Tuesday 16 August 2016

फ्रेंडशिप डे 2016

मित्र कोण कोण असतं...ज्यांचा सगळ्यात जास्त राग येतो...ज्यांचाकडून आपल्याला अपेक्षा असतात...ज्यांचाशी आपण दडवून ठेवलेलं बोलू शकतो... स्वतःची प्रतिमा आणि स्वतःचे वास्तव यात कोणताही आडपडदा न ठेवता बोलता येतं... हसता येतं...रडता येतं...!

आयुष्यात वाढत्या वयाबरोबर मित्रही बदलतात...बरेच वाढतात...काही सुटतात..तुटतात...वाद होतात...वैचारिक जाणीव वगैरे आल्यामुळं इगो हर्ट होतात...संवाद बंद होतो...पण त्यांची मैत्री कायम असते... मोकळ्या वेळी स्वतःशी संवाद करताना ते आठवत राहतात...त्या मैत्रीचे प्रसंग डोळ्यासमोर येत राहतात...त्या आठवणी मनाला सुखवतात... दुखावतात ...त्यांची माफी मागावी वाटते...पुन्हा बोलावे वाटतं...!

मित्राना आपलं सगळं माहित असतं... ते आपले दोषही जाणतात त्याचं वास्तव दाखवतात...शिवराम कसा आहे हे सर्वाना माहित आहे...खरं तर माझ्या आयुष्यात असणाऱ्या सगळ्या लोकांशी बहुतेक वादच होतात...शिवा हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणूनच परीचत आहे...मला खूप लवकर राग येतो...तरीदेखील अनेक मित्र सोबत आहेत याची खात्री आहे...!

मैत्रीला वय जात धर्म पंथ भाषा याचे बंधन घालता येणं मुश्किल आहे.... कोणत्या ना कोणत्या मार्गाने माझे मित्र झालेल्या सर्वांचे अभिनंदन...आता सोबत असणारे आणि नसणारे...आता माहित असणारे आणि नसणारे सारेच मित्र आणि मैत्रिणीदेखील आयुष्यात कायम सोबत असतात...मनात असतात...मनाशीच संवाद करतात...कधी कधी बोलायचं राहून जातं... पण सगळी माणसं प्रेमळ असतात...माणसं बदलतात...यावर ज्यांचा विश्वास असतो तीच खरी मैत्री जपणारी माणसं असतात...आपली मैत्री माझ्यासाठी आवश्यक आहे हे मात्र वास्तव आहे...मित्र-मैत्रिणी काय म्हणतील हि भीती जोपर्यंत असते तोपर्यंत माणसं चुकीचं वागायलाही घाबरतात...!

शिवराम ठवरे-9175273528
फ्रेंडशिप डेनिमित्त-07-08-2016
Shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment