Monday 10 January 2022

प्रत्येक शाळेत समुपदेशक असणं काळाची गरज :- प्रा. समता जीवन

प्रत्येक शाळेत समुपदेशक असणं काळाची गरज :- प्रा. समता जीवन

दि हिंद एज्युकेशन सोसोयटी, मिरजचे आर. एम. हायस्कुलमध्ये गाव तिथे समुपदेशन केंद्र अभियानांतर्गत पहिल्या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

राज्यभरात किमान 100 केंद्र उभी करण्याचा समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ, महाराष्ट्रचा संकल्प

शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या गुणांच्या स्वरूपातल्या प्रगतीचं पुस्तक सगळीकडे पाहिलं जातं पण मुलांची भावनिक बुद्धिमत्ता फार कमी प्रमाणात तपासली जाते. मुलांचं भावविश्व लक्षात घेऊन त्यांना योग्य वयात वळण देता आलं तर विद्यार्थ्यांच्या निर्णयक्षमतेचा विकास होऊन जीवनाला योग्य दिशा मिळेल यासाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातील प्रत्येक शाळेत समुपदेशक असणं काळाची गरज असल्याची भावना प्रा. समता जीवन यांनी व्यक्त केली..!

आज मिरज जिल्हा सांगली येथील दि हिंद एज्युकेशन सोसायटीच्या आर. एम. हायस्कुलमधील समुपदेशन केंद्राच्या उदघाटक म्हणून उपस्थित असताना समाज कार्यकर्ते , शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यानी शालेय जीवनात समुपदेशनाची गरज विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी मुद्देसूद मांडणी केली. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव होते तर प्रमुख पाहुणे संस्थेचे माजी उपाध्यक्ष प्रताप जाधव, भारती विद्यापीठाचे प्रा. के. व्यकटेश सर, समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ, महाराष्ट्रचे सचिव शिवराम ठवरे, सांगली जिल्हाध्यक्ष युवराज मगदूम, समुपदेशन केंद्र समन्वयक नाईकबा गिदे, शुभांगी कांबळे,संग्राम घोरपडे, जिल्हा उपाध्यक्ष आकाश पाटील आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते..!

प्रत्येक शाळेत समस्याग्रस्त, समुपदेशनाची गरज असलेले असंख्य विद्यार्थी आहेत. मुलांमध्ये छोट्या-मोठ्या स्वरूपाच्या, साध्या अथवा गंभीर अशा अनेक समस्या आढळून येतात. ती मुले समस्यांना तोंड देऊ शकत नाहीत, त्याचे परिणाम त्यांच्या वर्तनात दिसू लागतात त्यामुळे योग्य वेळीच विद्यार्थ्यांचा मानसीक अभ्यास करून समस्यांवर समाधान शोधणं आवश्यक आहे..!

माणसांच्या मनाचा अभ्यास पूर्वीपासून अनेक अभ्यासकांनी केला आहे याबाबत औपचारिक शिक्षण देणारे अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत मात्र प्रत्यक्ष शिक्षणाशी, वर्गातील अध्ययन आणि अध्यापनाची या अभ्यासाचा संबंध व्यवहारात फार कमी प्रमाणात जोडला गेल्याचे दिसून येते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात ताण तणाव, व्यसनाधीनता, हिंसक प्रवृत्ती याची वाढ होऊ लागली आहे. विद्यार्थ्यांना योग्य वयात भावनिक आधार देऊन त्यांना निर्णयक्षम बनवण्यासाठी समुपदेशन हाच मार्ग असल्याचेही त्यांनी सांगितले..!

समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ, महाराष्ट्रच्या माध्यमातून गाव तिथं समुपदेशन केंद्र अभियानाचे कौतुक करताना त्यांनी माझ्याकडून आणि आमच्या संस्थेकडून शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. आपापल्या कौटुंबिक, नोकरी आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडून समाजासाठी काम करणाऱ्या सगळ्याना शुभेच्छाही दिल्या. संस्थेने उत्तम कार्यक्रम आयोजित केला आणि समुपदेशन केंद्राची उभारणी करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मिलिंद जाधव सर यांचे आभार मानले..!

चौकट- आजच्या कार्यक्रमात बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने शिव फुले शाहू आंबेडकर समाजभूषण पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष मिलिंद जाधव सर यांना सन्मानपूर्वक देण्यात आला..!

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ, महाराष्ट्रच्या सांगलीचे अध्यक्ष युवराज मगदूम, संग्राम घोरपडे, जिल्हा उपाध्यक्ष आकाश पाटील, मिरज तालुका अध्यक्ष हौसेराव साठे, मिरज तालुका सल्लागार दत्तात्रय लोकरे, विटा तालुका अध्यक्ष मुनिवर सुलताने, शालेय समुपदेशनचे केंद्र समन्वयक नाईकबा गिदे, शुभांगी कांबळे, सुरेश सकटे, जिल्हा सल्लागार विनायक कुलकर्णी, सेवासदन हॉस्पिटलचे समन्वयक शिरीष वाघमारे, आर एम हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बेळगावे आदींनी परिश्रम घेतले..!

शिवराम ठवरे-9175273528
सचिव:-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ, महाराष्ट्र
युवराज मगदूम-9158546364
समन्वयक गाव तिथं समुपदेशन केंद्र अभियान, महाराष्ट्र
mswbswboard@gmail.com

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4540612569380173&id=100002944252050

No comments:

Post a Comment