Sunday 17 January 2016

प्रति शिवाजी राजे उमाजी

"श्रमिक जागृती व्याख्यानमाला शिवथर"

व्याख्यान पहिले-"प्रती शिवाजी राजे उमाजी"

आपणा सर्वांचे सहकार्याने वैचारिक जागृतीची सुरुवात म्हणून शिवथर ता.सातारा येथे आपण "श्रमिक जागृती" या नावाने जानेवारी 2016 पासून मासिक व्याख्यानमाला सुरु करणेचा संकल्प केला होता...!

पंचशील मित्र मंडळ,राजे उमाजी नाईक मित्र मंडळ शिवथर यांचे सहकार्याने जनमित्र सामाजिक विकास संस्था सातारा आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र शाखा-सातारा आयोजित "श्रमिकजागृती" व्याख्यानमालेस शिवथर येथे उत्साहात सुरुवात झाली...!

कार्यक्रमाचे सुरवातीला विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विजय मांडके यानी व्याख्यानमालेचे आयोजन करत असल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले...!

वसंतराव चव्हाण यांची ओळख करुन देत त्यांचे कार्याचा त्यानी अल्पपरिचय करुन दिला...!

वसंतराव चव्हाण यानी आपल्या भाषणात राजे उमाजी आणि बहुजन स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांचे जीवनातील समान दाखले देत परस्थिती जर अनुकूल असती तर उमाजीने देशाचे चित्र बदलले असते असे स्पष्ट करीत इंग्रज सत्ते विरोधात प्रथम बंड पुकारनारा उमाजी हा "पहिला भारतीय बंडखोर राजा" आहे असे सांगितले...!

वसंतराव चव्हाण यानी उमाजीचे जीवनातील अनेक प्रसंग सांगत आपला "भटाळलेला इतिहास" बदलावा लागेल आणि बहुजन समाजातील शिक्षित पिढीने आता घोकमपट्टी सोडून समाजाला पुढे घेऊन जाणारा विचार स्वीकारत प्रगती साधली पाहिजे असे सांगितले...!

कष्टकरी समाजातील मुले शिक्षण घेताना अनेक कारणे सांगत असतात मात्र तुरुंगात असताना "इंग्रजी शिकणारा उमाजी" समजून घेणे ही काळाची गरज आहे असे सांगत शिक्षण हेच 'बहुजनांचे मुक्तिद्वार" आहे बोलले श्रमिक कष्टकरी माणसाला शिक्षणा शिवाय पर्याय नाही...!

स्वातंत्र मिळून 67 वर्षे झाली तरी आजही कष्ट करणारा समाज मागासच राहिला असून सरकार नावाची गोष्ट देशात केवळ कागदावर राहिली आहे असे बोलताना "संविधानातील तरतुदी" माहित करुन त्याचा लाभ घेतला पाहिजे...!

सरकार आपल्या घरी येणार नसून आपणच संघटित होऊन आपले प्रश्न सोडवले पाहिजेत याकरीता वेळप्रसंगी आपण "संघर्षशील" भूमिका घ्यावी असे आवाहन केले...!

श्रमिक जागृतीची सुरुवात अखंड सुरु राहावी हिच प्रमाणिक इच्छा कार्यक्रमाचे शेवटी व्यक्त करीत त्याकरीता शकय ती मदत करेन असे आश्वासन दिले...!

कार्यक्रमास बेलमाची,दुधनवाडी तसेच मर्ढ़े येथील  जिजाबा जाधव,अजित जाधव बाळासाहेब जाधव,सूर्यकांत नलगे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते....!

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवथर ग्रामपंचायत सदस्य महेंद्र बोर्डे होते,सूत्रसंचालन सामजिक कार्यकर्ते नितिराज साबळे यानी तर आभार शिवराम ठवरे यानी माणले...!

कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून जिल्हा परिषद सदस्य किरण साबळे-पाटील,उपसरपंच प्रकाश साबळे,नितिराज साबळे,जगन्नाथ बोर्डे,मनोज गुजले,संतोष कांबळे,विजय कांबळे,राजेश पवार(गुरव),तुषार चव्हाण,गणेश भंडलकर,राहुल बोर्डे, तसेच पंचशिल आणि उमाजी नाईक मंडळाचे कार्यकर्ते यानी खुप सहकार्य केले...!

शिवराम ठवरे 16-01-2016
मुक्त पत्रकार 9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र
shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment