Friday 15 January 2016

कल्लूळाचे पाणी

मुळगाणे

कल्लूळाचे पाणी कशाला ढवळले..?
नागाच्या पिल्याला का ग खवळले...?||धृ||

साखराबाई आराधीने प्रश्न विचरला मला....
आणि त्या प्रश्नाचे उत्तर सांगतो मी आराधीला....
"आत्मलिंग" म्हणतात त्या हो लिंगाला
आत्मलिंग म्हणतात त्या हो लिंगाला||1||

कल्लूळा चे पाणी कशाला ढवळले..?
नागाच्या पिल्याला का ग खवळले...?

आणि साखराबाईच्या प्रश्नाचे उत्तर दिले साखराबाईला....
आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल साखराबाईला.....
अहो माणसाला वाटणी घातली देवानं आपली आपल्याला.....
आणि "आत्म्याची जात" कोणती हे सांगून द्यावे लागेल या प्रजेला...||2||

कल्लूळा चे पाणी कशाला ढवळले..?
नागाच्या पिल्याला का ग खवळले...?

आणि साखराबाई बोलली मला.....
माळ कशाला घातली गळयला ....
असा विचार केला नव्हता कधी....?
आई बापानं "आराधी" सोडल मला बाळपणाला.....||3||

कल्लूळा चे पाणी कशाला ढवळले..?
नागाच्या पिल्याला का ग खवळले...?

अग प्रश्न पडला माझ्या आई वडलाच्या जिवाला....
अग चैती पोर्णिमा तर आली वर्षाची वर्षाला.....
आन तू शाहन्या मनाची म्हणून पाठवल मला तुझ्या संगतीला....||4||

कल्लूळा चे पाणी कशाला ढवळले..?
नागाच्या पिल्याला का ग खवळले...?

माझी निंदा करतो येणार जाणारा .....
अग हेला काही नाही आकलिचा इचार....
आग मी तर आराधी भोळया मनाचा....
आणि गळयामधी माझ्या "जरसाज" कवडयाचा.....||5||

कल्लूळा चे पाणी कशाला ढवळले..?
नागाच्या पिल्याला का ग खवळले...?

परीक्षण

🌿🌿कल्लूळा चे पाणी🌿🌿🌺

कल्लूळा चे पाणी कशाला ढवळले..?
नागाच्या पिल्याला का ग खवळले...?

#कल्लूळाचंपाणी हे गाणे सगळीकडे आवड़ीणे वाजवले जात आहे.....! पण हे गाणे म्हणणारे "आराधी" आणि गाण्यात उल्लेख असलेले #कल्लोळतीर्थ कुठे आहे.....?

बहुजन समाजातील आदर्श #तुळजापूर संस्थानची राणी अंबाबाई अर्थात #तुळजभावानी मंदिरातील #कल्लोळ तीर्थ......!

तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वारातून थोड़े खाली आल्यानंतर मंदिरात जाताना पायरया उतरत असताना उजव्या बाजूला दगडी बांधकाम असलेले #कल्लोळतीर्थ आहे....!

या कल्लोळात अंघोळ केल्याने आपल्या माणसाला असणाऱ्या त्वचारोगाच्या व्याधी दूर होतात असे समजले जाते....!

सध्या त्वचारोग बरे होतात कि नाही हा भाग चर्चेचा होईल पण कधीतरी इतिहासात या पाण्यात औषधी गुणधर्म असल्याचे नाकारुन चालणार नाही.......!

सदर मंदिर "चुनखड़ीयुक्त" लहान डोंगरावर असून "नैसर्गिक झरे" असल्यामुळे येथे औषधी गुणधर्म चुनखड़ी मिश्रित पाणी लावल्यामुळे त्वचरोग नाहीसे झाले असतील.......!

कालांतराने या ठिकाणी मंदिर झाले त्यामुळे या नैसर्गिक झरयाला देवीच्या चमत्काराचे स्वरूप प्राप्त झाले......!

झरयाचे बांधकाम पहिले असता बहुजन समाजातील #नागसंस्कृतीशी याची नाळ सहज जुळते कारण #कल्लोळतिर्थाचे मध्यभागी नाग मूर्ति ......!

आपल्या गावातील ग्रामदैवत किंवा मुख्य चौकचे ठिकाणी दगडी नागमूर्ती देखील आपले नाग संस्कृतीशी नाते जोडणारेच आहेत....!

महाराष्ट्रातील बऱ्याच बहुजन हिंदू कुटुंबात याच अंबाबाईला #कुळदेवता का मानली जाते याचाही आपण विचार केलाच पाहिजे....!

ब्राह्मणी संस्कृती पासून आपले सरक्षण व्हावे आणि आपली बहुजन हिंदू संस्कृती टिकून रहावी यासाठी लोककलावंताचा मोठा समाज घटक जनजागृती करीत होता....करीत आहे.......!

गोंधळी,वाघ्य,मुरळी,भोपे,आराधी, नंदिवाले,वासुदेव,पिंगळा याचप्रमाणे देवीची स्तुती सांगणारे "आराधी'...!

हे आराधी आपली बहुजन हिंदू महापुरुष,महा माता म्हणजेच कुळ पुरुष आणि कुळदेवता यांचा इतिहास जपावा यासाठी मौखिक स्वरुपात कला सादर करुन प्रयत्न करीत असत....!

लिखानकला अवगत नसल्यामुळे मोडतोड करीत आता ते काहीतरी चमत्कार  सांगत आहेत पण एकूणच त्यांचा सूर "कुळदेवीला विसरु नको" असाच असतो....!

आपल्या या महान बहुजन संस्कृतीचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहेच पण हे सारे संदर्भ गोळा करुन इतिहासाची पुन्हा मांडणी करावी लागेल....!

त्यामुळे गाण्याचा आनंद घेण्या सोबतच यात "आत्मलिंगाला ओळखा" आणि "आत्मलिंगाला कोणतीही जात,धर्म आणि पंथ असत नाही" हा  साखराबाईला उद्देशुन दिलेला समतेचा संदेश शांतपणे गाणे ऐकले तर तुमच्याही सहज लक्षात येईल....!

यातूनच आपली बहुजन हिंदू संस्कृती किति समृद्ध आहे आणि हा आराधी किती मौलिक विचार सांगून जातो ते समजेल....!

आपणही हे कधी तुळजापूरला गेला तर अवश्य लक्षात ठेवा,चर्चा करा सत्य समोर अणन्याचा प्रयत्न करुयात,काही चुकीचे किंवा  वेगळे वाटत असेल तर अवश्य संपर्क करा....!

शिवराम ठवरे 27-09-2015
मुक्त पत्रकार 9185273528
shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment