Thursday 7 April 2016

उच्चशिक्षित बेरोजगार ते यशस्वी लघुउद्योजक....अमोल अरविंद साबळे...!

उच्चशिक्षित बेरोजगार ते यशस्वी लघुउद्योजक....अमोल अरविंद साबळे...!

शिवथर ता. सातारा मधील एका उपक्रमशील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या "अमोल साबळे" नावाच्या अवघ्या पंचविशीत युवकाची स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर यशस्वी लघुउद्योजक म्हणून चाललेली वाटचाल "नोकरीच मिळत नाही" म्हणून ओरड करणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रेरणादायक आहे असे "ग्रामीण मोहरे" जगासमोर यावेत म्हणून या लेखाच्या माध्यमातून केलेला हा छोटासा प्रयत्न....!

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अमोलचे वडील बृहनमुंबई महापालिकेत नोकरीला असल्यामुळे लहानपानापासून शेतीशी तसा प्रत्यक्ष कमीच संबंध येत असे...तरीदेखील दहावीनंतर साताऱ्याला शिक्षणाला आल्यामुळे स्वतःच्या शेतात आवड म्हणून जायला सुरुवात केली...!

एकत्र कुटुंब आणि बागायती शेती असल्यामुळे स्मृतिशेष किसन बाळकू साबळे,चुलते मधुकर साबळे आणि संपतराव साबळे यांच्यासोबत वारंवार चर्चेतून शेतीतील "चालू घडामोडी आणि नवनवीन प्रयोग" याबाबत आपोआपच माहिती होत होती...!

अमोलचे वडील अरविंद साबळे स्वतः नोकरीत असल्यामुळे मुलांनी नोकरीच करावी अशी अपेक्षा असणे स्वाभाविकच होते...याकरिता दोन्ही मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे उच्चशिक्षण घेण्याची त्यांनी सोय केलीच होती...अमोलचा मोठा भाऊ नितीराज साबळे हा एम. एस. डब्लू. ची पदवी घेऊन महाराष्ट्र बँकेत नोकरी  करायला लागला...दरम्यानच्या काळात सातारा येथील "कला व वाणिज्य महाविद्याल सातारा" येथून अमोलने वाणिज्य शाखेची पदवी मिळवली..!

पुढील उच्च शिक्षणासाठी पुण्याला कोथरूड येथील "एम. आय. टी. कॉलेज" येथे फायनान्स मधून एम. बी.ए. करायला प्रवेश घेतला...आणि शिक्षण पूर्ण करून कुठेतरी नोकरी करायचे त्यांने ठरवले...!

इथपर्यंत अमोलच्या जीवनात वेगळे काहीच चालू नव्हते...कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना अभ्यासक्रमातील एक भाग म्हणून प्रोजेक्ट वर्क करीता "टर्मरीक पावडर विक्री " हा विषय घेतला...आणि तिथून त्याच्या जीवनात वेगळेच वळण घेतले...!

घरी बागायती शेती असल्यामुळे दरवर्षी किमान 50 टन हळदीचे उत्पन्न निघायचेच...लहानपनापासून व्यापारी देईल तो दर ठरवून हळद विक्री करायची हा घरातील जेष्ठ लोकांना आलेला अनुभव पाठीशी होताच...!

कॉलेज करत एक महिन्याच्या प्रोजेक्ट वर्कमध्ये उत्पादन खर्चवजा जाता 20 हजार निव्वळ नफा मिळवला...आणि महाविद्यालायातील त्याचे "मार्गदर्शक शिक्षक HOD डॉ.महेश आभाळे" यांनी त्याच्यातील "उद्योजक" ओळखला...!

हळद पावडर निर्मिती आणि वितरण असा स्वतःचा व्यवसाय केला तर तू यशस्वी होऊ शकशील असा विश्वास दिला....घरातही हा विचार अमोलने बोलून दाखवला...त्याच्या कुटुंबातील सर्वांनी त्याला पाठिंबा दिला पण मार्गदर्शक म्हणून त्याचा मोठा भाऊ नितीराजने खूप मदत केली प्रोत्साहन दिले आणि नव्या व्यवसायाला सुरुवात झाली....!

व्यवसाय सुरुवात म्हणजे केवळ "घेतली हळकुंडे आणि केली पावडर" असे न करता अन्न व औषध प्रशासन विभागाकडे  रितसर नोंदणी करत...उत्पादन आणि वितरणाची अधिक माहिती घेऊन "सह्याद्री ऍग्रो प्रॉडक्ट्स" नावाने आपल्या स्वतःच्या लघुउद्योगाची सुरुवात केली....!

मुंबईत बालपण गेले असल्यामुळे स्वतःच्या घरात पिकत असलेली हळद गावाकडे नगण्य किंमत वाटयची पण तीच हळद  "बेडेकर,अंबारी,सुहाना किंवा त्यासारख्याच" पाकिटात मुंबईत 260 ते 270 किलो दराने विकत घ्यावी लागलेली अनुभवलं होतं...!

स्वतःच्या हळदीला 60 रुपये ते जास्तीत जास्त 110 रुपये दराने व्यापारी घेऊन जातात तर तीच हळकुंडे जेव्हा "हळद पावडर" म्हणून पॅकेटमध्ये बाजारात येते तेव्हा दीडपट अधिक दराने मिळते...!

फायनान्स मार्केटिंगच्या व्यवस्थापनाची "मोठाली पुस्तके" चाळणाऱ्या अमोलच्या हातात आता घरीच बनवलेल्या हळद पावडरचे पॅकेट आले...500 ग्रॅम आणि एक किलोचे पॅकेट घेऊन अमोल मुंबईतील घरे...हॉटेल व्यासाईक,खानावळ चालवणारे यांच्या दारात जाऊ लागला...!

स्वतःच्या शेतातल्या हळदीच्या गुणवत्तेची हमी दयायला त्याला काहीच अवघड नव्हते...बाजारातील प्रसिद्ध ब्रँडच्या हळद पावडरीपेक्षा 40 ते 50 रुपये कमी दरात घरपोच "स्वच्छ आणि ताज्या हळदकुंडाची हळद पावडर" मिळू लागल्यामुळे ग्राहकांचा विश्वास बसू लागला...!

माऊथ पब्लिसिटीमुळे मागणी वाढत गेली...दिवसेंदिवस वाढतच आहे... अमोलला मिळणाऱ्या घरातील आई ,वहिनी,भाऊ आणि वडिलांच्या सहकार्याने त्याचा "सह्याद्री ऍग्रो प्रॉडक्ट्सचा" सह्याद्री हळद पावडर ब्रँड सगळीकडे लोकप्रिय होऊ लागला आहे....!

दोन वर्षांपूर्वी सुरु केलेल्या अमोलच्या या छोट्या उद्योगाची सध्या वार्षिक उलाढाल 4 ते 5 लाख रुपये इतकी आहे....खर्च वजा जात नफा म्हणून त्याला 2 ते अडीच लाख रुपये मिळतात...स्वतःच्या मेहनतीचा मोबदला त्याला मिळतच आहे पण यापेक्षा त्याचे समाधान वेगळेच आहे...!

नोकरी न करताही स्वतःच्या शेतीला पूरक व्यवसाय करत असल्याचे वेगळेपण आहे...पॅकिंग करीत गावातील काही महिलांना रोजगार उपलब्ध होत असल्याचे समाधान आहे..या व्यवसायासोबत इतरही स्वतःची कामे करता येत आहेत...!

सध्या अमोल सातारा,पुणे आणि मुंबईत आपला व्यवसाय करित आहे..त्याचे आपल्या व्यवसायाचे संपूर्ण महाराष्टात जाळे पसरवायचे स्वप्न आहे...!

आता आपण काय करू शकतो...अमोलच्या या नव्या वाटेला किमान शुभेच्छा देऊ शकतो....त्याचा यशाची कहाणी आपल्या मित्रांना परिचितांना सांगू शकतो....किमान त्याला एखादा फोन करून अभिनंदन करू शकतो...त्याच्या या अभिनव उपक्रमास सोशल मिडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात पोहचवू शकतो...!

अमोलला त्याच्या व्यवसायात भविष्यात खूप यश मिळावे आणि महाराष्ट्रातील नोकरी मिळत नाही म्हणून निराश होणाऱ्या युवा वर्गाला प्रेरणा मिळावी हीच अपेक्षा...!

अमोलला आपण 9766151531 आणि 9421594387 या नंबरवर संपर्क करू शकता त्याच्या व्यवसायाचा पत्ता खालील प्रमाणे...!
अमोल अरविंद साबळे
सह्याद्री ऍग्रो प्रॉडक्ट्स
मु.पो.शिवथर ता. सातारा 415011

शिवराम ठवरे-9175273528
मुक्त पत्रकार-12-03-2016
विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र
shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment