Thursday 7 April 2016

सॉक्रेटीस ते दाभोळकर,पानसरे वाहया तुकाराम

बहुचर्चित "सॉक्रेटीस ते दाभोळकर,पानसरे वाहया तुकाराम" नाटकाला रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून मिळाले कायमस्वरूपी योग्यता प्रमाणपत्र...!

जेष्ठ विद्रोही लेखक,नाटककार आणि पुरोगामी चळवळीतील मार्गदर्शक प्रा.राजाभाऊ शिरगुप्पे यांनी मांडणी केलेल्या बहुचर्चित "सॉक्रेटीस ते दाभोळकर,पानसरे वाहया तुकाराम" नाटकाला दिनांक 20 फेब्रुवारी 2016 ला रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे कायमस्वरूपी योग्यता प्रमाणपत्र अर्थात सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले आहे...!

याबाबत नाटकाचे लेखक आमचे मार्गदर्शक प्रा.राजाभाऊ शिरगुप्पे यांचेशी फोनवरून आज संपर्क साधला असता राजाभाऊ बोलले...... शिवराम धन्यवाद मित्रा ....पण अशा नाटकाची सेन्सॉरकडे नोंदणी करायला लागणे म्हणजे वेदनादायक आहे..."म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो आहे"असे आहे बघ...माणसाच्या वेदनेलाही व्यक्त व्हायला परवानगी घ्यावी लागते म्हणजे काय...?उद्या कोणी माथेफिरू उठेल आणि म्हणेल तुम्ही जाहीरपणे  हसायला,रडायला,बोलायला परवानगी घेतली का विचारेल...!

कारण "सडक नाटक' अशी संकल्पना म्हणून मांडणी केलेल्या या वेदनेला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या "सर्जनशील" कलाकारांमुळे संपूर्ण जगात प्रसिद्धी मिळाली...!

आणि सडक नाटकाला "सेन्सॉर परवानगी घ्यायलाच नको" अशी माझी भूमिका होती...कारण आपल्यासारख्या कार्यकर्त्याला सामान्य माणसासमोर व्यक्त व्हायला "सडक नाटक" हेच प्रभावी साधन आहे...पण रिंगण नाटक या काहीश्या नव्या शब्दामुळे याला "प्रयोगिक नाटक म्हणावे कि सडक नाटक" असा संभ्रम तयार झाला किंवा केला गेला...!

त्यातच कोणत्याही प्रगत विचारांना विरोध करायच्या "सनातनी" वृत्तीने घरात बसून आपल्याच बहुजन तरुणांना पुढे करत या नाटकाला विरोध करायचा फतवा काढला होता त्यामुळे स्वतः नाटक न पाहिलेले...स्वतः विचार न करणारे स्वतःला 'धर्माचे ठेकेदार" समजणारे काहीजण जाहीरपणे विरोध करायला लागले होते....!

खरे तर त्या "प्रतिगामी आणि बुरसट" विचारांच्या लोंकानी नाटकाला विरोध केला त्यामुळेच या प्रमाणपत्र मिळवण्याच्या भानगडीत आपण पडलो त्यामुळे तेच खरं तर अभिनंदनास पात्र आहेत...!

कायद्याचा धाक दाखवत उत्तम शिक्षण घेणारे तरुण,स्वतःची नोकरी आणि घर उत्तमपणे चालवणारे आपले शिलेदार अडचणीत यावेत यासाठी प्रत्येक कार्यक्रमापूर्वी उगाच प्रसिद्धी माध्यमे,महसूल प्रशासन आणि पोलिसांकडे तक्रारी करून विरोधी वातावरण तयार केले जात होते...!

विरोध करूनदेखील लोकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे हे पाहून विरोधक चिडून गेले होते....डॉ.नरेंद्र दाभोळकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांना जिवंत मारूनदेखील त्यांचे विचार थांबत नाहीत हे लक्षात येऊ लागले होते....!

त्यामुळे "प्रगतशील विचार" करणाऱ्या तरुण पिढीत "कायद्याचा धाक" दाखवून दहशत निर्माण करू पाहणाऱ्या "विकृत धर्मांध" लोकांना हि नोंदणी म्हणजे "कायदेशीर चपराक" आहेच पण यापेक्षाही आपण करत असलेले "संस्कृती बदलाचे आणि इतिहासाच्या पुनर्मांडणीचे काम" योग्यच असल्याचा पुरोगामी कार्यकर्त्याला होणार आनंद खूप उत्साहवर्धक आहे असेही राजाभाऊंनी सांगितले....!

या 20 फेब्रुवारीला कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जाण्याला एक वर्ष होण्याच्या दिवशीच ही नोंदणी होण्याची देखील विशेष गोष्ट आहे....यानिमित्ताने आपण आण्णांच्या दुसऱ्याचे म्हणजे वैचारिक शत्रूचेदेखील अभिव्यक्ती स्वातंत्र जपण्याची "मी नथुराम गोडसे बोलतोय" नाटकाच्या वेळी घेतलेली भूमिका लक्षात ठेवली पाहिजे...कोणत्याही आणि कशाही वापरलेल्या शब्दाला शब्दानेच उत्तर दिले पाहिजे.....!

नाटकाचं सेन्सॉर प्रमाणपत्र माझ्या नावाने आहे म्हणून हे "नाटक सादर करायला माझीदेखील परवानगी आवश्यक नाही" असेही मला वाटते...जगामधील कोणतयाही भाषेतील कोणत्याही परिवर्तनवादी माणसाला या नाटकाचा "मुक्त परवाना" आहे...!

राजाभाऊ म्हणाले आजपर्यंत यांच्या "खोट्या भाकडकथा" सांगून बहुजन समाजाला आर्थिक,सामजिक आणि मानसिक गुलामगिरीत ठेवणाऱ्या साऱ्या प्रतिगामी लोकांना त्यांचा विरोधाचा मूर्खपणा लक्षात यावा म्हणून "खरे,विज्ञानवादी आणि वास्तववादी विचार सांगणाऱ्या" या नाटकाची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला होता....!

अशाप्रकारे राजाभाऊनी सर्व पुरोगामी सहकार्यांना धन्यवाद देत नाटकाचा पुन्हा नव्या जोमाने प्रसार करण्याचे आवाहन केले आहे...संपर्क करणेसाठी प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे यांचा मोबाईल नंबर 9423287320 हा आहे...!

शिवराम ठवरे - 22-02-2016
मुक्त पत्रकार-9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.
Shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment