Thursday 25 August 2016

बहुजननायक श्रीकृष्ण

असुर बहुजननायक श्रीकृष्ण

"कृष्ण"बहुजन नायक

कृष्ण-बलराम दैव वादाला विरोध करणारे असुर महामानव.....!

असुर का कारण "कंस" असुर होता याचा अर्थ त्याची बहिण देवकीचे पोटी जन्म घेणारी संतती असुरच....!

ज्यानी सर्वप्रथम सुर सम्राट इंद्राचा पराभव केला...गोवर्धन प्रसंग आठवा.

आपल्या राज्यातील गोपालक शेतकरी समाजातील लोकांचा रोजगार असणाऱ्या दुग्ध व्यवसायास चालना देऊन पहिली "धवलक्रांति" केली.

त्यालाच "दूध आणि दुग्धजन्य पदार्थ चोर" म्हणून ब्राम्हणी लेखकानी बदनाम केले.

स्त्री जातीला आत्मसन्मान मिळावा यासाठी प्रयत्न केले जनजागृती केली त्यालाच "16 हजार 108" बायका केल्या "रासलीला" करुन संभोग केला असे म्हणून बदनाम केले.

बहुजन समाजातील जे लोकप्रिय ते आपले म्हणत कृष्ण आणि बलराम याना दैवत बनवत खरा सत्य इतिहास बाजूला सारत "दशअवतार" संकल्पना  तयार करुन बहुजन समाजाला स्वतःचे पोट भरावे यासाठी मूर्ख बनवले.

निसर्गपुजेला प्रमाण मानत कृषी संस्कृतीचा गौरव केला..... नागाला मारु नका तो "शेतकरी मित्र" आहे असे त्यानेच सर्वप्रथम सांगितले....कालिया मर्दन आठवा...!

पारंपरिक खेळ,स्थानिक संस्कृती उत्सव याना प्रोत्साहन देणारा अनोखा बहुजन नायक..खो-खो,कबड्डी,लगोर,सुरपाटया,चेंडूफळी,मल्लयूद्ध इत्यादि...!

उखळ-मूसळ आणि नांगर या बहुजन समाजाचे रोजच्या जगण्यातील प्रतिके राष्ट्रचिन्ह म्हणून वापरणारा बहुजन समाजाचे प्रगतिचे "सुदर्शन चक्र"फिरवणारा महान सम्राट.

कौरव आणि पांडव यांचे राजकीय  युद्धात प्रत्यक्ष अथव अप्रत्यक्ष सहभागी  नसतानाही बहुजन समाजातील लोकप्रियता लक्षात घेऊन  "ब्राह्मणी मनूस्मृती" आणि "वर्णव्यवस्था" गिता नावाच्या ब्राह्मणी पुस्तकातुन त्याचे नावे खपवन्याचा प्रयत्न करणाऱ्या ब्रामणी वृतीचा निषेध.

आता आपण शिक्षित आहोत.... जागृत आहोत...प्रश्न उपस्थित करू...चर्चा करू ..खरे खोटे समजून घेऊ....बहुजन समाजातील महापुरुष बदनाम करण्याचे ब्राम्हणी षडयंत्र उध्वस्त करू...!

या  वर्षी "कृष्णजन्माष्टमी" च्या आनंदात सहभागी होत फक्त ही चर्चा सर्व बहुजन समाजातील शिक्षित लोकांपर्यंत पोहचवा आणि संस्कृति शुद्धी करण्याचे महान लढाईचे प्रवर्तक  होऊया....!

प्रतिगामी विचार डोक्यातुन काढून माझ्या धडावर माझ्या विचारांचे डोके बसावे म्हणून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष झटनारया डॉ.आ.ह.साळुंखे,डॉ.बाबुराव गुरव,कॉ.धनाजी गुरव,राजाभाऊ शिरगुप्पे,कॉ.विजय मांडके, प्रा.गौतम काटकर आणि माझे सर्व मित्र मैत्रिणी,माझी बायाको सुनंदा  सर्व विद्रोही सहकारी यांचे विचारततून....!

शिवराम ठवरे 05-09-2015
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.
shivramthavare25@gmail.com

Saturday 20 August 2016

20 ऑगस्ट 2016 निषेध धरणं आंदोलन पुणे

हिंसामुक्त समाजासाठी मानवतेचा जागर...पुण्यात महात्मा फुले मंडईत पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शने...!

आज डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला 3 वर्षे झाली... सगळ्या देशभर मागास सर्वच प्रगतशील विचारांच्या व्यक्ती,संस्था,संघटना,राजकीय पक्ष आपापल्या गावात...शहरात जमेल त्या पद्धतीने निषेध सभा धरणे आंदोलनं मोर्चे निवेदने देत आहेत..दुःखद दिवस असूनही सगळीकडं उत्साहाचं वातावरण आहे...तरुणाई यामध्ये विशेष उत्साहानं सहभागी आहे हे खूप आशादायक आहे...!

मुक्तिवादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी आपण 20 ऑगस्टला पुण्यात काही निषेधाचा कार्यक्रम करता येईल असा प्रस्ताव ठेवत पुणे विद्यापीठात काही दिवसांपूर्वी बैठक बोलावली होती...या बैठकीत मोर्चा किंवा धरणे आंदोलन करूयात असे निश्चित झालं...पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नेतृत्वात कार्यक्रम असणार हे लक्षात घेऊन आपल्याला नियोजन करावे लागेल असा विचार माझ्यासह बहुतेकांनी मांडला होता..!

त्यामुळं पुढच्या बैठकीत सकाळच्या मोर्चात सहभागी होऊन राष्ट्र सेवा दलात होणाऱ्या कार्यक्रमात दिवसभर उपस्थित राहून संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत पुण्यातील मुख्य आणि गर्दीचे ठिकाण असणाऱ्या महात्मा फुले मंडई समोर निषेध धरणे आंदोलन करूयात असे ठरले...!

अगोदर निश्चित झल्याप्रमाणे मुक्तिवादी संघटना,विद्रोही सांस्कृतिक चळवळ,स्टूडंट फेडरेशन ऑफ इंडिया,सत्यशोधक विद्यार्थी संघटना,युवक क्रांती दल,युवा भारत,विद्रोही विद्यार्थी संघटना,नव समाजवादी पर्याय,दलित आदिवासी अधिकार आंदोलन,आइसा या संघटना आणि पुणे विद्यापीठातील या संघटनांचे कार्यकर्ते यांच्या सहभागाने कार्यक्रमाची तयारी सुरु झाली...!

प्रत्येकानं नेमून दिलेली जबाबदारी पार पाडत मिशन-20 ऑगस्ट पार पडायचं असे ठरवलं...सर्व संघटनांनी घोषणा तयार करणं, पत्रकाचा मजकूर तयार करणं,बॅनर बनवणं,पोलीस परवानगी काढणं वृत्त पत्रात प्रसिद्धी देणं,सोशल मीडियावर माहिती देणं या आणि अशा सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारत आजचा कार्यक्रम यशस्वी केला..!

संध्याकाळी 5 वाजलेपासून 6.30 पर्यंत गाणी घोषणा आणि कार्यकर्त्यांची भाषणं याने सगळा मंडई चौक दणाणून सोडला... कोणत्याही नियंत्रणाशिवाय उस्फुर्तपणे सर्व संघटनांचे मिळून पुण्यातील 83 तरुण-तरुणी यात सहभागी झाले होते...शांत रानडे ,विठ्ठल वाघ यांचेसारखे 20-25 जेष्ठही वृत्तपत्रातील बातम्या वाचून स्वतः सहभागी झाले होते...निषेधाची 1000 पत्रकं आपल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित असणाऱ्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाटली... लोकांनी थांबून त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला..काही लोकं तासभर थांबून होती हे विशेष...!

पोलीस प्रशासनाने 1 तासाची परवानगी दिली होती... कार्यक्रमाची संवेदनशीलता लक्षात घेऊन विश्रामबागवाडा आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या 10 पोलिसांची तुकडी कार्यक्रमस्थळी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह उपस्थित होती...वाहतुकीचे नियोजन करत निषेध धरणे आंदोलनाला उत्तम सहकार्य केले..त्यांचा सहकाऱ्यामुळं कार्यक्रम प्रभावी होऊ शकला हे मान्यच करावे लागेल...!

प्रत्येक संघटनेतील एका कार्यकर्त्याने निषेधाचे भाषण केले...शाहीर धम्मरक्षित रणदिवे,आकाश, राहुल,मुक्ती साधनाच्या उपस्थितीने जोरदार गीते सादर करता आली.. केवळ आपल्या नेत्यांचा खुनाचा निषेध करून चालणार नाही तर त्यांचा वारसा पुढं नेऊन विवेकाचा आणि परिवर्तनाचा वारसा कायम जोरकसपणे पुढे नेण्याची प्रतिज्ञा घेतली...!

विद्रोही विद्यार्थी संघटना आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने प्रकाश रणसिंगने निषेधाचे भाषण केले...विद्रोहींचे पुण्यातील 8 कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी होते..या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या सर्वाना सोबत घेऊन पुण्यात यापुढे जोरकसपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे...!

लडेंगे जितेंगे...!

शिवराम ठवरे-20-08-2016
मुक्त पत्रकार-9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र
shivramthavare25@gmail.com

Tuesday 16 August 2016

फ्रेंडशिप डे 2016

मित्र कोण कोण असतं...ज्यांचा सगळ्यात जास्त राग येतो...ज्यांचाकडून आपल्याला अपेक्षा असतात...ज्यांचाशी आपण दडवून ठेवलेलं बोलू शकतो... स्वतःची प्रतिमा आणि स्वतःचे वास्तव यात कोणताही आडपडदा न ठेवता बोलता येतं... हसता येतं...रडता येतं...!

आयुष्यात वाढत्या वयाबरोबर मित्रही बदलतात...बरेच वाढतात...काही सुटतात..तुटतात...वाद होतात...वैचारिक जाणीव वगैरे आल्यामुळं इगो हर्ट होतात...संवाद बंद होतो...पण त्यांची मैत्री कायम असते... मोकळ्या वेळी स्वतःशी संवाद करताना ते आठवत राहतात...त्या मैत्रीचे प्रसंग डोळ्यासमोर येत राहतात...त्या आठवणी मनाला सुखवतात... दुखावतात ...त्यांची माफी मागावी वाटते...पुन्हा बोलावे वाटतं...!

मित्राना आपलं सगळं माहित असतं... ते आपले दोषही जाणतात त्याचं वास्तव दाखवतात...शिवराम कसा आहे हे सर्वाना माहित आहे...खरं तर माझ्या आयुष्यात असणाऱ्या सगळ्या लोकांशी बहुतेक वादच होतात...शिवा हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणूनच परीचत आहे...मला खूप लवकर राग येतो...तरीदेखील अनेक मित्र सोबत आहेत याची खात्री आहे...!

मैत्रीला वय जात धर्म पंथ भाषा याचे बंधन घालता येणं मुश्किल आहे.... कोणत्या ना कोणत्या मार्गाने माझे मित्र झालेल्या सर्वांचे अभिनंदन...आता सोबत असणारे आणि नसणारे...आता माहित असणारे आणि नसणारे सारेच मित्र आणि मैत्रिणीदेखील आयुष्यात कायम सोबत असतात...मनात असतात...मनाशीच संवाद करतात...कधी कधी बोलायचं राहून जातं... पण सगळी माणसं प्रेमळ असतात...माणसं बदलतात...यावर ज्यांचा विश्वास असतो तीच खरी मैत्री जपणारी माणसं असतात...आपली मैत्री माझ्यासाठी आवश्यक आहे हे मात्र वास्तव आहे...मित्र-मैत्रिणी काय म्हणतील हि भीती जोपर्यंत असते तोपर्यंत माणसं चुकीचं वागायलाही घाबरतात...!

शिवराम ठवरे-9175273528
फ्रेंडशिप डेनिमित्त-07-08-2016
Shivramthavare25@gmail.com

देश स्वतंत्र आहे आपण स्वातंत्र अनुभवतोय का...!

देश स्वतंत्र आहे आपण स्वातंत्र अनुभवतोय का...!

भारताला स्वातंत्र मिळवल्यामुळं संविधान मिळालं...संविधानामुळं शिक्षण मिळवता आलं... शिकत असताना वास्तव विचार करणारी माणसं मिळाली...त्यांनी लिहलेली पुस्तकं मिळाली...त्यांचाकडून ज्ञान मिळालं... ज्ञानामुळं शोषण कळालं...शोषीत कोण ते समजू लागलं...!

स्वातंत्र अनमोल आहेच...पण 15 ऑगस्टला आपला स्वतंत्र दिवस साजरा करताना 14 ऑगस्टला स्वतंत्र दिवस साजरा करणाऱ्या पाकिस्तानला शिव्या घालणं म्हणजे देशप्रेम नव्हे...!

16 ऑगस्ट 1947 ला भर पावसात हजारो लोकांना संघटित करून "यह आझादी झूटी है देश कि जनता भुकी है" या विश्वव्यापी घोषणेचा अर्थ समजावून घेणं आणि  समाजात असणारे प्रश्न सुटावेत यासाठी थोडंफार काही करता आलं तर तो देशप्रेम म्हणता येईल...!

आता तर कुठे 70 वर्षे झाली आहेत... आपली वाटणारी माणसं बोलू लागली आहेत...शिकू लागली आहेत संघटित होऊ लागली आहेत...संघर्ष करू लागली आहेत...क्रांतीची गाणी गाऊ लागली आहेत...त्यांच्यासोबत राहूयात...क्रांतीची गाणी गाऊयात.

हजारो वर्षे सांस्कृतिक, राजकीय,सामजिक अंधारात दडवून ठेवलेल्या आपल्या माणसांना उजेडाच्या वातावरणाशी समरूप व्हायला वेळ लागणारच....स्वातंत्र मिळवण्यासाठी पुढच्या रांगेत शस्रासह आणि शस्त्राशिवाय प्रत्यक्ष लढणाऱ्या ज्ञात अज्ञात साऱ्या शिलेदारांना नेहमीच केवळ सलामच करत बसायचं कि आपणही आता स्वतंत्र देशात आपल्या न्यायासाठी संविधानिक मार्गाने लढाई करायची याचाही विचार करावा लागेल...!

अगदी माझ्या आई-वडीलनाही राष्ट्रगीत म्हणता येत नाही...ते कधी भारत माता की जय असे म्हटले असतील असही वाटत नाही.. देशात अशी अनेक माणसं आहेत ज्यांना देश म्हणजे काय सांगता येणार नाही अनेकांना अजूनही घरच नाहीत स्वतःचा पत्ता नाही..कोणतंही ओळखीच कागदपत्रं जवळ नाही रोज काम करून खाण्यापूरतं कमवायचं असा दिनक्रम असणारी लोकसंख्या जास्त आहे...!

देशात केवळ चांगले रस्ते,रेल्वे मोठ्या कंपन्या आल्या म्हणजे विकास म्हणता येईल का... सगळीकडं आलंबेल आहे असे भासवले जात आहे पण आज देशात वातावरण गंभीर आहे...माणसाचं मुक्त विचार करण्याचं स्वातंत्र धोक्यात आहे...संविधान धोक्यात आहे...त्यामुळं देश स्वतंत्र आहे आपण स्वातंत्र अनुभवतोय का असा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल आणि त्याचा समाधानासाठी काहीतरी योगदान करावेच लागेल...!

शिवराम ठवरे 14-08-2016
मुक्त पत्रकार -9175273538
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र
Shivramthavare25@gmail.com