Tuesday 8 November 2016

500 आणि 1000 च्या नोटा बंद करून सरकारने डावे विचार आचरणात आणण्याचा केला जोरदार प्रयत्न...!

500 आणि 1000 च्या नोटा बंद करून सरकारने डावे विचार आचरणात आणण्याचा केला जोरदार प्रयत्न...!

शिवराम ठवरे-9175273528

कोणीही घाबरून जायचं कारण नाही...वेड्यासारख्या ATM बाहेर रात्रभर रांगा लाऊ नका... सोशलमीडियावर येणाऱ्या पोस्टवर जास्ती विसंबून राहू नका...अफवा पसरवू नका...शांतपणे विचार करून प्लॅनिंग करा...एकमेकांना सहकार्य करा...!

ज्यांच्याकडे रोख स्वरूपात बेहिशोबी मालमत्ता असेल त्यांनाच याचा त्रास होणार आहे...त्यामुळं कुणीही घाबरून जाऊ नये... केवळ बँकेचा अजिबात उपयोग न करणारे वा कमी उपयोग करणारे छोटे व्यापारी,दुकानदार,हॉटेल व्यावसायिक, मजूर,शेतकरी,कामगार,भिकारी,वेश्या या आणि अशा वर्किंग क्लासला थोडा त्रास होणार आहे...!

आपले नरेंद्रभाई मोदी खूप बोलतात त्यामुळं अजून फायनल नोटिफिकेशन किंवा कायदा काय येतोय याची वाट पहावी लागेल...बातम्या मध्ये येणार सगळं खरं नसतंय...!

सगळ्या निर्णयात डाव्या विचारांच्या आर्थिक अभ्यासकांच्या मतांचा प्रभाव दिसत आहे...म्हणून देशातील आर्थिक परिवर्तनास हे निर्णय खूप महत्वाचे असतील...!

आज रात्रीपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद होणार...हॉस्पिटल पेट्रोलपंप यावर 10 तारखेपर्यंत नोटा चालणार आहेत...!

10 नोव्हेबर 2016 पासून 500 आणि 2000 च्या नवीन नोटा चलनात येणार आहेत...बँकेत आणि पोस्ट ऑफिसमध्ये जुन्या नोटा बदलून देण्याचे आदेश दिले जातील...यासाठी देखील काही महिने मुदत दिली जाईल...!

काही दिवस एका दिवसाला 2000 रुपये काढण्याची मर्यादा राहणार...त्यानंतर काही दिवसांत 4000 करण्यात येईल आणि आवश्यकता राहिल्यास परत त्यात वाढ केली जाईल...

आता समजत असलेल्या माहितीनुसार नोटा केवळ रिप्लेस कराव्या लागतील...काळे धन असणारा कोणी कॅश ठेवत नाही...जमीन आणि बांधकाम क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक आहे...!

तात्पुरती मलमपट्टी असे याचं स्वरूप असेल...तरीदेखील डाव्या विचारांच्या अर्थतज्ञांचा या निर्णयावर प्रभाव असल्याचं स्पष्ट दिसत आहे... सध्या सरकारच्या विरोधात जनमत तयार होत असल्याचं लक्षात आल्यामुळे काळे धन तयार होऊ नये यासाठी आम्ही काहीतरी करून दाखवत आहे असं हे आहे...!

सरकारने निवडणुकीपूर्वी देशभर रान उठवलेल्या परदेशातील काळ्या पैशाचे काय झालं....?लोकांच्या खात्यावर 15 लाख येणार होते त्याचंही काही समजत नाही...!

सोने,रिअल इस्टेट,वैद्यकीय व्यवसाय,शिक्षण क्षेत्र यामध्ये गुंतवलेल्या पैसा कसा बाहेर काढणार...बड्या भांडवलदारांना दिलेल्या कर्जाच्या सवलतीचा हिशोब कोण देणार...?

शिवराम ठवरे-08-11-2016
मुक्त पत्रकार-9175273528
shivramthavare25gmail.com

No comments:

Post a Comment