Tuesday 9 February 2016

नक्षलवादी हे धार्मिक दहशतवादी नाहीत....शिवराम ठवरे

नक्षलवादी "दहशतवादी" नाहीत...!

नुकतेच नक्षलवादयानी चौकशी करीता ताब्यात घेतलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी विकास वाळके,श्रीकृष्ण शेवाळे आणि आदर्श पाटील यांची सुखरूप सुटका आणि त्या विद्यार्थिनी दिलेल्या प्रतिक्रिया यासंबंधित बातम्या पाहता परत एकदा हे सिद्ध होत आहे कि "नक्षलवादी हे दहशतवादी" नाहीत....!

नक्षलवादाबाबत चर्चा करीत असताना आपणास त्याच्या बाबत प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे...!

भारतातील अन्यायकारक "जमीनदारी-वेठबिगारी पद्धती" विरोधात शोषित जनतेचे नेतृत्व स्विकारत "चारु मुजुमदार आणि कनू सन्याल" यानी 'नक्षलबारी" या खेडयात कसनारया लोकाना जमीन मिळावी म्हणून प्रथम सशत्र उठाव केला...!

या उठावाची परिणामकारकता इतकी स्पष्ट दिसून आली की प्रचलित कायदे,मानवता हेच काय अगदी देवाची सुद्धा भीति न राहिलेले "मुजोरडे जमीनदार" केवळ श्रमिकांचे कष्टच ओरबडत नसत तर त्याच्या तरुण स्त्रीया लहान मूली "जबरदस्तीने उपभोगत" असत...!

त्यांचे विरोधात तक्रार करावी तर तक्रार घेणारी यंत्रणा आणि न्याय करणारी व्यवस्था त्यांचीच "भाटगिरी" करणारी..हा अनुभव केवळ आदिवासी भागात नाही तर आपल्याला देखील अनेक वेळा आला असेल त्यामुळेच "शाहन्याने कोर्टची पायरी चढु नये" असे बोलले जाते...!

अशा परस्थितित कोणताही सामान्य माणूस बंडाचा मार्ग स्विकारेल.....पिचलेला समाज मग "शंभर दिवस शेळी बनून जगन्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन मेलेले चांगले" असा प्रमाणिक विचार करु लागतो तोच मार्ग "नक्षलबारी" ने दाखवला आणि नक्षलवाद चळवळीचा उगम झाला...!

प्रस्थापित व्यवस्थेविरोधात "सशस्त्र क्रांती"चा मार्ग देशाला अजिबात नवीन नाही...भारतीय राजकीय इतिहास पाहता सशस्त्र  क्रांतिची कल्पना देशाला नवीन नाही...शिवाजी महाराज देखील सशत्र क्रांतिकारकच होते..देशाच्या स्वतंत्र संग्रामात भगतसिंग,चन्द्रशेखर आझाद पासून ते नेताजी सुभाषचन्द्र बोस हेदेखील सशत्र लढले...क्रांतिसिंह नाना पाटील यांचे प्रतिसरकार आपण कसे विसरु शकतो...बिरसा मुंडा,तंट्या भिल्ल,उमाजी राजे, लहुजी वस्ताद याना बहुजन समाज कसा विसरेल...!

या सारया सशस्त्र चरित्र गाथा आपल्याला वाचताना ऐकताना बरे वाटते आपल्या हे सारे नायक आपल्याला जवळचे वाटतात....पण "नक्षलवाद चळवळी" बद्दल असलेला अपुरा अभ्यास आपणास त्यांचेबद्दल गैरसमज तयार करतो...!

भारत स्वतंत्र झालेनंतर खरे तर इथल्या बहुसंख्य भूमिहीन शेतमजुर,अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी,कामगार,कष्टकरी बहुजन समाजाला आता आपले कल्याण होईल असे वाटले होते...!

परंतु देशातील समाजवादी विचार जसजसा मागे पडत गेला स्वतंत्र संग्रामातील प्रत्यक्ष लढणारे नेतृत्व जसजसे कमी होत गेले तसतसे लोककल्याणकारी धोरण बदलत गेले...!

भांडवल धार्जिणे निर्णय घेत जंगल,जमीन,पाणी,हवा,खानिजे आणि सूर्यप्रकाश यावरील सार्वजनिक मालकी खाजगी करण्यात आली...जागतीकरणाचे नावाखाली बड़या आंतरराष्ट्रीय शेटजीना उदार सवलती मिळू लागल्या आहेत...!

सर्वसामान्य तरूणाला कामगार कायदे कमजोर करुन त्या शेटजिंकडे त्यांची स्वप्ने पूर्ण करायला "कंत्राटी स्वरूपातील नोकरया" करायला लावणे हा "औद्योगिक विकास" वाढला आहे...!

या अशा स्फोटक परिस्थितीत संविधानाला अभिप्रेत नसलेली हिंसा "वाट चुकलेले आपलेच देश बांधव" करीत आहे हे मलाही पटत नाही....त्याचा निषेधच करावा लागेल पण "नक्षलवाद म्हणजे धार्मिक" वा जातीय द्वेषाने हेतू पूर्वक केलेला अत्याचार नाही हे वास्तव स्विकारावे लागेल...!

नक्षलवाद हा प्रश्न मुळातून संपवणेसाठी भारतीय घटनेला अभिप्रेत असलेली आर्थिक,सामाजिक,राजकीय,संस्कृतिक समता स्थापन होणे गरजेचे आहे...!

याकरीता "सर्वकष, समान आणि शास्वत विकास" या संकल्पनेवर उभ्या असलेल्या "डाव्या" चळवळीतील राजकीय पक्षाना सत्ता मिळालेशिवाय तो बदल होईल अशी कल्पना करणे चुकीचे असेल.....!

कारण बाबासाहेब देखील म्हणाले होते राज्यघटना कितीही चांगली असली तरी त्याची "अमलबजावाणी करणारे" चांगले असले पाहिजेत....!

कदाचित हा लेख लिहला म्हणून मला कोणी "नक्षलवाद समर्थक" बोलेल कारण या व्यवस्थे विरोधात बोलणारा आवाज बंद करणेसाठी चळवळीतील तरुण कसे तुरुंगात सडवले जातात ते आपण वेळोवेळी पाहत आलो आहोत...गुन्हे सिद्ध न झालेमुळे अनेकजण निर्दोष मुक्तही झाले आहेत पण त्यांची उमेदिची 5 ते 10 वर्षे वाया गेल्यावर....!

आजही दिल्लीचे एक आंतरराष्ट्रीय किर्तीचे "प्रा.साईंबाबा" आणि महाराष्ट्रातील कबीर कला मंचचे कार्यकर्ते यांचे उदाहरण ताजे आहे...यातील "सचिन माळी" तर बाप होऊन देखील आपल्या स्वतःचे मुलाला 2 वर्षे झाली तरी मांड़ीवर खेळऊ शकला नाही यापेक्षा जास्त शिक्षा काय असेल...!

उदया कदाचित ते निर्दोष सुटतीलही पण गेलेली वर्षे परत मिळतील काय..? त्यांचे पेक्षा गंभीर आरोप असलेले "अमित शहा आणि नरेंद्र मोदी" यांचे प्रमाणे ते राजकीय सामाजिक पद प्रतिष्ठा मिळवतील काय...?

उत्तर नाहीच आहे....बरोबर ना...?

शिवराम ठवरे-07-01-2016
मुक्त पत्रकार-9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.
shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment