Thursday 7 April 2016

सांगली जिल्ह्यातील नवीन बौद्ध लेणी

सांगली जिल्ह्यातील प्राचीन इतिहास प्रकाशात आणणाऱ्या गिरिलिंग डोंगरावरील बौद्ध लेण्याचे जतन, संवर्धन करून "कुकटोळी गाव" "जागतिक वारसा" जोपासणारे "पर्यटन स्थळ" व्हायला हवे हीच लेणी संशोधक "मानसिंग कुमठेकर आणि  प्रा. गौतम काटकर" यांची प्रामाणिक भूमिका आहे....!

मागच्या महिन्याच्या अखेरीस राज्यभरातील प्रमुख आणि स्थैनक दैनिकांत सांगली जिल्ह्यातील "बौद्ध श्रमण परंपरा" सांगणाऱ्या डोंगररांगेतील लेण्या शोधल्याच्या बातम्या आल्या आणि महाराष्ट्राला येथील नवा ऐतिहासिक वारसा माहित झाला....यनिमित्तताने या विषयाचा घेतलेला आढावा...!

गेली अनेक वर्षे मिरज इतिहास संशोधन मंडळाचे "मानसिंग कुमठेकर" व "प्रा. गौतम काटकर" या दोन्ही अभ्यासकांनी दंडोबा डोंगररांगेत कुकटोळी ता.कवठेमहांकाळ गावच्या हद्दीत "गिरिलिंग डोंगर" नावाने ओळ्खणारा परिसर स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने संशोधक दृष्टीने पायी घातला आहे.....!

सुमारे ८ किलोमीटर चौरस पसरलेल्या सगळ्या डोंगराच्या कडा त्यांनी अभ्यासू नजरेने पाहत..."ऐतिहासिक संदर्भ" जोडत या लेण्या बौद्धकालीन आहेत की नाही यावर त्यांनी अभ्यास पूर्ण संशोधन केले.....!

आजच्या काळात सांगली जिल्ह्यातील नवीन संशोधन करण्याची वृत्ती कमी झाली आहे काय असे वाटत असताना या '₹"नव्या शोधामुळे" सांगली जिल्हा पुन्हा एकदा जगात चर्चेला आला आहे...!

खरे तर या "गिरीलिंग" डोंगरातील  लेण्या अगोदर पासूनच अस्तित्वात होत्या...पण स्थानिक लोकांना "इथे जे आहे ते नक्की  काय आहे" ते माहित नसल्यामुळे ते उजेडात आले नाही...पण आता "मानसिंग कुमठेकर आणि गौतम काटकर" यांची अभ्यासू नजर याकडे गेल्यामुळे आणि संपूर्ण राज्यातील प्रसिद्धी दिल्यामुळे लेण्यांचा कालखंड, त्यांची रचना, लेण्यांच्या भिंती, लेण्यातील खांब, स्तुप यास सर्वांचा अभ्यास करून या लेण्या बौद्ध धर्मीय आहेत हे उजेडात आले आहेत...!

उन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता या दोन अभ्यासकांनी केलेले हे संशोधन जिल्ह्याच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली आहे....आता खरी गरज आहे कि हा "ऐतिहासिक वारसा" जतन करायची...याचा लौकिक टिकवून ठेवायची...!

अभ्यासकांनी आपले काम केले आहे खरे...पण त्यांना या ठिकाणी सातत्याने येणे शक्य नाहीच...त्यामुळे गावातीलच स्थानिकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याचे "जागतिक पर्यटन केंद्र" म्हणून विकास होण्यासाठी प्रयत्न करावेत असे वाटते....!

खरे तर शासकीय यंत्रणेने याकडे गांभीर्याने पाहून या शोधाची दखल घ्यायला पाहिजे होती...परंतु आपल्या स्वतःच्या गावातील हा ठेवा आपणच जपायला पाहिजे असे वाटते...!

शोधला चांगली प्रसिद्धी मिळाली आहे त्यामुळे इतिहास अभ्यासक आणि चिकिस्तक लोकांनी "कुकटोळी" गावाकडे धाव घेतली आहे...याचा आता केवळ "पर्यटन स्थळ" म्हणून वापर होण्याची शक्यता आहे...परंतु याला "एक जागतिक पर्यटन केंद्र" म्हणून निर्मिती व्हावी असे वाटते...!

सांगली जिल्ह्याच्या मातीत असणाऱ्या ऐतिहासिक व सांस्कृतिक प्राचीन ठेवा असल्याने त्याचे जतन व संवर्धन ऐतिहासिक दृष्टिकोनातूनच केले पाहिजे....याकरिता या गावातच यासाठी काय करता येईल याची दिशा ठरवणेसाठी सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामजिक जाणीव असणाऱ्या लोकांची "इतिहास परिषद" घ्यावी असे मला वाटते...!

जेष्ठ संशोधक मानसिंग कुमठेकर व प्रा. गौतम काटकर यांच्या कार्याला सलाम करून कुकटोळी गावात येत्या काही महिन्यात "इतिहास परिषद" होऊन स्थानिक लोकांना या "जागतिक वारसा केंद्राचे" संवर्धनासाठी कायमदत करता येईल यासाठी एकत्रित प्रयत्न होतील अशी आशा करूयात...!

तुमच्याही मनात काही कल्पना असतील काही करावे असे वाटत असेल यासाठी नक्की प्रसार करा...चर्चा करा...सहभागी व्हा...चला या नवीन शोधला जगासमोर आणायचे "साक्षिदार" बनूयात....!

शिवराम ठवरे 04-04-2016
मुक्त पत्रकार-9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र
Shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment