Monday 10 January 2022

खेळातून संघभावना आणि खिलाडू वृत्ती वाढली पाहिजे :- कॉ. विजय मांडके

खेळातून संघभावना आणि खिलाडू वृत्ती वाढली पाहिजे :- कॉ. विजय मांडके

विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि खेळ यात समतोल राखला तर त्यांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होवू शकते. खेळातून संघभावना आणि खिलाडू वृत्ती वाढायला हवी असे आवाहन कॉ. विजय मांडके यांनी केले. आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी किन्हई ता. कोरेगाव येथे जनमित्र सामजिक विकास संस्था आणि शिवमल्हार क्रीडा प्रबोधनी, पेठ किन्हईच्या माध्यमातून आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि कौतुक सोहळ्यात मांडके सर बोलत होते..!

नुकत्याच भुईंज येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे व किक बॉक्सिंग स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी, प्रशिक्षक आणि सुंदर किल्ला स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आजच्या कार्यक्रमाला शिवथर येथील माजी सैनिक *राजूभैय्या ईनामदार, सामजिक कार्यकर्ते आणि व्याख्याते विशाल कांबळे, समतादूत राहुल गंगावणे, जनमित्र सामजिक विकास संस्थेचे अध्यक्ष गौरव साबळे, अभ्यासू वकील ॲड. शाहिद ईनामदार, संस्था सचिव शिवराम ठवरे, उपाध्यक्ष ॲड. मंदार ढवळे, कराटे प्रशिक्षक विनोद फाळके* आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते..!

उपस्थित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी हितगुज साधतांना मांडके सरांनी अभ्यासाबरोबरच शालेय जीवनापासून खेळावर लक्ष केंद्रित करायला हवे असा सल्ला दिला. क्रिडांगणावर खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये संघर्ष करण्याची जिद्द, पराभव आणि विजय पचविण्याची क्षमता, सदृढ शरीर आणि तात्काळ निर्णय घेण्याची तल्लख बुध्दी सहज निर्माण होते असे त्यांनी सांगितले..!

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत संस्थचे उपाध्यक्ष ॲड. मंदार ढवळे यांनी केले तर जनमित्र सामजिक विकास संस्थेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती संस्थेचे सचिव शिवराम ठवरे यांनी दिली. गुरुकुल करीअर अकॅडमीचे संस्थापक राजूभैय्या ईनामदार यांनी अकॅडमीच्या माध्यमातून चालवलेल्या प्रशिक्षणाची माहिती देऊन सैन्य, पोलीस भरती तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी शालेय जीवनातच सुरुवात केल्यास नक्की यश मिळेल असा आशावाद व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या..!

सामाजिक कार्यकर्ते, व्याख्याते विशाल कांबळे सरांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा नैपुण्याचे भरभरुन कौतूक केले व विद्यार्थ्यांना खेळभावना जोपासण्याचे आवाहन केले. सत्याच्या मार्गाने चालणाऱ्याला अपयश येत नाही असे सांगताना प्रबोधनपर गोष्टीही सांगितल्या..!

बॉक्सिंगच्या *विद्यार्थ्यांना मदत म्हणून सहा हजार रुपये किंमतीची दोन किट संस्थेच्या वतीने भेट देण्यात आली तसेच सुंदर किल्ला स्पर्धेच्या सहभागी विद्यार्थ्यांना पाच डझन वह्यांचे वाटप करण्यात आले* तसेच विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रच्या वतीने दत्तप्रसाद दाभोळकर लिखित "अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अग्रदूत नरेंद्र ... विवेकानंद" यांच्या पुस्तिकेच्या 50 प्रतिही भेट देण्यात आल्या..!

कार्यक्रम यशस्वीतेसाठी पेठ किन्हई ग्रामपंचायतीचे उपसरपंच शिवाजीराव सपकाळ, ग्रा. पंचायत सदस्य सुरेखाताई भिसे, सोसायटी चेअरमन शरद राजराम भोसले, सामजिक कार्यकर्ते अक्षय चव्हाण, प्रसाद ढवळे, मनोज ढवळे, प्रशिक्षक संजय भिसे, निळकंठ पवार आणि किन्हई ग्रामस्थ मंडळींनी विशेष परिश्रम घेतले..!

जनमित्र सामाजिक विकास संस्था, सातारा

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3074413006136444&id=1469089860002108

No comments:

Post a Comment