Thursday 21 April 2016

रोहित ऍक्ट व संविधान परिषद"-24 एप्रिल 2016

रोहित ऍक्ट व संविधान परिषद"-24 एप्रिल 2016,बालगंधर्व रंगमंदिर पुणे.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे जाहीर आवाहन...!

जे.एन.यू. नवी दिल्ली येथील विदयार्थी नेता कन्हयाकुमारच्या 24 एप्रिलच्या "रोहित ऍक्ट व संविधान परिषद" कार्यक्रमात विद्रोहीचा सक्रिय सहभाग...!

पुण्यातील पुरोगामी विदयार्थी व युवक संघटनांनी भारतीय संविधानामुळे मिळालेले "मूलभूत अधिकार आणि लोकशाहीच्या निकोप अंमलबाजावणीसाठी" "पुरोगामी विदयार्थी युवक संघर्ष समिती" स्थापन केली आहे...या समितीमार्फत पुण्यामध्ये येत्या 24 एप्रिल 2016 बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे "रोहित ऍक्ट आणि संविधान परिषद" याविषयावर कन्हयाकुमारची जाहीर सभा होणार आहे. या समितीमधे विद्रोही सांस्कृतिक चकवळ,महाराष्ट्र व विद्रोही विदयार्थी संघटना सहभागी आहेत….देशामध्ये वाढत्या वैचारिक दडपशाही विरोधात प्रबोधन करण्यासाठी विद्रोहीने जानेवारीपासून “युथ अंगेस्ट फॅसिझम” अशा नावाने कृतिकार्यक्रम जाहीर केला आहे...त्याच्याच एक भाग म्हणून पुण्यातील या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निश्चित केले आहे..

देशामधील अशा स्फोटक परिस्थितीमध्ये लोकशाही मानणाऱ्या सर्वच व्यक्ती,संस्था संघटना राजकीय आणि बिगरराजकीय पक्ष यांनी एकत्र येण्याचे आवश्यक होते...पुण्यामध्ये कन्हयाकुमारच्या कार्यक्रमामुळे हे जुळवले त्याबाबत पुरोगामी विदयार्थी युवक संघर्ष समितीमधील सर्वच सहभागी असणाऱ्या घटकांचे अभिनंदन...संघप्रणित भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर शैक्षणिक संस्थांमधील विचार दाबून टाकण्याची सुरुवात झालेला " फॅसिझम" पुण्यातील एफ.टी. आय. आय. मध्ये झालेली सुरुवात हैदराबाद, केरळ जे. एन. यू. दिल्ली ते जम्मू काश्मीर दौरा करत परत फर्ग्युसन कॉलेजच्या माध्यमातून पुण्यात माघारी आली आहे...शिक्षण क्षेत्रातील वैचारिक दडपशाही दिवसेंदिवस वाढत चालळेली आहे...!

“संघाला आणि भाजपला न पटणारे कोणतेही प्रगतशील विचार” मुक्तपणे जाहीर करणाऱ्या युवकांना कायद्याची भीती दाखवून गप्प करण्यासाठी देशद्रोहासाखे खोटे गुन्हे दाखल करून समाजमन कलुषित करण्याचे षडयंत्र हाणून पाडणे काळाची गरज आहे…देशामधील मुलभूत प्रश्न बाजूला सारत भावनिक गोंधळाचे वातावरण तयार करून लोकांना भडकवले जात आहे...आजपर्यंत “जय श्रीराम” म्हणत लाखो हिंदू-मुस्लिम बहुजनांचे जीवन उध्वस्त करणारे आता रामाचे नाव चालत नसल्यामुळे "भारत माता कि जय" चा वापर करून बहुजन समाजातील तरुणांना विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत...!

लोकशाही व संविधान समर्थक यांच्या बरोबरच्या लढाईत “वैचारिक हतबलता” येत असल्यामुळे,लोकांना आपले कुविचार पटवून देता येत नसल्यामुळे “लोकशाही व संविधान नको असलेले धर्मांध घटक” या आणि अशा कार्यक्रमास देशभरात विरोध करत आहे... मानवमुक्तीचे विचार व्यक्त करणाऱ्या लोकांवर गोळ्या चालवत आहे,धमकीची पत्रे पाठवत आहेत,जाहीर कार्यक्रमात गोंधळ घालायला आमच्याच बहुजन समाजातील बांधवांचा वापर करत आहेत त्याचा यानिमित्ताने जाहीर निषेध...!

लोकशाही अबाधित राहावी म्हणून काम करणाऱ्या सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रतर्फे कॉ. वाहरू सोनवणे(नंदुरबार)कॉ. धनाजी गुरव(इस्लामपूर)डॉ. बाबुराव गुरव(तासगांव)कॉ. विजय मांडके,प्रा.युवराज जाधव (सातारा) कॉ.अविनाश कदम(मुंबई)प्रा. गौतम काटकर (मिरज) कॉ. जालिंदर घिगे(अहमदनगर) कॉ. शिवराम ठवरे(पुणे) गौतम कांबळे, जयवंत पवार (कोल्हापूर) आणि कार्यकर्त्यांनी केले आहे...!

आपला सोबती,
शिवराम ठवरे-9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र

Thursday 7 April 2016

शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच गोष्टी...?

शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच गोष्टी सांगितल्या जातात....!

1.अफजलखानाचा कोथळा
2.शाईस्तेखानाची बोटे
3.आग्राहून सुटका

पण मला भावलेले शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात....!

1.आपल्या "आईला सती जाण्यापासून रोखणारे" शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती" करणारे होते...!

2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे होते...!

3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते...!

4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक" होते...!

5.समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक"होते ...!

खर्या अर्थाने ते "लोकराजे" होते कारण ते सर्व धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते हीच खरी शिवशाही होती.....!

दीपक कोठावळे Deepak Kothawale
संघटक-विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.

आपले पूर्वज कोण होते...?

आज प्रत्येक समाजातील तरुण आमचे पूर्वज कसे शूरवीर होते....लढाई करत होते....शत्रूला कापून काढत होते....याचा इतिहास शोधून स्वतःला महान ठरवत आहे....!

पण वास्तवात आता पूर्वीसारख्या टोळीच्या लढाया आता कुणाला करायची वेळ येणार नाही आणि कुणी स्वतःचे समाजासाठी "स्वराज्य निर्मिती" करायचा प्रयत्न करू लागला तर ते "देशविरोधी कृत्य" होईल आणि भारतीय संरक्षण व्यवस्था त्यांचा बंदोबस्त करेल....!

आता लोकांनी आपण लोकशाहीत राहतो हे वास्तव लक्षात घेऊन....आपले पूर्वज केवळ लढाईच करत होते अशा भ्रमात न राहता त्यांचा "अभ्यास संशोधन आणि सर्जनशीलतेचा" वारसा पुढे आणावा लागेल तरच आपला आणि समाजाचा विकास होईल...!

आपले कायदेशीर हक्क आणि अधिकार जाणून घ्यावेत आणि "तलवारी" नाचवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा "लेखणी" हातात घेऊन जगावर राज्य करावे....!

24-02-2016

पुण्यनगरी सातारा आवृत्ती वर्धापन दिवस

दैनिक पुण्यनगरी सातारा आवृत्तीच्या 13 व्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा...!

"सज्जनांचा पुरस्कार...दांभिकांचा धिक्कार...दिनदुबळ्यांचा कैवार भ्रष्टांवर प्रहार...असा एल्गार करीत गेली 13 वर्षे साताऱ्यात सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधनाचे काम करणाऱ्या लाडक्या पुण्यनगरीस मनापासून धन्यवाद....!

आज दैनिक पुण्यनगरीच्या सातारा आवृत्तीला १३ वर्षे झाली हेच खरे वाटत नाही.....!

आज सहज आठवण म्हणून मागे पाहताना 12 वीत असताना प्रथम आवृत्ती म्हणून 13 वर्षांपूर्वी 1 रुपयात मिळणार  पुण्यनगरी..."शब्दकोडे सोडवायला" म्हणून दररोज घेत असे पण त्यातील बातमी मांडणीचे वेगळेपण....विशेष आणि परखड संपादकीय लेख यामुळे पुण्यनगरी जवळचा झाला तो आजपर्यंत दूर जाऊ शकला नाही...!

माझ्या लेखनाच्या मांडणीत देखील "पुण्यनगरीच्या संपादकीयचा प्रभाव" कुणाही अभ्यासकाला दिसून येईल इतकी जवळीक निर्माण झाली आहे...!

वृत्तपत्र व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या "बाबांनी" आज संपूर्ण देशात आपल्या समूहास "चौफेर ओळख" मिळवून दिली आहे...!

आजच्या काळात वृत्तपत्रांचे "बजेट आणि स्वायत्तता" सांभाळणे खूप अवघड गोष्ट झाली आहे...अशा परिस्थितीत साताऱ्याच्या संवेदनशील भूमीवर "संपादक प्रशांत पवार" यांचे मार्गदर्शनात पुण्यनगरीची भरारी उल्लेखनीय आहे...!

निरपेक्ष राजकीय भूमिका घेत...
शिक्षण,बेरोजगारी,सहकार,उद्योग,कामगार,पोलीस,शेतकरी,हमाल,विद्यार्थी,सामजिक चळवळी यासह सर्वसामान्य माणसाला पडणारे अनेक प्रश्न "पुण्यनगरीचे लेखनामुळे"सुटले आहेत....!

महिनोंन महिने सातत्याने एखाद्या विशिष्ट प्रश्नावर "शोधपत्रकारिता" करत तो शेवटास नेण्याचे काम देखील पुण्यनगरीने अनेक वेळा केलेले आहे...यापैकी लक्षात राहण्यासारख्या काही गोष्टी म्हणजे...पवनचक्की आंदोलन....केसुर्डी सेझ प्रकल्प...महामार्ग चोपदरीकरण भूमीअधिग्रहण...धरणग्रस्त पुनर्वसन...चारा छावणी घोटाळा...पाणलोट विकासगाथा...पर्यावरण समृद्धी....नकुशा मोहीम...निर्मल ग्राम योजना इत्यादी...!

अगदी अलीकडच्या काळात सातारा औद्योगिकरनाचे बाबत.... "मेक इन इंडिया वास्तव" नावाने लिहून...फलटण,खंडाळा आणि सातारा MIDC मधील बंद उद्योग आणि कामगार प्रश्न यावर वास्तववादी मांडणी केलेली दिसून येते....

सातारा जिल्ह्याच्या सर्वच भागातील लोकांना पेपर जवळचा वाटतो...कोणतीही "स्कीम" नसताना पेपर विकत घेऊन वाचनारांची संख्या दररोज वाढत आहे हेच पुण्यनगरीचे यश म्हणता येईल...!

सातारा आवृत्तीच्या 13 व्या वर्धपान दिनाच्या सर्व सहकारी मित्रांना शुभेच्छा देताना वाचक म्हनून यापेक्षाही अधिक आणि अखंड अपेक्षा आहेतच....आणि भविष्यात त्या पूर्ण होतीलच अशी आशा करतो....!

या आनंद सोहळ्यास मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आम्हा वाचकांना 13 वर्षे अविरत सेवा देणाऱ्या...पत्रकार,संपादक कार्यालयीन कर्मचारी,छापखान्यातील कामगार...वितरन व्यवस्था पाहणारे यासह सर्वांचे मनापासून आभार....!

शिवराम ठवरे 22-02-2016
मुक्त पत्रकार-9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र
Shivramthavare25@gmail.com

सॉक्रेटीस ते दाभोळकर,पानसरे वाहया तुकाराम

बहुचर्चित "सॉक्रेटीस ते दाभोळकर,पानसरे वाहया तुकाराम" नाटकाला रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून मिळाले कायमस्वरूपी योग्यता प्रमाणपत्र...!

जेष्ठ विद्रोही लेखक,नाटककार आणि पुरोगामी चळवळीतील मार्गदर्शक प्रा.राजाभाऊ शिरगुप्पे यांनी मांडणी केलेल्या बहुचर्चित "सॉक्रेटीस ते दाभोळकर,पानसरे वाहया तुकाराम" नाटकाला दिनांक 20 फेब्रुवारी 2016 ला रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे कायमस्वरूपी योग्यता प्रमाणपत्र अर्थात सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले आहे...!

याबाबत नाटकाचे लेखक आमचे मार्गदर्शक प्रा.राजाभाऊ शिरगुप्पे यांचेशी फोनवरून आज संपर्क साधला असता राजाभाऊ बोलले...... शिवराम धन्यवाद मित्रा ....पण अशा नाटकाची सेन्सॉरकडे नोंदणी करायला लागणे म्हणजे वेदनादायक आहे..."म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो आहे"असे आहे बघ...माणसाच्या वेदनेलाही व्यक्त व्हायला परवानगी घ्यावी लागते म्हणजे काय...?उद्या कोणी माथेफिरू उठेल आणि म्हणेल तुम्ही जाहीरपणे  हसायला,रडायला,बोलायला परवानगी घेतली का विचारेल...!

कारण "सडक नाटक' अशी संकल्पना म्हणून मांडणी केलेल्या या वेदनेला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या "सर्जनशील" कलाकारांमुळे संपूर्ण जगात प्रसिद्धी मिळाली...!

आणि सडक नाटकाला "सेन्सॉर परवानगी घ्यायलाच नको" अशी माझी भूमिका होती...कारण आपल्यासारख्या कार्यकर्त्याला सामान्य माणसासमोर व्यक्त व्हायला "सडक नाटक" हेच प्रभावी साधन आहे...पण रिंगण नाटक या काहीश्या नव्या शब्दामुळे याला "प्रयोगिक नाटक म्हणावे कि सडक नाटक" असा संभ्रम तयार झाला किंवा केला गेला...!

त्यातच कोणत्याही प्रगत विचारांना विरोध करायच्या "सनातनी" वृत्तीने घरात बसून आपल्याच बहुजन तरुणांना पुढे करत या नाटकाला विरोध करायचा फतवा काढला होता त्यामुळे स्वतः नाटक न पाहिलेले...स्वतः विचार न करणारे स्वतःला 'धर्माचे ठेकेदार" समजणारे काहीजण जाहीरपणे विरोध करायला लागले होते....!

खरे तर त्या "प्रतिगामी आणि बुरसट" विचारांच्या लोंकानी नाटकाला विरोध केला त्यामुळेच या प्रमाणपत्र मिळवण्याच्या भानगडीत आपण पडलो त्यामुळे तेच खरं तर अभिनंदनास पात्र आहेत...!

कायद्याचा धाक दाखवत उत्तम शिक्षण घेणारे तरुण,स्वतःची नोकरी आणि घर उत्तमपणे चालवणारे आपले शिलेदार अडचणीत यावेत यासाठी प्रत्येक कार्यक्रमापूर्वी उगाच प्रसिद्धी माध्यमे,महसूल प्रशासन आणि पोलिसांकडे तक्रारी करून विरोधी वातावरण तयार केले जात होते...!

विरोध करूनदेखील लोकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे हे पाहून विरोधक चिडून गेले होते....डॉ.नरेंद्र दाभोळकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांना जिवंत मारूनदेखील त्यांचे विचार थांबत नाहीत हे लक्षात येऊ लागले होते....!

त्यामुळे "प्रगतशील विचार" करणाऱ्या तरुण पिढीत "कायद्याचा धाक" दाखवून दहशत निर्माण करू पाहणाऱ्या "विकृत धर्मांध" लोकांना हि नोंदणी म्हणजे "कायदेशीर चपराक" आहेच पण यापेक्षाही आपण करत असलेले "संस्कृती बदलाचे आणि इतिहासाच्या पुनर्मांडणीचे काम" योग्यच असल्याचा पुरोगामी कार्यकर्त्याला होणार आनंद खूप उत्साहवर्धक आहे असेही राजाभाऊंनी सांगितले....!

या 20 फेब्रुवारीला कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जाण्याला एक वर्ष होण्याच्या दिवशीच ही नोंदणी होण्याची देखील विशेष गोष्ट आहे....यानिमित्ताने आपण आण्णांच्या दुसऱ्याचे म्हणजे वैचारिक शत्रूचेदेखील अभिव्यक्ती स्वातंत्र जपण्याची "मी नथुराम गोडसे बोलतोय" नाटकाच्या वेळी घेतलेली भूमिका लक्षात ठेवली पाहिजे...कोणत्याही आणि कशाही वापरलेल्या शब्दाला शब्दानेच उत्तर दिले पाहिजे.....!

नाटकाचं सेन्सॉर प्रमाणपत्र माझ्या नावाने आहे म्हणून हे "नाटक सादर करायला माझीदेखील परवानगी आवश्यक नाही" असेही मला वाटते...जगामधील कोणतयाही भाषेतील कोणत्याही परिवर्तनवादी माणसाला या नाटकाचा "मुक्त परवाना" आहे...!

राजाभाऊ म्हणाले आजपर्यंत यांच्या "खोट्या भाकडकथा" सांगून बहुजन समाजाला आर्थिक,सामजिक आणि मानसिक गुलामगिरीत ठेवणाऱ्या साऱ्या प्रतिगामी लोकांना त्यांचा विरोधाचा मूर्खपणा लक्षात यावा म्हणून "खरे,विज्ञानवादी आणि वास्तववादी विचार सांगणाऱ्या" या नाटकाची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला होता....!

अशाप्रकारे राजाभाऊनी सर्व पुरोगामी सहकार्यांना धन्यवाद देत नाटकाचा पुन्हा नव्या जोमाने प्रसार करण्याचे आवाहन केले आहे...संपर्क करणेसाठी प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे यांचा मोबाईल नंबर 9423287320 हा आहे...!

शिवराम ठवरे - 22-02-2016
मुक्त पत्रकार-9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.
Shivramthavare25@gmail.com

नीरजा भनोत

आज आपल्या पैकी खुप जणांना नीरजा भनोत कोण हे ही माहीत नसेल . नीरजा भनोत ही एक भारतीय विरांगना होती जीने 1986 साली  तिच्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने 400 जणांचे जीव वाचवीले आणि वयाच्या 23 वर्षी शहीद झाली . ती भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हां वीरता पदक मिळविनारि भारतीय ठरली होती . पण नंतर भारतीय त्यांच्या सवयी प्रमाणे या विरांगणेला  विसरून गेले .

नीरजा भनोत ही हरीश भनोत या हिन्दुस्थान टाइम्स मध्ये   असणाऱ्या पत्रकाराची मुलगी आणि Pan Am 73 या एयरलाइंस कंपनी मध्ये सीनियर पर्सर म्हणून काम करणारी मुलगी .

5 सप्टेम्बर 1986 मध्ये पाकिस्तान मधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अश्या जाणाऱ्या Pan Am 73 एयरलाइंस च्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले . त्या विमानात 400 प्रवासी होते . निरजा सुद्धा याच विमानात होती . अतिरेक्यांना ते विमान त्यांना इस्राइल मधल्या कोणत्या तरी इमारतीला धड़कावयाचे होते .

विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेवुन जाऊ शकत नव्हते . अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलट ची मागणी केली . पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली . अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाश्यांना मारायची धमकी दिली . त्यांनी निरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले . त्यातून त्यांना अमेरिकन प्रवाश्यांना निवडून मारायची धमकी देवून पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते .

निरजाने पासपोर्ट गोळा केले पण शिताफिने त्यातील अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले . त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाश्याला मारायची धमकी देवून पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला . पण निरिजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाश्याचे प्राण वाचविले .

निरिजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल . या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे निरजाने ठरविले त्याप्रमाणे तिने प्लानिंग सुरु केले . तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजा बद्दल माहिती देणारी पत्रक प्रवाश्यां पर्यंत पोहोचविले . निरजाने जसा विचार केला होता तसेच घडले . थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्ण पणे अंधार पसरला या परिस्थितीचा फायदा घेवुन निरजाने विमानाचे  सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले . प्रवाश्यांनी देखील पटापट विमाना बाहेर उड्या मारल्या .

अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला . काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले . सर्व प्रवासी विमानातून बाहेर पड़ेपर्यंत निरजा विमानात थांबली होती . आता ती विमानातून बाहेर पडणार एतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला . एव्हड्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते . त्यांनी त्या चार अतिरेक्यां पैकी तिन जणांना मारून टाकले . निरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती तेव्हड्यात तो चौथा अतिरेकी निरजाच्या समोर आला . निरजानी त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या . त्यातच तीचा अंत झाला . 17 तास अतिरेक्यांशी झुजंत चारशे प्रवाश्यांना वाचवुन निरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देवून गेला .

निरजाने वाचविलेल्या त्या लहान मुलां पैकी एक जण मोठा झाल्या वर वैमानिक झाला . त्याने त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर निराजाचा हक्क आहे .

भारताने निरजाला अशोक चक्र हां सर्वोच्च नागरी पुरस्कार  देवून सन्मानित केले .

पाकिस्तानने  तमगा-ए-इन्सानियत हां सर्वोच्च पुरस्कार दिला .

अमेरिकेने जस्टिज फॉर विक्टम ऑफ क्राइम अवार्ड हां वीरता पुरस्कार देवून सन्मानित केले .

शोध गणपतीचा...!

स्वराज्यशत्रू "सूर्याजी ठोसर" याने आरती लिहण्याच्या अगोदर होणारी गणपतीची पूजा कशी होत होती....?

आणि पेशव्यानी "जानवे" गळ्यात टाकून स्थापन केलेल्या गणेशमूर्तीच्या अगोदरच्या बहुजन "गणनायक" गणपतीचे वास्तव काय होते हे समाजासमोर आणावेच लागेल...!

मनुवादी ब्राह्मणी लोकांनी पळवलेला आपला महान बहुजन "सिंधुजन संस्कृतीरक्षक गणपती" परत आपल्याजवळ घ्यावा लागेल...!

#शोधगणपतीचा

जागातिक महिला दिन 8 मार्च 2016

जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...!

स्त्री सर्जनशीलतेचे प्रतीक....शेतीचा करण्याची प्रथम पद्धत आणि अन्न शिजवण्याची कला स्रीनेच शोधली मानतात...मानवी जीवनाचे प्रवेशद्वार...!

सार्वजनिक जीवनात संघर्ष करीत मानवाचे कल्याणासाठी परिवर्तनाचे काम करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात महिलांना मनापासून सलाम...त्याचबरोबर माझ्या स्वतःच्या जीवनात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ देणाऱ्या....माझ्या बऱ्या वाईट दिवसांत साथ देणाऱ्या सर्व मार्गदर्शक मैत्रिणीना मनापासून धन्यवाद...!

ज्यांचे जीवन माझ्या रोजच्या जगण्याचा भाग असणाऱ्या माझ्या कुटुंबातील.....माझी आई शांताबाई ठवरे,माझ्या बहीणी संतोषी देवकर आणि वैशाली खरात....माझी वहिनी स्वाती ठवरे तसेच माझी बायको सुनंदा पाटील....माझ्या दोन भाच्या शिवकन्या आणि ज्योती...आणि आमच्या घरातील वारसदार काव्या आणि स्वरा यांसर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा....!

शिवराम ठवरे 9175273528
मुक्त पत्रकार 08-03-2016
Shivramthavare25@gmail.com

देशद्रोही कन्हयाकुमार

कन्हयाच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाल्यामुळे सर्वसामान्य संघर्षशील युवकांना माझ्यावरही असा अन्याय केल्यास संपूर्ण देशातील माझे "वैचारिक साथी" सोबत येणारच हा विश्वास मिळाला हाच आपला विजय आहे....!

कन्हैया का कल का भाषण देख और सुनकर गर्व से रोंगटे खड़े हो गए।

कन्हैया: हम भारत से नहीं, बल्कि भारत में आज़ादी माँगते हैं ।

दिल से आवाज़ आयी।
हम ले के रहेंगे, आज़ादी।
हम लेके रहेंगे, आजा़दी।
भ्रष्टाचार से  आजा़दी।
जातिवाद से  आजा़दी। 
गरीबी से आजा़दी।
भुखमरी से आजा़दी।
ब्राम्हण वाद से आजा़दी।
संघवाद से  आजा़दी।
मनुवाद से आजा़दी।
तुम कुछ भी कर लो,
हम ले के रहेंगे  आजा़दी।
तुम कुछ भी कर लो, बस आजा़दी।
हम ले के रहेंगे,
और कहके लेंगे। आजा़दी।

जिसने कन्हैया को नहीं देखा और नहीं सुना उसे कभी पता नहीं चलेगा कि असली देशभक्ती होती क्या है ।

जोरदार, धमाकेदार, इंटेलेक्चुअल, व्यंगात्मक, विनम्र, जबरदस्त और नि:शब्द कर देने वाला भाषण।
लाल सलाम का मतलब कल कन्हैया ने मुझे समझा दिया।

अब दिल से निकलता है,
लाल सलाम! क्रांति को सलाम। इंकलाब जिंदाबाद ।

https://m.youtube.com/watch?v=8JhvepyZqhA&feature=youtu.be

महाशिवरात्री निमित्त शिव-पार्वती वास्तव...!

शिव-पार्वती :-बहुजनांना प्रेरक असे एक महान आद्य दांपत्य...!

शिव हे व्यक्तीत्व मूळचे आर्यांचे नाहीच हे बहुतेक सर्व संस्कृती अभ्यासकांनी मान्य केले आहे...सिंधुजन संस्कृतीत देखील शिवाचे अस्तित्व होते...!

शिव-पार्वती हे बहुजनांनाचे अतिप्राचीन काळातील अत्यंत गुणसंपन्न असे पूर्वज दांपत्य होय...त्यांच्या आधीचा इतिहास सापडणे अवघड आहे त्यामुळे एका दृष्टीने त्यांना तसे मानता येईल...!

आर्य आल्यानंतरच्या काळात त्यांचे दैवतीकरण करण्यात आले...शिवाला शंकर,महादेव,ईश,ईशान,रुद्र,भव,भर्व,सांब अशी विविध नावे देण्यात आली... पार्वतीला दुर्गा,उमा,चंडी,काली,गौरी इत्यादी नावे प्राप्त झाली...!

शिव हा सदैव "असुरांचा पाठीराखा" होता आणि विष्णू नेहमी असुरांचा नाश करण्याच्या प्रयत्नांत होता असेच आपल्याला आढळते....!

वैदिकांनी नंतरच्या काळात काही ठिकाणी शिवाविषयी आदर व्यक्त केल्याची वर्णने पाहायला मिळतात तरीदेखील त्याच्याविषयी "पुन्हा पुन्हा अनादरही" व्यक्त केलेला दिसून येतोच...!

शंकराचे वर्णन करताना अनेकदा "भोळा सांब" हे शब्द वापरले जातात...शंकराचे एकूण चरित्र पाहता हे भोळेपण भोळसटपणाचे नसून त्याची निष्कपट मनोवृत्ती असल्याचे दिसून येते...!

वैदिक परंपरेने बहुतेकवेळा "शिवापेक्षा विष्णूला श्रेष्ठ" मानले आहे..विष्णूचे खोटे दहा अवतार लोकांच्या मनात जसे रुजवण्यात आले तसे शिवाच्या बाबतीत झाले नाही...!

शिवाला स्मशानात राहणारा,भूतां खेतांचा नेता...राक्षसांचा तारणहार म्हणूनच समोर आणले गेले आहे...यामागे "शिवाची कुचेष्टा" करणे हेच वैदिकांचे धोरण होते...!

वास्तवात शिवाने ज्यांना मदत केल्याची वर्णने आढळतात ते सर्व नाग,असुर,दैत्य,दानव,राक्षस,पिशाच,भूत,खेचर किंकर इत्यादि येथील मूळचे मानवसमूह असल्याचे दिसून येते...याचा अर्थ सरळ आहे...आर्य आणि अनार्य या लढाईत शंकर नेहमीच "अनार्य" लोकांच्या बाजूने उभा राहत होता...!

शंकराच्या गळ्यात सदैव "नाग" असल्याचे दिसून येते तर विष्णूचे वाहन गरुड आहे याचा प्रतिकात्मक अर्थ लक्षात घेतला तरी समजून येईल "नागांना मारणारा त्यांचे भक्षण करणारा" म्हणून विष्णुसाठी नागांचा शत्रू गरुड हे वाहन निवडले आहे...!

नागाचे स्थान शंकराच्या गळ्यात आहे,हे त्या दोघांमधील एकमेकांच्या प्रेमाचे प्रतीक आहे...एखादी व्यक्ती प्रिय असली कि तिचा उल्लेख "गळ्यातील ताईत" म्हणून करतात...!

वासुकी हा नाग शिवभक्त आहे...शेष या नागाच्या हातात "नांगर आणि कोयता" असणे आणि शंकराचे वाहन नंदी असणे यावरून त्या दोघांचाही "कृषीसंस्कृतीशी" असलेला संबंध स्पष्ट होतो...!

अवैदिक गणपती शंकर आणि पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख हे सूत्र आपण लक्षात घ्यावे लागेल..गणपती हे केवळ एका व्यक्तीचे वा देवतेचे नाव या दृष्टीने पाहणे यापेक्षा "गणपती" हे एक "अत्यंत महत्वाचे पद" म्हणून पाहणे हा खरा ऐतिहासिक दृष्टिकोन होय...काळाच्या ओघात शंकराचे वैदिकिकरण झाले त्यामुळे गणपतीचेही होणे स्वाभाविक आहे...!

"मूळ क्षेत्रपती" असणाऱ्या आपल्या अनार्य लोकांची आज झालेली सांस्कृतिक दुराव्यस्था कशामुळे झाली ते समजून घ्यावीच लागेल...!

आमच्या रक्तवहिन्यांमधून "असुर दैत्यांचे रक्त" वाहत असेल तर ते आम्ही का नाकारावे...? आपल्या देशात लहानपनापासून मुलांना औपचारिक शिक्षण देताना त्यांची मने आत्मद्वेषाने भरून टाकण्याचा उद्योग केला जातो...आपण आर्य आहोत अनार्य मागास होते म्हणून आपण श्रेष्ठ आहोत असा खोटा अभिमान मनावर बिंबवला जातो...!

आज महाशिवरात्रीला शंकराचे स्मरण करताना स्वतःला प्रश्न विचारू आपण आर्य कि अनार्य...मग सगळेच आर्य आहोत तर अनार्य गेले कुठे...? स्वतःच्या नजरेने स्वतःचा इतिहास पाहूयात...!

सर्वच बहुजन दैवतांचा संदर्भ शंकराशी कसा काय जोडला जातो...जोतिबा,खंडोबा,बिरोबा,भैरोबा,म्हसोबा आदी सर्वच देवांना "सदाशिवाचे रूप" का मानले जातेय याचाही मागोवा घेण्याचा संकल्प करूयात...!

स्वतःला स्वतःच्या महान इतिहासापासून अलग करून टाकण्याच्या "आत्मघातकी" विचारापासून मुक्त होण्याची गरज आहे...ज्या दिवशी आपण आपल्या नजरेने स्वतःकडे पाहू त्यावेळी आपली आपल्याला ओळख पटेल आणि तो दिवस आपल्या "आत्मज्ञानाचा" असेल...!

सोशल मीडिया करीत संकलन
शिवराम ठवरे-9175273528
संदर्भ "बळीवंश" डॉ. आ. ह.साळुंखे
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.