Friday 15 January 2016

धनगर ST आरक्षण आणि आदिवासी समाज

धनगर ST आरक्षण आणि आदिवासी समाज

सर्वच राजकीय पक्ष "धनगर ST आरक्षण" या बिन महत्वाचे प्रश्नाचे भांडवल करीत आहेत (मधेच ज्याप्रमाणे मातंग समाजाला स्वतंत्र SC आरक्षण पाहिजे अशी मागणी होत होती ) वास्तवात धनगर समाजाला "राज्यात NT आणि देशात OBC आरक्षण" आहे त्याचे सर्व लाभ मिळत आहेत...आणि धनगर समाज ते घेत आहे....स्थानिक स्वराज्य संस्था मधील OBC आरक्षण घेऊन राजकीय लाभ देखील घेत आहे....!

त्यामुळे धनगर आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करीत नसून त्याना NT/OBC आरक्षण सोडून "ST आरक्षण" पाहिजे आहे...?

खरे तर वास्तवात फक्त डोंगरदरयात राहणारा "गवळी धनगर" समाज ST चे निकष पूर्ण करु शकतो ज्याची लोकसंख्या "30 हजार" चे आसपास असेल पण त्याचे आडून सर्वच धनगर ST चे राजकीय लाभ (फक्त आमदारकी आणि खासदारकी) मिळावेत यासाठी दिशाभूल करीत आहेत...!

ज्यावेळी प्रथम सर्वे झाला तेव्हा सैम्पल सर्वे म्हणून बहुतेक गवळी समाजातील डाटा गोळा केला त्यामुळे घोळ झाला ज्याप्रमाणे मराठा आरक्षणसाठी कुणबी लोकांचे सर्वे झाले आताही ते असेच करण्याची शक्यता आहे त्यामुळेच कुणबी OBC झाले आहेत पण मराठा आरक्षण कोर्टात टिकत नाही आणि पुन्हा दिले तरी टिकणार नाही....!

धनगड आणि धनगर हा घटनेत काहीच घोळ नाही घटनेत "धांगड" अशी आदिम जमात आहे त्याचे इंग्रजी Dhangad असेच होते काही "अतीशहाणे धनगर विचारवंत" त्याला D नाही R आहे बोलू लागले आणि अजून जास्त गोंधळ झाला....!

मुळात सध्या धनगर समाज देखील गोंधळात आहे कि नवीन सर्वे करुन धनगर ST मधे जावेत कि D चा R करुन जावे......दोनीही शकय नाही हे वास्तव कोणताच राजकीय पक्ष स्पष्टपणे सांगत नाही आणि सांगणार नाही....!

याच बरोबर "आदिवासी समाजातील नेते" देखील तुमचे आता आरक्षण धनगर समाज नेणार अशी "खोटी हुल" देत आहे आणि आदिवासी देखील मूळ मुद्दा लक्षात न घेता धनगर समाजाचे विरोधात आंदोलन करतात.त्यामुळे धनगर आणि आदिवासी "शत्रु" असल्या सारखे वागत आहेत...आणि नुकताच शिक्षण घेऊन जागा होत असलेला बहुजन समाज विभक्त होत चालला आहे...!

"धनगर ST आरक्षण" या मुद्यावर "आदिवासी आणि धनगर" दोन्ही घटक "पाहिजे तसे नाचवता" येतात याची जाणीव सर्वच राजकीय पक्षाना झली आहे म्हणून तो प्रश्न कायम असाच राहणार आहे...त्यामुळे वास्तव काय आहे हे कोणीच सांगत नाही...!

यासाठी दोन्ही समाजातील बेरोजगार अल्पशिक्षित तरुण त्याना भांडवल म्हणून फुकट मिळत आहे....!

त्यामुळे सध्या दोन्ही समाजाला आरक्षणामुळे मिळत असणारे "मोफत शिक्षण,शिष्यवृत्ती,वसतिगृह,स्वयंरोजगार अनुदान गृहबांधणी अनुदान इत्यादी असंख्य लाभ योग्य प्रकार मिळत नाहीत....शासकीय नोकरीत अनुशेष अजून भरला जात नाही....शासकीय "नोकरया प्रोजेक्ट वर्क आणि विविध संस्था" तयार करुन "कंत्राटी" केल्या जात आहेत...यासारखे मूळ प्रश्न बाजूला राहत आहेत आणि केवळ आपण टक्कर मोर्चे काढून एकमेकांची डोकी फोडून घेत आहोत...!

समाजातील जागृत घटकाने याबाबत जागृती करुन "आदिवासी आणि धनगर" या दोन्ही समाजातील लोकाना वास्तव सांगणे हिच आता खरी गरज आहे....!

शिवराम ठवरे 11-12-2015
मुक्त पत्रकार-9175273528
shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment