Thursday 7 April 2016

महाशिवरात्री निमित्त शिव-पार्वती वास्तव...!

शिव-पार्वती :-बहुजनांना प्रेरक असे एक महान आद्य दांपत्य...!

शिव हे व्यक्तीत्व मूळचे आर्यांचे नाहीच हे बहुतेक सर्व संस्कृती अभ्यासकांनी मान्य केले आहे...सिंधुजन संस्कृतीत देखील शिवाचे अस्तित्व होते...!

शिव-पार्वती हे बहुजनांनाचे अतिप्राचीन काळातील अत्यंत गुणसंपन्न असे पूर्वज दांपत्य होय...त्यांच्या आधीचा इतिहास सापडणे अवघड आहे त्यामुळे एका दृष्टीने त्यांना तसे मानता येईल...!

आर्य आल्यानंतरच्या काळात त्यांचे दैवतीकरण करण्यात आले...शिवाला शंकर,महादेव,ईश,ईशान,रुद्र,भव,भर्व,सांब अशी विविध नावे देण्यात आली... पार्वतीला दुर्गा,उमा,चंडी,काली,गौरी इत्यादी नावे प्राप्त झाली...!

शिव हा सदैव "असुरांचा पाठीराखा" होता आणि विष्णू नेहमी असुरांचा नाश करण्याच्या प्रयत्नांत होता असेच आपल्याला आढळते....!

वैदिकांनी नंतरच्या काळात काही ठिकाणी शिवाविषयी आदर व्यक्त केल्याची वर्णने पाहायला मिळतात तरीदेखील त्याच्याविषयी "पुन्हा पुन्हा अनादरही" व्यक्त केलेला दिसून येतोच...!

शंकराचे वर्णन करताना अनेकदा "भोळा सांब" हे शब्द वापरले जातात...शंकराचे एकूण चरित्र पाहता हे भोळेपण भोळसटपणाचे नसून त्याची निष्कपट मनोवृत्ती असल्याचे दिसून येते...!

वैदिक परंपरेने बहुतेकवेळा "शिवापेक्षा विष्णूला श्रेष्ठ" मानले आहे..विष्णूचे खोटे दहा अवतार लोकांच्या मनात जसे रुजवण्यात आले तसे शिवाच्या बाबतीत झाले नाही...!

शिवाला स्मशानात राहणारा,भूतां खेतांचा नेता...राक्षसांचा तारणहार म्हणूनच समोर आणले गेले आहे...यामागे "शिवाची कुचेष्टा" करणे हेच वैदिकांचे धोरण होते...!

वास्तवात शिवाने ज्यांना मदत केल्याची वर्णने आढळतात ते सर्व नाग,असुर,दैत्य,दानव,राक्षस,पिशाच,भूत,खेचर किंकर इत्यादि येथील मूळचे मानवसमूह असल्याचे दिसून येते...याचा अर्थ सरळ आहे...आर्य आणि अनार्य या लढाईत शंकर नेहमीच "अनार्य" लोकांच्या बाजूने उभा राहत होता...!

शंकराच्या गळ्यात सदैव "नाग" असल्याचे दिसून येते तर विष्णूचे वाहन गरुड आहे याचा प्रतिकात्मक अर्थ लक्षात घेतला तरी समजून येईल "नागांना मारणारा त्यांचे भक्षण करणारा" म्हणून विष्णुसाठी नागांचा शत्रू गरुड हे वाहन निवडले आहे...!

नागाचे स्थान शंकराच्या गळ्यात आहे,हे त्या दोघांमधील एकमेकांच्या प्रेमाचे प्रतीक आहे...एखादी व्यक्ती प्रिय असली कि तिचा उल्लेख "गळ्यातील ताईत" म्हणून करतात...!

वासुकी हा नाग शिवभक्त आहे...शेष या नागाच्या हातात "नांगर आणि कोयता" असणे आणि शंकराचे वाहन नंदी असणे यावरून त्या दोघांचाही "कृषीसंस्कृतीशी" असलेला संबंध स्पष्ट होतो...!

अवैदिक गणपती शंकर आणि पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख हे सूत्र आपण लक्षात घ्यावे लागेल..गणपती हे केवळ एका व्यक्तीचे वा देवतेचे नाव या दृष्टीने पाहणे यापेक्षा "गणपती" हे एक "अत्यंत महत्वाचे पद" म्हणून पाहणे हा खरा ऐतिहासिक दृष्टिकोन होय...काळाच्या ओघात शंकराचे वैदिकिकरण झाले त्यामुळे गणपतीचेही होणे स्वाभाविक आहे...!

"मूळ क्षेत्रपती" असणाऱ्या आपल्या अनार्य लोकांची आज झालेली सांस्कृतिक दुराव्यस्था कशामुळे झाली ते समजून घ्यावीच लागेल...!

आमच्या रक्तवहिन्यांमधून "असुर दैत्यांचे रक्त" वाहत असेल तर ते आम्ही का नाकारावे...? आपल्या देशात लहानपनापासून मुलांना औपचारिक शिक्षण देताना त्यांची मने आत्मद्वेषाने भरून टाकण्याचा उद्योग केला जातो...आपण आर्य आहोत अनार्य मागास होते म्हणून आपण श्रेष्ठ आहोत असा खोटा अभिमान मनावर बिंबवला जातो...!

आज महाशिवरात्रीला शंकराचे स्मरण करताना स्वतःला प्रश्न विचारू आपण आर्य कि अनार्य...मग सगळेच आर्य आहोत तर अनार्य गेले कुठे...? स्वतःच्या नजरेने स्वतःचा इतिहास पाहूयात...!

सर्वच बहुजन दैवतांचा संदर्भ शंकराशी कसा काय जोडला जातो...जोतिबा,खंडोबा,बिरोबा,भैरोबा,म्हसोबा आदी सर्वच देवांना "सदाशिवाचे रूप" का मानले जातेय याचाही मागोवा घेण्याचा संकल्प करूयात...!

स्वतःला स्वतःच्या महान इतिहासापासून अलग करून टाकण्याच्या "आत्मघातकी" विचारापासून मुक्त होण्याची गरज आहे...ज्या दिवशी आपण आपल्या नजरेने स्वतःकडे पाहू त्यावेळी आपली आपल्याला ओळख पटेल आणि तो दिवस आपल्या "आत्मज्ञानाचा" असेल...!

सोशल मीडिया करीत संकलन
शिवराम ठवरे-9175273528
संदर्भ "बळीवंश" डॉ. आ. ह.साळुंखे
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.

No comments:

Post a Comment