Friday 15 January 2016

अग्नीसंस्कारा शिवाय झालेला विवाह अवैदिकच

अग्निसंस्कारा शिवाय झालेला विवाह अवैदिकच......!

कालच झालेल्या माझा मित्र सूर्यकांतच्या झालेल्या लग्नाचे बारकाइने निरीक्षण केल्यानंतर अशा प्रकारे होणारा विवाह हा संस्कार वैदिक नसुन आपली महान "बहुजन (बळी) परंपरा जपणारा एक संस्कृती उत्सव (cultural event)" असल्याचे स्पष्ट दिसुन येते…………..! त्याचबरोबर ही संस्कृती परत यावी म्हणून वेद प्रामाण्य नाकारून, ब्राह्मण पुरोहीत सामाजाचे शिवाय बहुजन समाजातील मुलांची लग्न व्हावी यासाठी सत्यशोधक समाजाचे माध्यमातून युगप्रवर्तक प्रबोधन आणि कृती कार्यक्रम करणाऱ्या आपले आदर्श महात्मा फुले यांचे सत्यशोधक विवाहचाच हा भेसळ झालेला अविष्कार आहे असे माझे ठाम मत आहे......! त्यामुळे आता होणारी बहुसंख्य लग्न अग्निसंस्कार हा विधीच न करता होत आहेत हे महाराष्ट्रात काही वर्षापुर्वी जोर असणाऱ्या सत्यशोधक चळवळीचे यश असून हे सुप्त सांस्कृतिक परिवर्तनच आहे......!

माझ्या या मताला आधार म्हणून खालील विवेचन देणे गरजेचे आहे आपणास हे वाचताना कोणत्याही वेळी,कोणत्याही प्रकारची शंका आल्यास आपण यात बदल करण्यास कधीही प्रयत्न करुयात.

वैदिक हिंदू धर्मातील विवाहसंस्कार......!

"वैदिक हिंदू धर्मात" विवाहाचे वेळी "अग्निसंस्कार प्रमाण" मानून वेदोक्त किंवा पुराणोक्त मंत्र म्हणत पुरोहिताचे उपस्थितीत अग्निकुंड अर्थात होमाचे बाजूने सप्तपदी चालणे असा लग्न संस्कार सांगितला आहे......!  आपणाकडे पूर्वी ही पद्धती नव्हती पण T.V. मालिकांचा प्रभाव आणि पुरोहितांचे पोट भरण्याचे साधन म्हणून अलीकडे काही ठिकाणी हा आढळतो……….! त्याच बरोबर यासाठी ब्राह्मण पुरोहित असणे धर्माने बंधन कारक केले आहे.........! ब्राम्हण पुरोहिताशिवाय केलेला विवाह धर्माने मान्य नाही याच्या संदर्भात इग्रज लोकांकड़े पुरंदरच्या कोर्टात सत्यशोधक समाजाचे विरोधात केलेला खटला प्रसिद्ध आहे.......! यावरून विवाह आणि ब्राह्मण याचा संबंध सहज लक्षात येईल.
ब्राम्हणास त्याने लग्न केल्या बद्दल दक्षिणा देणेही बंधन कारक आहे त्यामुळे कदाचित यांच्या घशात  जाणाऱ्या दक्षिणे करीताच मुलीच्या पालकाकडून हुंडा घेण्याची अनिष्ट प्रथा तर सुरु झाली नसेल ना.....? याचेही संशोधन होणे गरजेचे आहे.....!

बहुजन हिंदु धर्म विवाह परंपरा………..!

याच्या तुलनेत ग्रामीण भागात होणाऱ्या आपल्या बहुजन हिंदू समाजातील बहुतांश विवाहाचे स्वरूप पहिले असता वर आणि वधु यांचे एकमेकांची पसंती झाल्यानंतर सुपारी आणि साखरपान करून दोन्ही बाजूच्या 5-5 जेष्ठ मंडळीचे समोर विवाहाची निश्चिति केली जाते आणि विवाह नक्की करुन दोन्ही घरी तयारीला सुरुवात होते.

कुळ स्पष्ट करणारे देवक……………..!

याबाबत थोड़ा जरी विचार केला तरी आपली कृषीप्रधान नागरी संस्कृती आणि निसर्गपुजा याचे नाते सांगणारी "मूळ आदिम टोळी संस्कृती" स्पष्ट होईल आपले कुळ स्पष्ट करणारे चिन्ह (Totam) म्हणून एखादे विशेष झाडाची फांदी शुभ चिन्ह समजून दारात उभी केली जाते अलीकडे त्याला "मुहूर्तमेढ़" म्हटले जाते.....!

कुळदेव अथवा कुळ देवीचे टाक……………!

बळी राज्यातील महान परंपरा असणारे आणि ज्या नावांची विभागणी केली असता "बा अर्थात बाप किंवा  आई" अशी उकल होते ते कोणतेही देव आपल्या बळी संस्कृतीचेच वाहक आहेत उदारहण दयायचे झाल्यास जोतीबा,खंडोबा,बिरोबा,धुळोबा,नरसोबा,वाडोबा, इत्यादी पुरुषदर्शक तर मरगुबाई, बानुबाई,ताई बाई,अंबाबाई,सटवाई,काळूबाई,जानाई,मळाई,जोगुबई इत्यादी यासारखीच नाम सदृश्य असणारे टाक(देवाचे मुखवटे) बनवले जातात....माझा प्रश्न सरळ असून हिंदु म्हणून मोठ्या गजावाजा झालेल्या होत असलेल्या राम-कृष्ण-विष्णू-ब्रम्हा किंवा देवांचा राजा म्हणत असलेल्या इंद्राचे अथवा सरस्वती या देवांचे नावाचे मुखवटे अर्थात टाक तयार केल्याचे पहिले नाही किंवा एकलेही नाही.

चौक भरणी…………!

सत्यशोधक चळवळीचे उगम स्थान असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील बहुतांश गावामधे होणाऱ्या लग्नात महामानव जोतीबा फुले यानी सत्यशोधक विवाह विधि साठी स्वतः लिहिलेल्या मंगल अष्टकाचा वापर ह त्याचा पुरावाच आहे........!

आभारा बहु मानीजे आपुलिया
माता पित्यांचे सदा.....!
मित्रांचे तुमच्या तसेच असती
जे इष्ट त्यांचे वदा.......!
वृद्धा पंगु सहाय्य द्या मुलीमुला
विद्या तया शिकवा......!
हर्षे वृष्टि करा फुलांची अवघे 
टाळी आता वाजवा.....!

शुभ मंगल सावधन.......!
शुभ मंगल सावधन.......!
शुभ मंगल सावधन.......!

(महात्मा जोतीबा फुले समग्र वांग:मय
प्रकरण-सत्यशोधक समजोक्त विवाहसंबंधी विधी
पान क्रमांक -417)

कोणताही माणूस किंवा समाज एकदम बदलणे शक्य नाहीच पण समाजात काही प्रमाणत होत असणाऱ्या सांस्कृतिक बदलाची ही प्रक्रिया समजून घेत बहुसंख्य लोकाना समजेल अशा भाषेत समोर आणून त्याला सकारात्मक वळण देण्याचे काम आपण करीत आहोत त्यामुळेच विद्रोही सांस्कृतिक चळवळ ही महाराष्ट्रातील सांस्कृतिक परिवर्तनाची प्रमुख विचारधारा आहे.

सांस्कृतिक परिवर्तन दीर्घकाळ आणि अखंड (long term & continues) चालणारी मानवीय बदलाची प्रक्रिया आहे त्यामुळे आपण काही कारणाने पूर्ण वैदिक व्यवस्था नाकरु न शकलेल्या आपल्या या बहुजन मित्रांना त्यानी कळत-नकळत केलेल्या या महान सांस्कृतिक बदलासाठी आभार व्यक्त करुन त्यामुळे समाजात होत असणारे झालेले असे छोटे मोठे सांस्कृतिक बदल समाजापुढे ठळकपणे आणने हे महत्वाचे आहे.....!वैदिक हिंदु धर्म आणि बहुजन हिंदु धर्म यातील फरक सातत्याने स्पष्ट करून सांगणे हेच महत्वाचे आहे.

 

No comments:

Post a Comment