Saturday 5 March 2016

व्यावसायिक समाजकार्य MSW आणि BSW पदवीधरांचे वास्तव.....?

व्यावसायिक समाजकार्य MSW आणि BSW पदवीधरांचे वास्तव.....?

🌹🌹🌹👏👏👏👏👏🌹🌹🌹

🍂पहिले चर्चासत्र 23 ऑगस्ट 2015🍂

पहिल्या चर्चासत्रात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या आणि हे चर्चासत्र होण्यासाठी पाठिंबा सहकार्य करणाऱ्या सर्वांचे प्रथम हार्दिक अभिनंदन.....!

🌹🌹🌹👏👏👏👏👏🌹🌹🌹

🌺🌿🌿🌿पार्श्वभूमी🌿🌿🌿🌺

MSW ची पदवी घेतल्यापासून मागील 3 वर्षे पाहतोय,ऐकतोय आणि   अनुभव घेत आहे....समाजकार्य विषयात 2 ते 5 वर्षे शिक्षण घेऊन नोकरी मिळवणे दिव्यच आहे आणि मिळाली तर दरमहा 4 हजार पासून सुरुवात म्हणजे चेष्टाच....?

शिकत असताना तर अडचणी आहेतच पण शिक्षण झालेवर त्यापेक्षा कैक पटीने वाढतात हे लक्षात आले.

सर्वांचा अनुभव सार्वत्रिक आहे हा प्रश्न कुणा एकाचा नाही त्यामुळे आपल्या समस्या आपणच सोडवू शकतो का....?

व्यावसायिक समाजकार्य MSW आणि BSW शिक्षण घेतलेल्या आणि शिकत असणाऱ्या पदवीधारकांचे प्रश्न शासनासमोर उपस्थित करुन सोडवता यावेत यासाठी आपण संघटित झाले पाहिजे या उद्देशाने ही पहिली बैठक बोलवली.

🌺🌿🌿🌿 सारांश 🌿🌿🌿🌺

अगदी थोड्या वेळातील नेटक्या नियोजनतून झालेल्या या चर्चेतून MSW आणि BSW पदवीधारकांचे प्रश्न किती गंभीर आहेत याची जाणीव आज झालेल्या या चर्चासत्रातुन झाली.

कोणतेही विशेष निमंत्रण नसताना या कार्यक्रमास समाजकार्याचे 51 पदवीधर आणि 2 शिक्षक उपस्थित होते.

यातही विशेष म्हणजे सातारा येथे बैठक असूनही बाहेरील 5 महाविद्यालयातील पदवीधर उपस्थित होते.

सकाळी साडेनऊला सुरु झालेल्या चर्चासत्राची सुरुवात जमलेल्या सर्वांची एकमेकांना ओळख करुन सुरु झाली.

MSW आणि BSW पदवीधर झाल्यानंतर शासन आणि NGO यांचेकडून होणाऱ्या आर्थिक शोषणाचे  प्रकार भयानकच होते.

एका राज्य पातळीवर नावाजलेल्या संस्थेने गेली 5 महीने पगारच केला नाही.

शासनाने करार तत्वावर नेमलेल्या MSW शिक्षित कर्मचारयास पगार तर  वेळेवर मिळत नाहीतच पण इतके शिक्षण घेऊन चतुर्थश्रेणी कर्मचारया इतकीही किम्मत मिळत नाही.

प्रचलित कामगार कायद्यात |सोशल वर्कर" वा "सेवादूत" असे कोणतेही शब्द। नाहीत त्यामुळे साहजिकच सारया NGO ना कर्मचारी वर्गाचे शोषण करायला मोकळे रान आहे.

कामगार कायद्यात "व्यावसायिक समाज कार्यकर्ता" कोणास म्हटले पाहिजे हेच स्पष्ट केले नसल्यामुळे PF,Gratuity, Minimum Wages,ESIC,Maternity बोनस अथवा पगारी रजा असे कोणतेही लाभ मिळत नाहीत.

🌹🌿🌿पुढील वाटचाल🌿🌿🌹

MSW आणि BSW व्यावसायिक समाजकार्य पदवीधरांची "राज्यव्यापी संघटना" तयार करणे.

संघटना उभारणी करीता आणि जनजागृति करीता शक्य त्या ठिकाणी असे चर्चासत्र आयोजित करणे.

मास्वे "MASWE" च्या पदाधीकारयासोबत चर्चा करुन संघटना सलग्न करणेबाबत चर्चा करणे.

संघटने मार्फत पदवीधरांचे प्रश्न समोर यावेत यासाठी लवकरच एका मसिकाची सुरुवात करणे.

तात्कालिक प्रश्न सुटावेत यासाठी कुणी मदत मागितली तर सहकार्य करणे.

रोजग़ार विषयक मार्गदर्शन करणे.

व्यावसायिक समाजकार्य करणाऱ्या कामगारांचे शोषण थाबवाण्याकरीता स्वतंत्र कामगार कायदा तयार करण्यासाठी प्रयत्न करणे.

🌺🌿🌿विशेष आभार🌿🌿🌺

चर्चासत्रात सहभागी झालेले सर्व आजी-पदवीधर.

सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसिद्धि देणारे सर्व माहित असणारे आणि नसणारे सहकारी.

यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क सातारा चे सर्व प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी.

बैठकीसाठी मोफत हॉल उपलब्ध करुन देणारे कला व वाणिज्य महाविद्यालय साताराचे प्रा.रविन्द्र चव्हाण.

🌺🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌺

आगामी कार्यक्रम आणि अधिक माहितीसाठी आपले मित्र विक्रांत मोरे यांचेशी संपर्क 7350326456 या नंबरवर करु शकता.

आपणास यात सहभागी व्हावे वाटत असेल तर शक्य त्या मार्गाने शक्य त्या ठिकाणी सहभागी व्हा...! मदत करा....!चर्चा करा...! शेअर करा...!

शिवराम ठवरे-26-08-2015
shivramthavare@gmail.com
09175273528

No comments:

Post a Comment