Friday 15 January 2016

शिवसंगम मधील "बुवादर्शक" शिवप्रतिमेमागचे वास्तव

"शिवसंगम" मधील "बुवादर्शक" शिवप्रतिमेमागचे  वास्तव

"हाफचड्डी"वाल्यांच्या पुण्यातील "शिवसंगम" नावाच्या शक्तीप्रदर्शनात शिवाजी महाराजांचा विकृत फोटो "भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" अशा पोज मधे तयार केलेला होता....!

तशा पोजमधील फोटो प्रत्यक्ष पहिल्यावर आणि सोशल मिडिया वरून चर्चा सुरु झाल्यावर चड्डीवाल्या समाजाची त्याला उत्तरे देताना बोबडी वळु लागली..?

तसल्या चित्राचे समर्थन तरी कसे करावे अशी चिंता त्याना पडली कारण "हिंदू" स्वाभिमान जपणारी एकमेव संघटना असे खोटे नाटे सांगून मोफत "चड्डी वाटप" करुन आणलेल्या स्वाभिमानी युवकाना महाराज या "बूळचट" वेशात पाहुन खुप चीड़ आली होती...!

"मुजरा फक्त शिवाजी महाराजाना" असा विचार करणारे महाराष्ट्रातील तरुण या प्रतिमेंने खुप दुखावले होते...पण केवळ "टाळकी" वाढ़ऊन आणायची जबाबदारी असलेल्या संयोजक मित्रांना संघाचे "अंतस्थ नियोजन" काय माहित...?

आता काहीतरी समर्थन करायाचे म्हणून संघीय विचारवंतानी "व्हाट्सअप पोस्ट' तयार केली आणि शिवाजी महाराजांचे मूळ चित्र टिका करणाऱ्याच्या बापाने तयार केले आहे काय..?शिवाजी महाराजांचे चित्र देखील कसे असावे हे हिंदूना ठरवायचा अधिकार नाही काय...? "धर्मद्रोही" लोकाना आपला दिमाखदार कार्यक्रम पहावला नाही यातून अशी टिका चालू आहे आपण दुर्लक्ष करा असे यातून काही-बाही लंगड़े समर्थन केले होते...?

पण स्वतः विचार करत असणाऱ्या आजच्या तरुण पिढीला हे समर्थन काही पटले नाही...माझे काही मित्र जे स्वतः शिवसंगमला गेले होते त्यानीच या फोटोमुळे "शिवाजी महाराजांचा वापर सोईनुसार कसा केला जातो" त्याचे उदाहरण डोळयासमोर पहायला मिळाले असे मत व्यक्त केले...!

एकजण तर म्हणाला "बामाण ग्वाड बोलून सूड उगवायाला तयार झाल्यात महाराजाना बाबा बनावल राव" हि प्रतिक्रिया खुप बोलकी  आहे...!माझे मते यातच शिवसंगम चे यश-अपयश तोलता येते...!

या अशा चर्चा होत असताना आमचा प्राध्यापक मित्र युवराज जाधव 'गोविंद पानसरे" लिखित शिवाजी कोण होता...? या पुस्तकातील शिवाजीचे देवतीकरण केले कि काय होते याचा संदर्भ असलेले लिखाण कर असे सतत सांगत होता...त्याने 2 वेळा रिमांडर देखील दिला अगदी पुस्तकाचे पान क्रमांक 53 एकदा परत वाच असे फोन करुन सांगितले...!

काल रविवारी पुस्तक हातात घेतले आणि सरळ पान 53 उघडले...मला स्वतः त्या रचनेत काही बदल करुन शिवसंगम मधील फोटोबाबत तुलना करत स्वतंत्र लेख लिहावा असे वाटले नाही...!

कारण स्वतःजवळ मासा,कासव डुक्कर,बटु आणि "स्वतःचे आईचे मुण्डके छाटनारा परशुराम" ...."गर्भवती बायकोला सोडून देणारा राम" यासारखे विकृत नायक असणाऱ्या सनातनी प्रवृत्तिने आजपर्यंत.....शंकर,मारुती,कृष्ण-बलराम ते बुद्धापासून खंडोबा म्हसोबा आदीना देवत्व बहाल करत मुर्तित बंद केले हा इतिहास आहे...आणि आजही शिवाजीचे रूपाने त्यांचे प्रयत्न चालू आहेत...!

पहा काय मांडणी आहे.....शिवाजीचा देव केला म्हणजे काय होते...?देव केला की मग शिवाजीसारखे वागण्याची आपल्यावर जबाबदारी राहत नाही 'शिवाजी सारखे वागा" , "रयतेला सतावू नका" , "बलात्कार करनाराना पाठीशी घालू नका" , "रयतेच्या भाजीच्या देठाला हात लाऊ नका"... .!

"स्वतःच्या धर्मावर श्रद्धा ठेवा पण परधर्माचा द्वेष करायला शिकवू नका"...असे सांगितले तर उत्तर येते...तो शिवाजी कुठे आपण कुठे...? तो देवाचा अवतार आणि आपण माणूस....आपल्याला कस जमणार...? आपण आपल असच वागायचं..."

देव असल्यामुळे वर्षातून एकदा शिवाजी महाराज कि जय म्हणायचे,जयंती साजरी करायची,वर्गणी गोळा करायची,थोडी खर्चायची थोड़ी खायची...!कपळाला "अष्टगंध" लावायाचा गुलाल उधळायचा की काम झाले...."शिवभक्त" म्हणून मिरवायला आपण मोकळे झालो...!

शिवाजीसारखे वागायची जबाबदारी आपली नाही....शिवाजी महाराजांनी रयतेला मदत केली....आता त्याच्या भोंदू भक्तानी रयतेला मदत केली का...? आता त्याच्या भोंदू भक्तानी रयतेला भीती घालायला त्याचाच उपयोग करायचा...!

दारूच्या अड्डयावर,मटक्याच्या गाडीवर बेकायदा वाहतूक करणाऱ्या मोटारीवर "शिवाजीचा झेंडा" आणि शिवाजीचा फोटो लावायचा अन काळे धंदे चालवायचे...!

हा शिवाजीचा गैरवापर आहे...शिवाजी नीट समजून घेऊन हे थांबवले पाहिजे...."भोंदू कोण भक्त कोण" हे ओळखायला शिवाजी समजून घ्यावा...!

अतिशय स्पष्ट आणि सरळ मांडणी आहे मला वाटते यापेक्षा वेगळे लिहणे गरजेचे नाही....स्वतः विचार करणाऱ्या माझ्या मित्र-मैत्रीनीनो "सनातनी कावा" ओळखून शिवाजी महाराजांचा इतिहास लक्षात घ्या...!

नाहीतर "शिव शिव गणात बोते"..असे काहीतरी शब्द आणि तलवारीच्या जागी चिलिम देऊन हे सनातनी चड्डीवाले महाराजांना निर्वस्त्र करतील हे लक्षात घ्यावे..आणि तुम्ही चड्डी घालून "शिवआरती" म्हणत संघीय लोकांमागे "बोते बोते" म्हणत बसाल...!

शिवराम ठवरे 11-01-2016
मुक्त पत्रकार 9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र
shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment