काही इतर अपडेट माहिती असेल तर अवश्य संपर्क करावा पण चुकीची माहिती पसरवायला नको...!

वेबसाईट:- http://ebc.dhemaharashtra.in
लॉगिन आय. डी आणि पासवर्ड
THAVARE SHIVRAM KONDIBA
Application ID:1011321
Password:Pass@123
Mobile:9175273528

लडेंगे...जितेंगे....!

Tuesday 8 November 2016

500 आणि 1000 च्या नोटा बंद करून सरकारने डावे विचार आचरणात आणण्याचा केला जोरदार प्रयत्न...!

500 आणि 1000 च्या नोटा बंद करून सरकारने डावे विचार आचरणात आणण्याचा केला जोरदार प्रयत्न...!

शिवराम ठवरे-9175273528

कोणीही घाबरून जायचं कारण नाही...वेड्यासारख्या ATM बाहेर रात्रभर रांगा लाऊ नका... सोशलमीडियावर येणाऱ्या पोस्टवर जास्ती विसंबून राहू नका...अफवा पसरवू नका...शांतपणे विचार करून प्लॅनिंग करा...एकमेकांना सहकार्य करा...!

ज्यांच्याकडे रोख स्वरूपात बेहिशोबी मालमत्ता असेल त्यांनाच याचा त्रास होणार आहे...त्यामुळं कुणीही घाबरून जाऊ नये... केवळ बँकेचा अजिबात उपयोग न करणारे वा कमी उपयोग करणारे छोटे व्यापारी,दुकानदार,हॉटेल व्यावसायिक, मजूर,शेतकरी,कामगार,भिकारी,वेश्या या आणि अशा वर्किंग क्लासला थोडा त्रास होणार आहे...!

आपले नरेंद्रभाई मोदी खूप बोलतात त्यामुळं अजून फायनल नोटिफिकेशन किंवा कायदा काय येतोय याची वाट पहावी लागेल...बातम्या मध्ये येणार सगळं खरं नसतंय...!

सगळ्या निर्णयात डाव्या विचारांच्या आर्थिक अभ्यासकांच्या मतांचा प्रभाव दिसत आहे...म्हणून देशातील आर्थिक परिवर्तनास हे निर्णय खूप महत्वाचे असतील...!

आज रात्रीपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद होणार...हॉस्पिटल पेट्रोलपंप यावर 10 तारखेपर्यंत नोटा चालणार आहेत...!

10 नोव्हेबर 2016 पासून 500 आणि 2000 च्या नवीन नोटा चलनात येणार आहेत...बँकेत आणि पोस्ट ऑफिसमध्ये जुन्या नोटा बदलून देण्याचे आदेश दिले जातील...यासाठी देखील काही महिने मुदत दिली जाईल...!

काही दिवस एका दिवसाला 2000 रुपये काढण्याची मर्यादा राहणार...त्यानंतर काही दिवसांत 4000 करण्यात येईल आणि आवश्यकता राहिल्यास परत त्यात वाढ केली जाईल...

आता समजत असलेल्या माहितीनुसार नोटा केवळ रिप्लेस कराव्या लागतील...काळे धन असणारा कोणी कॅश ठेवत नाही...जमीन आणि बांधकाम क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक आहे...!

तात्पुरती मलमपट्टी असे याचं स्वरूप असेल...तरीदेखील डाव्या विचारांच्या अर्थतज्ञांचा या निर्णयावर प्रभाव असल्याचं स्पष्ट दिसत आहे... सध्या सरकारच्या विरोधात जनमत तयार होत असल्याचं लक्षात आल्यामुळे काळे धन तयार होऊ नये यासाठी आम्ही काहीतरी करून दाखवत आहे असं हे आहे...!

सरकारने निवडणुकीपूर्वी देशभर रान उठवलेल्या परदेशातील काळ्या पैशाचे काय झालं....?लोकांच्या खात्यावर 15 लाख येणार होते त्याचंही काही समजत नाही...!

सोने,रिअल इस्टेट,वैद्यकीय व्यवसाय,शिक्षण क्षेत्र यामध्ये गुंतवलेल्या पैसा कसा बाहेर काढणार...बड्या भांडवलदारांना दिलेल्या कर्जाच्या सवलतीचा हिशोब कोण देणार...?

शिवराम ठवरे-08-11-2016
मुक्त पत्रकार-9175273528
shivramthavare25gmail.com