Friday 15 January 2016

मजुर अड्डा पुणे येथील स्वतंत्रता दिवस

अनोखा स्वातंत्र दिवस समारोह

महात्मा फुले प्रतिष्ठान सलग्न अंगमेहनती कष्टकरी संगर्ष समिती,पुणे, हमाल पंचायत पुणे यांचे मार्फत सालबाद प्रमाणे स्वातंत्र दिवस साजरा......!

15 ऑगस्ट 1947 ला ऐतिहासिक लाल किल्ला येथे 14 ऑगस्ट च्या मध्यरात्री जवाहरलाल नेहरू यांचे हस्ते ध्वजारोहन करुन भारताचा पहिला स्वातंत्र दिवस साजरा झाला.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढ़ाव यांचे संकल्पनेतुन गेली अनेक वर्षे पुण्यातील महात्मा फुले प्रतिष्ठान आणि तिच्या सर्व 15 सलग्न संघटना मिळून पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी मजुर अड्डा येथे रात्री 12 वाजता मोठ्या आनंदात साजरा केला जातो.

आज भाराताचा 69 वा स्वातंत्र दिवसही रिक्षा पंचायतचे सरचिटणीस नितीन पवार यांचे अध्यक्षते खाली साजरा झाला.

बाबा सध्या अमेरिकेत आहेत पण कार्यक्रमाची सुरुवातच त्यांच्या बोलन्याने झाली फोनवरुन सर्वाना शुभेच्छा देतानाच बाबानी कष्टकरी चळवळ पुढे नेऊन राष्ट्रीय पेन्शन कायदा मंजूर करुन अमलबजावणी करण्याचा संघर्ष पुढे चालू ठेवायचा निर्धार केला.

पुण्यातील सर्व प्रमुख बैण्ड वादक चालक मालकानी यावेळी देशभक्तीपर गीते सादर करुन कार्यक्रम रंगतदार बनवला.

शेवटी नितीन पवार यानी सर्वांचे आभार मानून आपल्या भारतीय संविधानाचे महत्व स्पष्ट केले

शिवराम ठवरे
मुक्त पत्रकार-15-08-2015
shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment