Monday 10 January 2022

बहुजनांच्या रयतला बदनाम करण्याचा नागपुरी डाव साध्य होणार नाही: शिवराम ठवरे

रयतच्या भाऊराव पाटील समूह विदयापिठाच्या निर्णयामुळे शाब्दिक मळमळ सुरू

सातारा जिल्ह्यातील कराड येथील काले गावात सत्यशोधक समाजाची विभागीय परिषद 25 सप्टेंबर 1919 रोजी आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत एक क्रांतिकारक घटना घडली. परिषदेत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करण्याचा क्रांतिकारी ठराव मांडला. हा ठराव उपस्थित सत्यशोधकांनी एकमताने मंजूर केला..!

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. जमीनदार, शेटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते..!

परिवर्तनाचा विचार सोडून प्रतिगामी आणि कट्टरतावादी विचारांच्या मार्गाने रयत गेली नाही पाहिजे यासाठी कर्मवीर आण्णांनी आयुष्यभर कटाक्ष ठेवला. नागपुरी संघाच्या विचारांच्या माणसांना रयतच्या सावलीला देखील येता येणार नाही हे वास्तव आहे..!

रयतच्या मॅनेजमेंट मध्ये येऊन इथलं बहुजनांच्या हक्काचं शिक्षण बंद करण्याचा नागपुरी कावा कदापी साध्य होणार नाही हे लक्षात आल्यामुळं अनेकांची आजवर तडफड होत होतीच त्यात आता एकाची भर पडली आहे इतकंच..!

नुकतीच सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे समूह विद्यापीठ स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत यशवंतराव चव्हाण विज्ञान संस्था, सातारा (स्वायत्त) हे मुख्य महाविद्यालय व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा (स्वायत्त) आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा (स्वायत्त) ही दोन सहभागी  महाविद्यालये या तीन अनुदानित महाविद्यालयांचा समावेश असलेले कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा हे समूह विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली..!

जगभरात चाललेली रयतची घोडदौड रोखण्यासाठी संस्थेची बदनामी कोणताही रयतप्रेमी सहन करू शकणार नाही. बहुजनांच्या रयतेला इथल्या बहुजनांनी नुसतं टिकवलंच नाही तर समृद्ध केलं आहे. शिक्षणप्रसार व समाजप्रबोधन यांसाठी कर्मवीरांनी हयात वेचली..!

सर्वांना शिक्षणाची समान संधी लाभली पाहिजे या ध्येयाने प्रेरित होऊन जात, गोत, धर्म पंथ इत्यादी सामाजिक भेद नष्ट करून समता, बंधुता व मानवता यांकडे स्वावलंबानाने संस्थेची वाटचाल सुरु आहे कुणी कितीही प्रयत्न केला तरी बहुजनांच्या रयतला बदनाम करण्याचा नागपुरी डाव साध्य होणार नाही..!

शिवराम ठवरे-9175273528

No comments:

Post a Comment