Friday 15 January 2016

सांगड कार्यकर्ता महासंमेलन अहमदनगर

सांगड कार्यकर्ता सांगता महासंमेलन
१६,१७ व १८ ऑगस्ट २०१५

दूसरा दिवस-१७ ऑगस्ट २०१५

सकाळी नाष्टा करुन संमेलनस्थळी असणारे पुस्तकाचे स्टॉल पाहत,सम्यक विद्रोहीच्या स्टॉलवरून "राजा शिरगुप्पे प्रॉमिथीअसची कविता" हे पुस्तक खरेदी केले.नवीन काही कार्यकर्ते यांचेशी चर्चा करीत  कॉन्फरन्स हॉल मधे पहिल्या सत्राला उपस्थित आलो.

 पहिले सत्र-मानवी हक्क

🌿🍂🍂गिरीष कुलकर्णी🍂🍂🌿

👉पहिल्या सत्राची सुरुवात स्नेहालयचे संस्थापक "गिरीष कुलकर्णी" यांचे सेशनने सुरु झाली.
👉महिला आणि बालकांचे हक्क आणि त्यांचे विषयीचे कायदे यांची सारांश स्वरुपात माहिती दिली.
👉बाल संरक्षण मंडळ आणि बाल सरक्षण समितीचे स्वरूप काम आणि अमलबजावाणी कशी होत नाही आणि सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थाना कसा त्रास दिला जातो हेही सोदाहरण स्पष्ट केले.
👉सामजिक संस्थामधील कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा मिळावा अशीही मागणी त्यानी केली.

🌿🍂🍂असीम सरोदे🍂🍂🌿

👉मानवी हक्क याबाबत स्वतः गेली अनेक वर्षे प्रत्यक्ष काम करणारे असीम सरोदे यांच्या बोलण्याची सगळ्या श्रोत्याना प्रतीक्षा होती.
👉दुसऱ्या  महायुद्धात झालेल्या भीषण संहाराची प्रतिक्रिया म्हणून जागतिक पातळीवर Universal Declaration of Human Rights चा मसूदा निर्मिती.
👉मानवी हक्क नाकरन्याची पहिली पायरी म्हणजे शोषण जोपर्यत हे शोषनाचे मार्ग संपत नाहीत तोपर्यंत मानवी हक्क मिळणे सहज नाही.
👉प्रचलित पोलिस कायदे न्याय प्रक्रिया आणि तपास पद्धति बदलने गरजेचे आहे असे प्रभावीपणे मांडुन त्यानी आपल्या मांडणीचा शेवट केला.
👉सेशन नंतर झालेल्या प्रश्न-उत्तर यावर चर्चा होउन पहिले सत्र संपले.

    🌺सत्र दूसरे-राजकारण🌺

पहिल्या सत्रातील चर्चेनंतर चहाचा ब्रेक होउन नवीन पण गंभीर आणि सर्वांच्या आवडीचा चर्चेचा विषय सुरु झाला.

  🌿🍂🍂सुभाष वारे🍂🍂🌿

👉आम आदमी पार्टीचे नेते पुरोगामी  आणि परिवर्तनाची चळवळ करणारे सुभाष वारे यानी राजकारण या विषयाची चर्चा सुरु झाली.
👉राजकीय अनास्था आणि राजकारणाची केलेली बदनामी याकडे डोळे उघडे ठेऊन पहिले पाहिजे.
👉निवडणूक जिंकण्याची तयारी करणे साठी छोट्या-छोट्या सामाजिक समस्या जाणून घेऊन समाजात काम करणे गरजेचे आहे.
👉सामान्य माणसाची स्वप्ने वास्तवात आणणे काम म्हणजे राजकारण अशी मांडणी करुन सरानी आपले सेशन संपवले.

🌿🍂🍂के.डी.शिंदे🍂🍂🌿

👉विद्रोही सांस्कृतिक चळवळ,अंनिस आणि जनता दल या संघटना आणि पक्षातुन समाजकार्य करणारे के.डी.शिंदे यानी त्यांच्या ग्रामीण बोलीत आपले सेशन सुरु केले.
👉राजकीय निरक्षरता आणि चळवळ म्हणून काम करणाऱ्या लोकांची राजकीय उदासीनता यामुळे आज चांगले लोक निवडून येऊ शकत नाहीत हे वास्तव आहे.
👉भाजपा आणि कॉंग्रेस दोनीही प्रमुख राजकीय पक्षानी आपले हीत साधुन परस्पर भूमिका घेतल्या आहेत.
👉पर्याय उभे करु न शकल्यामुळे आज समाजात ड़ावे आणि समाजवादी पक्ष उभे राहू शकले नाहीत.
👉स्थानिक मुद्दे घेऊन आपण सातत्याने काम केल्याशिवाय पर्याय नाही असे सांगून सरानी शेवट केला.

🌿🍂🍂कॉ.धनाजी गुरव🍂🍂🌿

विद्रोही सांस्कृतिक चळवळ,श्रमिक मुक्ती दल,हिंदी है हम-हिन्दोस्ताँ हमारा,महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त परिषद या आणि यासारख्या अनेक सामाजिक संघटना मधे काम करणारे धनाजी गुरव यांचे सेशन सुरु झाले.
👉राजकारणात स्वछ कार्यकर्ते असावेत,राजकीय पक्ष पारदर्शक असावेत आणि काही सुधारणा निवडणूक कायद्यामधे झाल्या पाहिजेत हे बरोबर आहे पण...
👉भारतीय राजकारणावर असणारा धर्माचा प्रभाव आणि समाजातील सांस्कृतिक बदलाशिवाय राजकारणाचे स्वरूप बदलणार नाही.
👉सातत्याने होणाऱ्या फसवणूकी मुळे भारतीय समाज राजकारण करण्यास नकार देताना दिसतो.
👉सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या सर्वच समाजघटकानी पर्यायी व्यवस्था देऊ शकलो तर आपण सत्ताधारी होऊ शकतो असा विश्वास त्यानी शेवटी व्यक्त केला.

🌿🍂🍂विश्वभर चौधरी🍂🍂🌿
👉अण्णा हजारे यांचा पदद्यामागील आवाज असणारे,राजकीय विश्लेषक विश्वभर चौधरी यानी शेवटचे सेशन सुरु केले.
👉राजकीय बदल कायदे बनवून आणि त्यांची अमलबजावणी करुनच होऊ शकतो.
स्थानिक स्वराज्य संस्थामधे बदल सुरु करुन जनतेने आपली ताकद दाखऊन द्यावि असे सांगून या सत्राचा शेवट झाला.

🌺🌺सत्र तीसरे-धर्मनीरपेक्षता🌺🌺

🌿🍂🍂अमर हबीब🍂🍂🌿

👉धर्मनिरपेक्षता या सदरासाठी ४ पैकी ३ मुस्लिम वक्ते बोलावाणे चूक असल्याचे सांगत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यानी या सदरास सुरुवात केली.
👉भयमुक्त समाज निर्मिती करून जातीय आणि धार्मिक समस्या सोडवता येतील असे त्यानी सारांशत सांगितले

🌿🍂🍂मिलिंद डोळस🍂🍂🌿

👉सामजिक कार्यकर्ते मिलिंद डोळस यानी फाळनीची कारणे आणि त्यामागची भूमिका आणि संविधान निर्मिती आणि त्यानंतरचा भारत यावर प्रकाश टाकला.

🌿🍂🍂अन्वर राजन🍂🍂🌿

👉सर्व सामान्य माणसाला धर्म आणि जातीपलीकडे जीवन हवे आहे.
👉सांस्कृतिक परिवर्तन ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे.

🌿🍂🍂शफात खान🍂🍂🌿

👉वास्तवात नाटक या क्षेत्रात काम
करणारा शाफत खान यानी नाट्यमय मांडणीतून धर्माचा वापर एकता मोडून काढण्यासाठी केला जातो असा सारांश केला.

🌺🌺सत्र तीसरे- अंशु गुप्ता🌺🌺
  👉प्रसिद्ध सामजिक कार्यकर्ते अंशु गुप्ता यांचे विचार ऐकायला तरुण उत्सुक होते.
👉भारतीय समाजातील गरीबी आणि विषमता नष्ट होत नाही तोवर आपला देश महासत्ता होणार नाही.
👉अंशु गुप्ता यानी केलेले कार्य नक्कीच आदर्श आहे त्यानी देशात चांगल्या सुरु असणाऱ्या NGO आणि समाजकार्य करणाऱ्या लोकाना समाजाचा पाठिंबा मिळतो असे सांगितले.

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

👉जेवणानंतर जमलेल्या कार्यकर्तेंचे सांस्कृतिक कार्यक्रम होऊन आजचा दिवसाचे सत्र संपले यामधे अनेकानी आपल्या सामजिक विषयाला आपल्या मांडणीतून वाट मोकळी करुन दिली.

👉याच दरम्यान असीम सरोदे आणि उल्का महाजन यानी सांगडची पुढील दिशा काय असावी या उद्याच्या सत्राशी संबंधीत सूचना केल्या.

शिवराम ठवरे.
मुक्त पत्रकार-17-08-2015
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र. shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment