Thursday 7 April 2016

संपूर्ण शैक्षणिक कर्जमुक्ती कृतीसमिती

"संपूर्ण शैक्षणिक कर्जमुक्ती कृती समिती"

जाहीर आवाहन,

महाराष्ट्रातील काही भागात गेली अनेक वर्षे अवर्षणाची अर्थात "भयानक दुष्काळ परिस्थिती" निर्माण झाली आहे...दुष्काळ निवारणासाठी शासनाने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत...टंचाई भागातील माणसांचे जीवनमान काही प्रमाणत सुलभ व्हावे याकरिता "शासकीय यंत्रणा" प्रयत्न करीत आहे...शेतकरी कर्जमाफी मिळावी म्हणून सर्वच राजकीय पक्ष मागणी करीत आहेत...यावर्षीच्या बजेटमध्ये देखील दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्याचे समजले आहे...इतकेच काय दुष्काळी भागातील पाळीव प्राणी जगावे म्हणून देखील उपाययोजना सुरु आहेत..!

आजच्या शिक्षण पद्धतीत घरची परस्थिती बेताची असल्यामुळे "शैक्षणिक कर्ज" काढून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी वर्गाची संख्या मोठी आहे...स्वतःच्या पायावर आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळाली कि कर्ज फेडायचेे असे ठरवून "शिक्षण पूर्ण केलेल्या पण नोकरीच न मिळालेल्या" शेतकरी शेतमजूर कुटुंबातील मुलांची अवस्था कुणाच्याही लक्षात येत नाही हे विशेष आहे... एका बाजूला "मेक इन इंडिया" आणि "मेक इन महाराष्ट्र" अशी मोठाली नावे घेऊन शासन लाखो रोजगार आणले अशी आकडेवारी जाहीर करीत आहे...!

तर दुसऱ्या बाजूला याच महाराष्ट्रात कर्ज काढून शिकलेले तरुण हातात "उच्च शिक्षणाची कागदपत्रे आणि डोक्यावर शैक्षिणक कर्जाचे ओझे" घेऊन पुण्या-मुंबईला "कंत्राटी" का होईना पण "रोजगार" मिळवा म्हणून कार्पोरेट कंपन्यांचे उंबरठे झिजवत आहेत...कुठेतरी जॉब मिळून डोक्यावर असणारे कर्ज फेडावे स्वतःचे लग्न करावे आणि दुष्काळात होरपळणाऱ्या आई-बापाला मदत करावी अशी स्वप्ने पाहत आहेत....!

काम करायची इच्छा असूनही "नोकरीच मिळत नाही" गावाकडे जाऊन शेती करावी तरी "पाणी नाही" त्यामुळे अनेक तरुण निराश होऊन व्यसनाकडे वळत आहेत...काहीजण आत्महत्या करीत आहेत...काहीजण राजकीय पक्ष आणि या व्यवस्थेचा निषेध नोंदवत आला दिवस ढकलत आहेत...अनेकांची लग्ने ठरत नाहीत...कर्ज असलेल्या मुलींशी ते आपल्याला फेडावे लागेल म्हणून कुणी सोयरिक करत नाहीत...अशा बिकट परस्थितीत महाराष्टातील हुशार शैक्षणिक कर्जदार तरुण "जगावे कि मरावे" अशा विवंचनेत आहेत...!

विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते शैक्षणिक प्रश्नावर अभ्यास करत असताना हे "भयानक वास्तव" लक्षात आले...काल 19 मार्च 2016 रोजी "शिवाजीनगर,पुणे" यथे झालेल्या विद्रोही विदयार्थी संघटनेच्या बैठकीत आता महाराष्ट्रात "संपूर्ण शैक्षणिक कर्जमुक्ती कृती समिती" स्थापन करून दुष्काळी भागातील बेरोजगार विदयार्थी वर्गाची संपूर्ण "शैक्षणिक कर्जमुक्ती" करायची मागणी शासनाकडे करावी असे ठरले आहे...!

एका बाजूला सरकार,मोठ्या बँका मोठमोठ्या भांडवलदार कंपन्यांचे "लाखो करोड रुपयांचे कर्ज माफ" करत आहे...व्यापारी वर्गाचा LBT कर माफ केला आहे...विजय मल्ल्या सारखे लोक लाखो करोड घेऊन पळून जात आहेत....तर दुसऱ्या बाजूला "कर्ज फेडण्याची इच्छा असूनही" केवळ नोकरी लागत नाही म्हणून आणि गावाकडे दुष्काळामुळे शेतातही उत्पन्न नाही त्यामुळे काढलेले शिक्षण कर्ज फेडू शकत नाहीत....!

यावर कहर म्हणजे "शिक्षण कर्ज फेडावे" म्हणून बँकांनी आपले पगारी कर्मचारी या "हतबल बेरोजगार" तरुणांच्या पाठी लावले आहेत...कर्जदार बेरोजगार तरुणांना बँका सतत नोटिसा पाठवत आहेत...त्यांचे राहत्या गावात येऊन बदनामी करत आहेत...त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना वरचेवर फोन करीत आहेत...लोन मागायला येऊन घरात तासनतास बसून आई वडिलांना दमदाटी करत आहेत...एका बाजूला "दुष्काळ" दुसऱ्या बाजूला "बेरोजगारी" तर तिसऱ्या बाजूला "बँकांच्या कर्जवसुली अधिकाऱ्यांचा त्रास" अशा परिस्थितीत तरुण हतबल झाले आहेत...सरकारने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे म्हणून सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे...याकरिता "विद्रोही विदयार्थी" संघटनेच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या "संपूर्ण शैक्षणिक कर्जमुक्ती कृती समितीच्या" वतीने महराष्ट्रातील शैक्षणिक कर्जदार मित्र मैत्रिणींना आवाहन करीत आहोत कि त्यांनी आपले शिक्षण कर्जाची माहिती असणारे "लोन स्टेटमेंट" खाली दिलेल्या कार्यकर्त्यांचे मेलवर स्वतःची प्राथमिक माहिती आणि मोबाईल नंबर यांचेसह पाठवावी...!

कृपया आपणही या "संपूर्ण शैक्षणिक कर्जमुक्ती कृती समिती"मध्ये सक्रीय सहभाग नोंदवावा आणि या कर्जमुक्तीच्या मागणीला पाठिंबा दयावा ही विनंती...!

आपले सहकारी-निमंत्रक
"संपूर्ण शैक्षणिक कर्जमुक्ती कृती समिती"
जालिंदर घिगे-7588029196
शिवराम ठवरे-9175273528
स्वप्नील धांडे-8408878804
सागर दोंदे-9767271094
मयुर खराडे-9503633029
shivramthavare25@gmail.com
kharade.mayur@gmail.com

कृपया या मागणीला जनमत तयार होणे खूप गरजेचे आहे...केवळ बोलण्यासाठी फोन करू नये...आपल्या "कर्जाची स्टेटमेंट" व्यक्तीगत माहितीसह वर दिलेल्या मेलवर पाठवावी...!

"संपूर्ण शैक्षणिक कर्जमुक्ती कृती समिती" कोणाकडूनही "देणगी वा निधी" घेत नाही त्यामुळे संपूर्ण शैक्षणिक कर्जमुक्ती कृती समितीच्या नावाने कोणालाही "देणगी वा निधी" देऊ नये...!

No comments:

Post a Comment