Saturday 5 March 2016

व्यावसायिक समाजकार्य MSW आणि BSW पदवीधरांचे वास्तव.....!

व्यावसायिक समाजकार्य MSW आणि BSW पदवीधरांचे वास्तव.....!

🍂दूसरे चर्चासत्र 29 ऑक्टोबर 2015🍂
"महात्मा जोतिबा फुले सभागृह"
महात्मा जोतिबा फुले समता प्रतिष्ठान कार्यालय,
भवानी पेठ,पुणे.

🌹🌹🌹👏👏👏👏👏🌹🌹🌹

सातारा येथे 23 ऑगस्ट 2015 ला झालेल्या पहिल्या चर्चासत्रात ठरल्याप्रमाणे आज पुणे येथे दूसरे चर्चासत्र घेतले होते यामधे प्रत्यक्ष सहभागी झालेल्या आणि हे चर्चासत्र होण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या,सूचना करणाऱ्या,विषय सुचवणारया सर्वांचे प्रथम हार्दिक अभिनंदन.....!

🌹🌹🌹👏👏👏👏👏🌹🌹🌹

🌺🌿🌿🌿 पार्श्वभूमी🌿🌿🌿🌺

सातारा येथे झालेली पहिली बैठक आणि त्यातून MSW आणि BSW पदवीधारकांचे प्रश्न किती गंभीर आहेत त्यामुळे राज्यव्यापी संघटन करणे गरजेचे आहे असे ठरले होते....!

सदर बैठक झालेनंतर बऱ्याच लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि नगर येथे बैठक घ्यावी असे ठरवले पण ती काही कारणाने रद्द झाली....!

दरम्यान माझी सोशल मिडीयावर गेलेली पोस्ट वाचून मुंबईचे उदय पारकर,छात्र भारतीचे संदीप आखाडे,APSW चे रमाकांत पडवळ,मयूर बागुल,अनिल पाटील यांचेसोबत संपर्क वाढला....!

त्यातच सातारा येथे आमचे सर प्रा.विजय माने जेष्ठ सहकारी  ऋषिकेश शिलवंत,सुधीर तुपे मधुकर माने आणि माझे सर्व मित्र यांचेसोबत झालेल्या संवादातुन विविध प्रश्न चर्चेत आले आणि "मासिक" सुरु करणेसाठी नियोजन सुरु झाले....!

यानंतर पुणे येथे बैठक बोलवावी असे नक्की केले आणि APSW प्रमुख लोकांशी 23 तारखेला सारसबाग पुणे येथे चर्चा केली आणि एकत्र बैठक घेण्याचे ठरले....!

🌺🌿🌿🌿 सारांश 🌿🌿🌿🌺

नेहमी प्रमाणे कोणतेही विशेष निमंत्रण नसताना आणि सुट्टीचा दिवस नसुनही या बैठकीस  समाजकार्याचे 22 पदवीधर आणि 2 इतरजण असे एकूण 24 जण  उपस्थित होते.....!

पहिल्या बैठकीला उपस्थित असणारे फक्त 3 जण होते इतर 21 जण नवीन होते हे विशेष....!

बरोबर 5 वाजता 7 जण असताना बैठक सुरु झाली आणि महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे सरचिटणीस नितिन पवार यांचेसह सर्व 24 जणांचे एकमेकांचे परीचयाने बरोबर 8 वाजता बंद केली...!

बैठक झालेनंतरही काही फोन आले आणि प्रतिष्ठान कार्यालयास भेट दिली पण वेळेत न आलेमुळे त्याना सहभागी होता आले नाही....!

बैठकीत अगोदर ठरलेले अजेंडयावरील विषय,आमचे जेष्ठ सहकारी हेमेंत भोसले यानी केलेल्या सूचना आणि उपस्थित सर्व लोकांचे मत विचारात घेऊन चर्चा करुन खालील निर्णय घेतले....!

व्यावसाईक समाजकार्य पदवीधरांची (M.S.W-B.S.W.) एकत्रीतपणे राज्यव्यापी संघटना तयार करायची आहे याबाबत जनमत तयार व्हावे यासाठी राज्यात किमान 10 ठिकाणी अशीच चर्चासत्र आयोजित करणे....!

आपले प्रश्न आणि समाजकार्य बाबत घडामोडी याकरीता सातारा येथून  मासिकाचे प्रकाशन करणे याकरीता "मधुकर माने" यांचेकडे संपादक म्हणून जबाबदारी द्यावी असे ठरले आहे...!

पुणे येथील पर्वती स्वयंरोजगार संस्था येथे नियुक्ति प्रमाणपत्र न देता कमी पगारात M.S.W. पदवीधारकांची पिळवनणूक  केली जात आहे....त्याच बरोबर सातारा येथे TCI फाउंडेशनच्या गेली 6 महीने पासून थकित पगाराबाबत मदत मागितली आहे याचा विचार करुन निवेदन तयार करुन पुढे जावे लागेल असा विचार केला आहे....!

सुधीर तुपे यांचे मार्गदर्शनात सातारा जिल्हा एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कर्मचारी संघटनेच्या अंदोलनास पाठिंबा जाहीर करुन वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे यांच्या मनमानी पद्धतीने बि.व्हि.जि. इंडिया कंपनीला दिलेल्या ठेक्याचा निषेध केला...!

हेमंत भोसले यानी उपस्थित केलेले प्रश्न विचारात घेऊन असे ठरवले संघटना पदाधिकारी निवड होणारच आहे पण अजुन ती वेळ आली नाही....!

MASWE च्या अजेंडयावर समाजकार्य पदवीधरांकरीता महाराष्ट्र कौन्सिल ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर्सची स्थापना करणे हा विषय आहे त्याबाबत मसूदा तयार करुन त्यानी शासनास सादर केला आहे त्याचा पत्रव्यवहार वाचून दाखवन्यात आला....!सदर मसूदा मिळवून अभ्यास करणेचे ठरले आहे....!

अहमदनगर येथील नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर सोबत आपले विषय घेऊन बैठक करणे...!

MASWE सोबत काम करणेसाठी संघटना नाव आणि पदाधिकारी निवड झालेवर संलग्नता मागणीबाबत आपलेकडून लेखी अर्ज करावा लागेल असे ठरले...!

प्रोफेशन म्हणून मान्यता मिळावी हा प्रमुख उद्देश् असला तरी NGO सेक्टर आणि सरकारी प्रोजेक्टवर काम करीत असताना समाजकार्य पदवीधारक कामगार म्हणूनच असतो त्यामुळे त्याचे कामाचे नियमन होणेकरीता आपणास काम करावेच लागेल.....!

आगामी बैठकीकरीता महाड,बुलढाणा,सोलापूर,नाशिक,अहमदनगर इत्यादी प्रस्ताव आले आहेत यापैकी सोईची असणारी पुढील बैठक नियोजित करावी लागेल....!

   🌺🌿🌿विशेष आभार🌿🌿🌺

चर्चासत्रात सहभागी झालेले युवराज शिंगटे,विक्रांत मोरे,उत्तम शेळके,सचिन कुंभार सर्व सातारा,नागपुरहून आलेले प्रवीण दिहांदडे,पुणे येथील महिपाल कांबळे,संयोगिता बिराजदार,मानसी भोसले,मयूर बागुल,रमाकांत पडवळ,जास्मिन मढाले,रूपाली जमादार,जनू पागी,शशिकांत जाधव,संदीप भालेराव यांचे प्रतिनिधी,सोलापूरचे अमित अजनालकर,नंदुरबार वरून आलेला राज वळवी, शेगावचा संदीप वानखेडे, संतोष धोको संगमनेर आणि नंतर उशिरा आलेमुळे भेट न झालेले सर्व आजी-माजी पदवीधर....!

संघटना उभी राहवी असे वाटनारे आणि त्याकरिता आपल्या पद्धतीने मदत करणारे सर्वजण...!

सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या या नव्या प्रयत्नास प्रसिद्धि देणारे सर्व माहित असणारे आणि नसणारे सहकारी.....!

बैठकीसाठी मोफत कार्यालय  उपलब्ध करुन देणारे महात्मा जोतिबा फुले समता प्रतिष्ठानचे साथी नितिन पवार.....
!

🌺🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌺

आगामी कार्यक्रम आणि अधिक माहितीसाठी आपले मित्र निमंत्रक विक्रांत मोरे - 7350326456 आणि मयूर बागूल - 9096210669 यांचेशी संपर्क  करु शकता......!

आपणास यात सहभागी व्हावे वाटत असेल तर शक्य त्या मार्गाने शक्य त्या ठिकाणी सहभागी व्हा...! मदत करा....!चर्चा करा...! शेअर करा...!

शिवराम ठवरे-29-10-2015
मुक्त पत्रकार 9175273528
shivramthavare25@gmail.com
09175273528.

No comments:

Post a Comment